स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या निष्काम कर्मयोगातून आपल्यालाही निश्चितच बोध घेता येईल. आपल्यालाही त्यांच्याकडून प्रेरणा घेता यावी आणि 'मा फलेषु कदाचन' हा गीताउपदेश अंगी बाणता यावा, यासाठी ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता स्वामी शांतिगिरीजी महाराजांचे ...
एखाद्या व्यक्तीचे नाव काढताच आपल्याला त्याचे रूप डोळ्यासमोर येते. पण कधी? जेव्हा त्या व्यक्तीला आपण पाहिलेले असते. मात्र, जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण ओळखतही नाही, तेव्हा आपण आधी नाम विचारून घेतो आणि मग रूप पाहण्याचा प्रयत्न करतो. ...
जोपर्यंत धडधाकट आहात, तोपर्यंत ईश्वराची ओळख करून घ्या. म्हणजे नाशिवंत शरीराचा आणि संसाराचा मोह होणार नाही. संसारातून हळू हळू मन काढा आणि ते ईश्वराशी जोडा. सतत सत्संग करा. ईश्वराच्या इच्छेत जगायला शिका. म्हणजे उरलेले दु:खदायक आयुष्य तुम्हाला सुखदायक ह ...
आजच्या काळात सुखवस्तू घर आहे, परंतु घरात राहणारे सुखी नाहीत. कारण, त्यांचा आपापसात सुसंवाद होत नाही. चांगल्या विचारांची देवाण घेवाण होत नाही. चांगले विचार कानावरदेखील पडत नाहीत. पूर्वी आजी-आजोबा रामरक्षा, भीमरूपी स्वत: म्हणत आणि नातवांकडून म्हणवून घे ...
योगसाधना ही सामान्य लोकांसाठी नाही. ती खडतर तपश्चर्या आहे. ती योगी, हटयोगीच करू जाणे. सामान्य माणसाने तो मार्ग अवलंबिला, तर त्याला हाल अपेष्टाच सहन कराव्या लागतील. मग त्याने परमार्थ कसा साधावा? तर केवळ नाम:स्मरणाने, सत्कार्याने, सेवेने! प्रपंचात राहू ...
देवी शारदेने कधीही कोणातही भेदभाव केला नाही. तिच्या ज्ञानगंगेवर जो कोणी आपली ज्ञानतृष्णा भागवण्यासाठी आला, त्याला शारदेने कधीही विन्मुख होऊ दिले नाही. जगात एवढे ज्ञान आहे, की ते घेत असताना 'घेशिल किती कराने', अशी आपली अवस्था होते. ...