शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

Pitru Paksha 2023: आपण केलेल्या सेवेवर पितर संतुष्ट नाहीत, हे कसे ओळखाल? त्यावरील उपायही वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 15:11 IST

Pitru Paksha 2023: पितृपक्षाचा शेवटचा आठवडा आला, तरी अजूनही पितरांना अर्पण केलेल्या नैवेद्याकडे त्यांनी ढुंकूनही पाहिले नसेल तर 'ही' असतील करणे...!

येत्या सोमवार पासून पितृपक्षाचा शेवटचा आठवडा सुरू होत आहे. पितृ पक्षात तिथीनुसार आपण श्राद्धविधी केले, नैवेद्य दाखवला, तरीदेखील पितर संतुष्ट होत नसतील तर दिलेले उपाय अवश्य करा. 

पितृपक्षातील पंधरा दिवसात आपले पूर्वज अर्थात पितर आपल्या वंशजांच्या भेटीसाठी पृथ्वीलोकात परत येतात अशी आपली श्रद्धा असते. आपल्या पितरांना गती मिळावी म्हणून आपण श्राद्ध करतो. दानधर्म करतो. त्यांना नैवेद्य दाखवतो. काक स्वरूपात येऊन त्यांनी प्रसाद ग्रहण करावा असे विनवतो. मात्र तसे झाले नाही तर पितर आपल्यावर नाराज तर नाहीत ना या विचाराने साशंक होतो. याचसंदर्भात पुढील माहिती तुम्हाला उपयोगी पडू शकेल. 

>> पितृ दोष दूर होण्यासाठी पितृपक्षाच्या काळात श्राद्धविधी केले जातात. मात्र तसे करूनही पितृदोष दूर झाला नाही हे कसे ओळखावे तर? घरातील व्यक्ती सतत तणावाखाली असते. अथक प्रयत्न करूनही व्यवसायात नुकसान होते. करिअरची वाढ थांबते. वैवाहिक जीवनात संघर्ष वाढू लागतो. तरुण-तरुणींच्या विवाहात अडथळे येतात.

>> जेवणात केस येणे, दगड येणे, अन्न कुजणे ही लक्षणेदेखील पितृदोष दर्शवतात. तसेच स्वप्नात पितरांचे दर्शन घडते परंतु स्वप्नातही ते नाराज दिसतात, रडताना दिसतात. यामुळे आर्थिक परिस्थिती ढासळते आणि घरावर नैराश्य पसरते. 

>> कोणतेही शुभ कार्य सुरू करायला गेल्यास अडथळे येऊ लागतात. शुभ कार्याच्या दिवशी घरात वाद, भांडण, तंटा सुरु होतो. मारामारी सुरू होते किंवा काही अशुभ घटना घडू लागतात. आनंदाचा प्रसंग दुःखात बदलतो. मुले होण्यात अडचणी येऊ लागतात.

पितृदोषावर श्राद्धकाळात करण्याचे उपाय: 

अशी लक्षणे माणसाच्या जीवनात दिसू लागल्यास पितृ दोष आहे असे समजावे. अशा परिस्थितीत पितरांना लवकरात लवकर प्रसन्न करण्याचे उपाय करावेत.

>> दान करा. गोदान अर्थात गायीचे दान करा आणि ते शक्य नसेल तर गायीला नियमितपणे चारा पाणी करा.

>> पितरांच्या शांतीसाठी विधी करा.

>> कावळ्यांना तसेच गायीला अन्न दान करा.

>> भगवान शंकराचे ध्यान करताना 'ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्; मंत्राचा रोज जप करा.

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष