नाथ महाराज म्हणतात, हरवलेले आत्मरूप मोती शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला. स्व-स्वरूपी सती जाण्याचा म्हणजे जीवभाव हरवून आत्मरूपी लीन होण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण धुणे धूत असताना खोल पाण्यात पडलेला मोती मला सापडला नाही. मी त्याच्या शोधात आहे. ...
सर्व भेद पोटात घेऊन पुन्हा त्यापासून अलिप्त कसे राहावे हे आकाश शिकवते. सर्वामध्ये राहून पुन्हा कशात नसण्याची कला योगी आकाशापासून शिकतो. उपनिषदांमध्ये ब्रह्माला आकाशाची उपमा दिलेली आहे. दृष्य विश्वामध्ये परमात्मास्वरूपाच्या जवळ जाणारे आकाशच आहे. ...
सर्व देवदेवतांचे स्मरण हा देवदिवाळी सणाचा हेतू असतो. या सर्व देवदेवतांची वर्षातून आपल्याकडून एखादे दिवशी पूजा होऊन त्यांना नैवेद्य अर्पण होणे आवश्यक असते, म्हणून कोकणप्रांतीय लोक देवदिवाळीस 'देवांचे नैवेद्य' म्हणतात. ...