Pitru Paksha 2021 : पितरांची तिथी माहीत नसेल तर श्राद्ध केव्हा करावे? धर्मशास्त्रात दिलेले उत्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 01:42 PM2021-09-28T13:42:02+5:302021-09-28T13:42:31+5:30

Pitru Paksha 2021: कोणत्याही गोष्टीसाठी अडून न राहता त्यातून मार्ग काढत पुढे जा, अशी छान शिकवण आपल्याला धर्मशास्त्रातून मिळते.

Pitru Paksha 2021: If you don't know the death anniversary of Pitru, when should you do Shraddha? Read the answer given in the scriptures! | Pitru Paksha 2021 : पितरांची तिथी माहीत नसेल तर श्राद्ध केव्हा करावे? धर्मशास्त्रात दिलेले उत्तर वाचा!

Pitru Paksha 2021 : पितरांची तिथी माहीत नसेल तर श्राद्ध केव्हा करावे? धर्मशास्त्रात दिलेले उत्तर वाचा!

Next

युद्धभूमीवर, देशांतरी किंवा अपघाती निधन घडले असताना कधीकधी निश्चित निधनकाल माहीत होत नाही. त्याचप्रमाणे एकाद्याच्या बाबतीत बराच कालखंड गेल्यानंतर त्यास आपल्या पितरांचे श्राद्ध करावेसे वाटते. जसे की आपले आजोबा, पणजोबा यांचे श्राद्ध करावेसे वाटते, परंतु तिथी माहित नसते किंवा निधन महिना माहीत असतो पण तिथी माहीत नसते, अशा वेळी काय करावे असा प्रश्न पडतो. 

>>शास्त्र सांगते की, निधन महिना माहीत आहे पण तिथी माहीत नसेल तर त्या महिन्यात दर्शअमावस्या किंवा शुक्ल वा कृष्ण एकादशीच्या दिवशी श्राद्ध करावे. 

>>निधनतिथी माहीत असेल, पण महिना लक्षात नाही, अशा वेळी मार्गशीर्ष, माघ, भाद्रपद, आषाढ यापैकी एखाद्या महिन्यातील तिथीला श्राद्ध करावे.

Pitru paksha 2021 : वेळेअभावी श्राद्धविधी करणे शक्य नाही? मग या दहा उपायांपैकी एकाचा अवलंब करा!

>>निधनतिथी व महिना माहीत नसेल, तर माघ किंवा मार्गशीर्ष यापैकी एका महिन्यातील अमावस्येला प्रतिवार्षिक श्राद्ध करावे.

>>बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा मागमूस लागून ती व्यक्ती बारा वर्षे परत आली नाही व तिच्या वयोमानाचा अंदाज घेऊन तिच्या मरणाविषयी खात्री झाली तर पालाशविधीने और्ध्वदेहिक करून तो दिवश वार्षिक श्राद्धासाठी घ्यावा. योगायोगाने ती व्यक्ती परत आली, तर त्यासाठी शास्त्रात स्वतंत्र विधी दिलेला आहे. 

>>याउपर सर्वपित्री अमावस्या या तिथीला पितरांची निधन तिथी माहीत असो वा नसो, त्यांच्या नावे श्राद्ध घालून पितृऋण व्यक्त करू शकतो. 

एकूणच काय, तर कोणत्याही गोष्टीसाठी अडून न राहता त्यातून मार्ग काढत पुढे जा, अशी छान शिकवण आपल्याला धर्मशास्त्रातून मिळते. असा धर्म आपण पाळावा आणि धर्माचे रक्षण करत तो वृद्धींगत करावा. 

धर्म म्हणजे काय? शास्त्र म्हणजे काय? हिंदू धर्माचा प्रमाण ग्रंथ कोणता? सविस्तर वाचा!

Web Title: Pitru Paksha 2021: If you don't know the death anniversary of Pitru, when should you do Shraddha? Read the answer given in the scriptures!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.