शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

आपली प्रगती 'या' चार प्रश्नांमुळे अडकून राहिली आहे!- गौर गोपाल दास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 12:08 PM

विचारपूर्वक निर्णय घ्या, पण निर्णय घेताना अति विचार किंवा नकारात्मक विचारांनी स्वत:ची प्रगती थांबवू नका. 

प्रख्यात व्याख्याते गौर गोपाल दास प्रभू यांनी आपल्या एका व्याख्यानात सांगितले- आपली प्रगती कधी थांबते माहितीये? जेव्हा आपण चार गोष्टींचा अकारण विचार करतो. ते चार प्रश्न म्हणजे- मी अपयशी झालो तर? मी काही गमावून बसलो तर? माझा निर्णय चुकला तर? लोक काय म्हणतील? जेव्हा आपण या चारही प्रश्नांवर मात करायला शिकू, तेव्हा आपण प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकलेले असेल. यासाठी मी तुम्हाला माझे उदाहरण देतो.

एकदा मला माझ्या एका पायलट मित्राने त्याच्या खाजगी विमानातून सफर घडवायची असे ठरवले. विमानात याआधी देखील मी अनेकदा बसलो होतो, तरीदेखील तो विमान चालवत असताना त्याच्या बाजूला बसून सफर करणे हा माझ्यासाठी नवीन अनुभव होता. ज्या दिवशी आम्हाला सफारीवर जायचे होते, त्याच्या आदल्या दिवशी मी अकारण बेचैन होतो. जणू काही विमान मलाच उडवायचे होते! दुसऱ्या दिवशी त्याच अस्वस्थतेत विमानात बसलो. मात्र, माझ्या मनातले भाव मी चेहऱ्यावर येऊ दिले नाही, अन्यथा माझ्या मित्राचा हिरमोड झाला असता. तो आनंदात होता. आम्ही दोघे उडालो. काही क्षणात माझी भीती पळाली. जवळपास वीस मीनिटे आकाशात सैर करून जमिनीवर लँडींग करताना मला पुन्हा त्याच अस्वस्थतेने ग्रासले. मात्र माझ्या मित्राने अगदी शांतपणे लँडिंग केले आणि आमचा प्रवास पूर्ण झाला. माझी अस्वस्थता पूर्ण दूर झाली होती. 

असाच आणखी एक अनुभव होता स्काय डायव्हिंगचा! आकाशात उंचावर पोहोचल्यावर विमानातून उडी मारायची, अशा वेळी नेमके आपले पॅराशूट उघडले नाही तर? माझ्या प्रशिक्षकाकडून काही चूक झाली तर? माझा अपघात होऊन मी मेलो तर? जमिनीवर सुरक्षित उतरण्याऐवजी कुठे आदळलो तर? अशा सगळ्या नकारात्मक विचारांनी डोक्यात गर्दी केली. शेवटी एका क्षणी मीच मला समजावले, 'आपल्याबरोबर असणाऱ्या प्रशिक्षकाने आजवर हजारो लोकांना हा आनंददायी अनुभव दिलेला आहे. तो माझ्या सोबत असणार आहे. माझ्या पाठीला पॅराशूट असणार आहे. हा अनुभव सुखद व्हावा यासाठी एक यंत्रणा सुसज्ज असणार आहे. एवढे सगळे असूनही जर मी घाबरत राहिलो, तर मी एक सुंदर अनुभव घेण्यापासून स्वत:ला दूर ठेवण्याची चूक करणार आहे.' 

असा सारासार विचार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी स्काय डायव्हिंग केले आणि यशस्वीपणे विमानातून बाहेर झेप घेतली. माझ्या प्रशिक्षकाने मला व्यवस्थित सांभाळले. पॅराशूट वेळेत उघडले आणि आम्ही सुखरूप जमिनीवर आलो. माझ्या मनातले चारही प्रश्न मिटले. याचाच अर्थ मी अकारण काळजी करत होतो.

मित्रांनो, विचारपूर्वक निर्णय घ्या, पण निर्णय घेताना अति विचार किंवा नकारात्मक विचारांनी स्वत:ची प्रगती थांबवू नका.