Pausha Putrada Ekadashi 2025: २०२५ या वर्षाचे शेवटचे दोन दिवस अत्यंत खास आहेत. या वर्षाची अखेर एकादशी तिथीने होत आहे. देशभरातील लाखो भाविक एकादशी तिथीला व्रतपूजन करून श्रीविष्णू आणि त्यांच्या अवतारांची उपासना करत असतात. एकादशीचे व्रत अतिशय शुभ पुण्य फलदायी मानली गेली आहे. मराठी वर्षातील पौष महिना सुरू असून, शुद्ध पक्षातील एकादशीने २०२५ या वर्षाची सांगता होत आहे. नेमके कसे व्रत करावे? जाणून घेऊया...
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
सर्व एकादशी तिथींमध्ये काही एकादशी तिथींचे विशेष महत्त्व असल्याचे म्हटले जाते. वर्षभरातील सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत सर्वोच्च, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते.
श्रीविष्णूंची अत्यंत प्रिय तिथी, अशी एकादशी तिथीची ख्याती
प्रत्येक एकादशीला व्रत करून श्रीविष्णूंची उपासना करण्याची प्राचीन परंपरा भारतीय संस्कृतीत आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध व वद्य पक्षांतील अकरावी तिथी एकादशी या नावाने संबोधिली जाते. भगवान श्रीविष्णूंची अत्यंत प्रिय तिथी, अशी तिची ख्याती आहे. नित्य व काम्य असे हे उभयविध व्रत आहे. एकादशीच्या बाबतीत ‘स्मार्त’ व ‘भागवत’ असे दोन संप्रदाय आहेत. ही तिथी दिनद्वयव्यापिनी असल्यास द्वादशीविद्धा वैष्णवांकरिता विहित आहे. ३० डिसेंबर रोजी २०२५ मधील अखेरची पुत्रदा (स्मार्त) एकादशी आहे. तर, ३१ डिसेंबर रोजी २०२५ मधील शेवटची भागवत एकादशी आहे.
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
पौष शुद्ध पक्ष पुत्रदा स्मार्त भागवत एकादशीचा सोपा व्रतविधी
वास्तविक पाहता पुत्रदा एकादशीचे व्रताचरण वर्षातून दोनदा केले जाते. एक म्हणजे श्रावणात आणि दुसरे म्हणजे पौष महिन्यात. सकाळची नित्यकर्म आटोपल्यानंतर व्रताचे आचरण करणाऱ्यांनी पुत्रदा एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असेल तर विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. विष्णू सहस्रनाम म्हणणे शक्य नसेल तर श्रवण करावे. यथाशक्ती दान करावे, असे सांगितले जाते.
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
पुत्रदा एकादशी व्रताचा सांगता विधी
पौष महिन्यातील पुत्रदा एकादशीचे व्रत आचरण करणाऱ्यांनी मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेऊ नये. व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही, त्यांनी सात्विक आहार घ्यावा. कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानदिक कार्ये आटोपली की, एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी, असे सांगितले जाते.
॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥
Web Summary : The last Pausha Putrada Ekadashi of 2025 is significant. Observe the fast with proper rituals, worship Lord Vishnu, and avoid negative thoughts. Follow guidelines for a fruitful observance and seek forgiveness for unintentional errors. The Ekadashi concludes the year on an auspicious note.
Web Summary : साल २०२५ की अंतिम पौष पुत्रदा एकादशी महत्वपूर्ण है। उचित अनुष्ठानों के साथ व्रत रखें, भगवान विष्णु की पूजा करें और नकारात्मक विचारों से बचें। फलदायी पालन के लिए दिशानिर्देशों का पालन करें और अनजाने में हुई गलतियों के लिए क्षमा मांगें। एकादशी वर्ष का समापन शुभ नोट पर करती है।