Papmochani Ekadashi 2025: 'हे' दहा लाभ मिळवण्यासाठी बुधवारी पापमोचनी एकादशीचे व्रत कराच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 13:08 IST2025-03-25T13:07:54+5:302025-03-25T13:08:16+5:30
Papmochani Ekadashi 2025: २६ एप्रिल रोजी पापमोचनी एकादशी आहे, नवीन हिंदू वर्षाची सुरुवात करताना आजवर झालेल्या पापातून मुक्त होण्यासाठी हे व्रत कराच!

Papmochani Ekadashi 2025: 'हे' दहा लाभ मिळवण्यासाठी बुधवारी पापमोचनी एकादशीचे व्रत कराच!
हिंदू वर्षातील शेवटच्या महिन्यातील शेवटची एकादशी अशी फाल्गुन मासातील पापमोचनी एकादशीची ओळख आहे. भाविक एकादशीचे व्रत आवर्जून करतात. ही तिथी भगवान महाविष्णूंची प्रिय तिथी असल्यामुळे एकादशी व्रत केले असता त्यांची कृपादृष्टी लाभते. या व्रताचे दिवशी दोन्ही वेळेस उपास करून केवळ फलाहार करणे अपेक्षित असते. 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' हा जप करून दुसरे दिवशी अन्न ग्रहण करून व्रत पूर्ण करायचे असते.
Papmochani Ekadashi 2025: हिंदू नवे वर्ष सुरू होण्याआधी सर्व पापांचे निराकरण करणारी पापमोचनी एकादशी!
यंदा बुधवारी २६ एप्रिल रोजी पापमोचनी एकादशी (Papmochani Ekadashi 2025) आहे. या एकादशीच्या नावावरूनच लक्षात येते की पापक्षालन करण्याच्या हेतून हे व्रत केले जाते. दर वेळी आपण जाणून बुझून पाप तसेच गैरवर्तन करतो असे नाही, परंतु आपल्या हातून, बोलण्यातून, देहबोलीतून कळत नकळत पाप घडतात. त्याचे क्षालन होण्याहेतूने या व्रताचे आयोजन केले आहे.
एकादशी कोणतीही असो, त्याचे भरघोस फायदे मिळतात. त्यातही ती पापमोचनी एकादशी असेल तर अधिकाधिक फायदे पदरात पाडून घेता येतील. हे फायदे पुढीलप्रमाणे-
>> पापमोचनी एकादशी व्रत केले असता सर्व प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळते. यानिमित्ताने जाणते अजाणतेपणी झालेल्या पापांबद्दल भगवंताची क्षमा मागावी.
>> पापांचा नाश झाल्यावर सुख समृद्धीची द्वारे आपोआप खुली होतात.
>> हे व्रत केले असता वाजपेय आणि अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते व सर्व कार्यात यश मिळते.
>> हे व्रत केले असता मोक्ष प्राप्ती होते.
>> भविष्यात आपल्या हातून पाप घडू नये, याची जाणिव करून देणारी ही एकादशी आहे.
>>या दिवशी भगवान विष्णूंना पिवळी फुले वाहून त्यांची पूजा केल्यास कृपादृष्टी प्राप्त होते. ..
>> या दिवशी नवग्रहांची पूजा केली असता, कुंडलीतील ग्रहांचा प्रकोप सौम्य होतो.
>>पापमोचनी एकादशी व्रत केल्याने मनातील पापांचा निचरा होऊन मन निर्मळ बनते.
>> कितीही अडचणी आल्या, तरी हे व्रत चुकवू नये. हे व्रत भक्तिभावे केले असता, उचित फलप्राप्त होते.
>> या व्रतामुळे हर तऱ्हेच्या पापांपासून मुक्ती मिळते.
Shani Amavasya 2025: २००० वर्षांनी जुळून येतोय दुर्लभ संयोग; 'हा' छोटासा उपाय तुमचे जीवन बदलू शकतो!