शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Pitru Paksha 2023: आमसुलाची चटणी हा तर श्राद्ध स्वयंपाकाचा जीवच; वाचा तिचे वैशिष्ट्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 11:36 IST

Pitru Paksha 2023: वर्षभरात कधीही न केली जाणारी चविष्ट, रुचकर आणि औषधी अशी आमसुलाची चटणी श्राद्ध स्वयंपाकातच का केली जाते ते जाणून घ्या. 

खीर, वडे, आमसुलाची चटणी हे पितृपक्षातील नैवेद्याचे मुख्य प्रकार आहेत. बाकी वरण, भात, पुऱ्या, भाज्या, भजी, पापड, कुरडई इत्यादी पदार्थ गृहिणी त्यांच्या सोयीने करतात. मात्र आमसुलाच्या चटणीशिवाय या नैवेद्याला पूर्णत्त्व येतच नाही. जांभळ्या रंगाची ही चविष्ट चटणी एरवीच्या जेवणात का केली जात नसावी, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. 

Pitru Paksha 2023: पितरांना आपण दाखवलेला नैवेद्य कसा मिळतो? मत्स्य आणि मार्कंडेय पुराणात सापडते उत्तर!

आयुर्वेदानुसार कोकम पित्तनाशक आहे. अर्श, शूल, उदरकृमी, अरुची, पित्त इ. रोगांत. त्याचा वापर करतात. कोकमात अनेक पोषक घटक असतात. ज्याचा तुमच्या शरीरावर चांगला फायदा होतो. कोकमातील व्हिटॅमिन्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर्स आणि पाचक घटकांमुळे आहारात त्याचा वापर करणे फारच गरजेचे ठरते. कोकमाचा आहारात समावेश केल्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. हृदय विकारापासून रक्षण होते, नैराश्य कमी होते, मधुमेह नियंत्रणात राहतो. तसेच त्वचेचे विकार दूर होतात. म्हणून कोकम सरबत, कोकम सोलकढी, सार, आमटीत वापर केला जातो. असे असूनही कोकम चटणी पूर्वापार पितृपक्षातील नैवेद्याशी जोडली गेल्याने ती रोजच्या जेवणात किंवा इतर सणासुदीच्या काळात निषिद्ध ठरवली गेली असावी. कारण कोकम चटणी पाहताच पितृपक्षाचा नैवेद्य आठवणार आणि सणांचा उत्साह लोप पावणार, म्हणून ती एरवी टाळली जात असावी. तसे असले तरी सध्या पितृपक्ष सुरू असल्याने ती कशी करायची ते शिकून घ्या. 

साहित्य:५-६ आमसुलंआमसुल गोळ्याच्या दुप्पट गूळ३-४ मिरच्याजिरंमीठ

कृती:१) आमसुलं १५-२० मिनीटे पाव वाटी गरम पाण्यात भिजत ठेवावीत. किंवा आमसुलाचे सार करून झाल्यावर उरलेली आमसुलं वापरावीत.२) भिजवलेली आमसुलं, गूळ, मिरच्या, जिरं, मिठ एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्यावी.

Pitru Paksha 2023: पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध केल्याने कोणते लाभ होतात ते जाणून घ्या!

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षfoodअन्न