Numerology: ज्योतिषशास्त्रात कुंडली, कुंडलीतील ग्रहांची स्थिती, स्थानांवरील दृष्टी अशा अनेकविध गोष्टी पाहून एखाद्या व्यक्तीबद्दल, गुणांबद्दल तसेच भविष्यातील घटनांबद्दल अंदाज वर्तवले जातात. ज्योतिषशास्त्राचीच एक शाखा असलेल्या अंकशास्त्रात जन्म तारखेवर आधारित मूलांक किंवा भाग्यांक यांवरून भविष्य कथन केले जाऊ शकते. जन्म तारखेची संपूर्ण बेरीज करून मूलांक काढता येतो. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे.
ज्योतिषशास्त्रात नवग्रहांपैकी राहु आणि केतु हे क्रूर आणि मायावी ग्रह मानले गेले आहे. हे दोन्ही ग्रह कायम वक्री चलनाने एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करत असतात. तसेच राहु आणि केतु नेहमी एकमेकांपासून समसप्तक स्थानी असतात. केतु ग्रहाला अंकशास्त्रातील मूलांक ७ चे स्वामित्व बहाल केलेले आहे. त्यामुळे मूलांक ७ वर राहुची विशेष आणि अपार कृपा असते, असे मानले जाते. आताच्या घडीला केतु हा सूर्याचे स्वामित्व असलेल्या सिंह राशीत विराजमान आहे.
केतु हा सेवावृत्तीचा ग्रह आहे
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. केतु हा सरळमार्गी, मनात काहीही न ठेवणारा, न बोलता काम करणारा, परोपकारी, त्यागी, उदार, एकनिष्ठ व स्वामीनिष्ठ आहे. केतु सरळमार्गी असल्याने मुत्सद्दीपणा अथवा दुसऱ्यावर छाप पाडून गोडीगुलाबीने कार्य करून घेणे साधत नाही. स्वतंत्रबुद्धी, स्वतंत्रवृत्ती, सडेतोड बोलणे वा मानीपणा नाही. केतु हा सेवावृत्तीचा ग्रह आहे.
उत्साही, आकर्षक आणि अद्वितीय व्यक्तिमत्व
अंकशास्त्रात ७ हा अंक खूप शुभ आणि भाग्यवान मानला जातो. इंद्रधनुष्याचे सात रंग असोत किंवा आठवड्याचे सात दिवस असो, या अंकाचे सर्वत्र विशेष स्थान आहे. पृथ्वीवरून दिसणारे सात ग्रह आणि स्वर्गाकडे जाणाऱ्या सात पायऱ्या या संख्येचे महत्त्व आणखी वाढवतात. म्हणूनच ७ मूलांकाचे लोक उत्साही, आकर्षक आणि अद्वितीय व्यक्तिमत्वाचे असतात. मूलांक ७ असलेले लोक धार्मिक आणि आध्यात्मिक असतात. त्यांच्या आध्यात्मिक शक्ती खूप प्रबळ असतात. कधीकधी ते भविष्यातील घटनांचे अचूक भाकित करण्यास सक्षम असतात.
स्वतंत्र, निर्भय आणि स्पष्टवक्ता
मूलांक ७ असलेले लोक नेहमीच बदलासाठी उत्सुक असतात. कल्पनाशक्ती कौतुकास्पद आहे. अभिव्यक्ती कौशल्यांमुळे सर्वत्र लोकप्रिय असतात. स्वतंत्र, निर्भय आणि स्पष्टवक्ता असतात. आत्मविश्वास मजबूत असतो. या लोकांना समाजात खूप आदर मिळतो. परंतु ते छोट्या गोष्टींवरून लवकर चिडतात. सूतावरून स्वर्ग गाठतात. हे लोक कधी निराश होत नाहीत. अडचणी, समस्या आल्या, तरी त्यातून मार्ग काढण्यासाठी कायम प्रयत्नशील राहतात.
चांगले कमावतात, पण पैसा टिकवू शकत नाहीत
मूलांक ७ चे लोक शिक्षणावर आणि करिअरवर लक्ष केंद्रित करतात. कला आणि गूढ शास्त्रांमध्ये रस असतो. त्यांचा जिज्ञासू स्वभाव त्यांना यश मिळवून देतो. हळूहळू ते शास्त्रांमध्ये ज्ञानी होतात. मूलांक ७ च्या लोकांनी चांगले पैसे कमवले तरी ते चांगली बचत करू शकत नाहीत. ते सामान्यतः कमी खर्च करतात, परंतु जेव्हा दानधर्माचा विचार केला जातो तेव्हा ते भरपूर खर्च करतात. यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती मध्यम राहते.
स्वभाव साधा सरळ सकारात्मक, संशोधनात असतो रस
मूलांक ७ असलेल्यांचे भावंडांशी चांगले संबंध असतात. ते सहसा बुद्धिजीवींशी मैत्री करतात, परंतु ही मैत्री टिकत नाही. त्यांचे कायमचे मित्र फार कमी असतात. मूलांक ७ असलेल्या व्यक्तींचा स्वभाव साधा सरळ असतो. ते मनाने निर्णय घेतात. त्यांना त्यांच्या कुटुंबाची काळजी असते. ते अत्यंत भावनिक असतात. त्यांचा स्वभाव इतका मैत्रीपूर्ण आहे की, ते कोणालाही आपलेसे करू शकतात. ते जिथे जातात तिथे एक चांगले, सकारात्मक वातावरण आणतात. मूलांक ७ असलेले लोक थोडे गूढ असतात. गर्दीत जाण्यापेक्षा ते एकटे राहणे पसंत करतात. ते गंभीर, सखोल विचार करणारे असतात. संशोधन आणि अध्यात्मात रस घेतात.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
Web Summary : Numerology: Those born on the 7th, 16th, or 25th are ruled by Ketu. These individuals are service-oriented, independent, and spiritual. They are also prone to spending on charity. They are inquisitive, knowledgeable, and value family.
Web Summary : अंक ज्योतिष: 7, 16 या 25 तारीख को जन्म लेने वाले केतु द्वारा शासित होते हैं। ये व्यक्ति सेवा-उन्मुख, स्वतंत्र और आध्यात्मिक होते हैं। वे दान पर खर्च करने के लिए भी प्रवृत्त होते हैं। वे जिज्ञासु, जानकार और परिवार को महत्व देते हैं।