पितृपक्षाचा(Pitru Paksha 2025) हा शेवटचा आठवडा. ज्यांना पितरांची तिथी माहीत असते ते तिथीनुसार श्राद्ध करतात, पण ज्यांना तिथी माहीत नसते ते सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध करतात. मात्र, ज्यांचे नातेवाईक हरवले, घर सोडून निघून गेले, अपघाताचे वृत्त आले पण देह सापडला नाही, अशा लोकांचा मृत्यू गृहीत धरून त्यांच्या नावे श्राद्ध करता येते का? याबाबत शास्त्राने केलेला खुलासा जाणून घ्या.
षडाष्टक योग २०२५: १८ सप्टेंबर शनी-शुक्र अशुभ षडाष्टक; ५ राशींचे आर्थिक, मानसिक आरोग्य धोक्यात
युद्धभूमीवर, देशांतरी किंवा अपघाती निधन घडले असताना कधीकधी निश्चित निधनकाल माहीत होत नाही. त्याचप्रमाणे एखाद्याच्या बाबतीत बराच कालखंड गेल्यानंतर त्यास आपल्या पितरांचे श्राद्ध करावेसे वाटते. जसे की आपले आजोबा, पणजोबा यांचे श्राद्ध करावेसे वाटते, परंतु तिथी माहित नसते किंवा निधन महिना माहीत असतो पण तिथी माहीत नसते किंवा एखादी व्यक्ती घर सोडून कायमची निघून जाते, तिच्याबाबतीत अशा वेळी काय करावे असा प्रश्न पडतो, त्याचे उत्तर जाणून घ्या.
>> शास्त्र सांगते की, निधन महिना माहीत आहे पण तिथी माहीत नसेल तर त्या महिन्यात दर्शअमावस्या किंवा शुक्ल वा कृष्ण एकादशीच्या दिवशी श्राद्ध करावे.
>> शास्त्र सांगते की, निधन महिना माहीत आहे पण तिथी माहीत नसेल तर त्या महिन्यात दर्शअमावस्या किंवा शुक्ल वा कृष्ण एकादशीच्या दिवशी श्राद्ध करावे.
>> बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा मागमूस लागून ती व्यक्ती बारा वर्षे परत आली नाही व तिच्या वयोमानाचा अंदाज घेऊन तिच्या मरणाविषयी खात्री झाली तर पालाशविधीने और्ध्वदेहिक करून तो दिवस वार्षिक श्राद्धासाठी घ्यावा. योगायोगाने ती व्यक्ती परत आली, तर त्यासाठी शास्त्रात स्वतंत्र विधी दिलेला आहे.
>> याउपर सर्वपित्री अमावस्या या तिथीला पितरांची निधन तिथी माहीत असो वा नसो, त्यांच्या नावे श्राद्ध घालून पितृऋण व्यक्त करू शकतो.
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
एकूणच काय, तर कोणत्याही गोष्टीसाठी अडून न राहता त्यातून मार्ग काढत पुढे जा, अशी छान शिकवण आपल्याला धर्मशास्त्रातून मिळते. असा धर्म आपण पाळावा आणि धर्माचे रक्षण करत तो वृद्धींगत करावा.