शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

मनात आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 20:24 IST

सुख-दु:ख समान मानून मनाची स्थिती स्थिर ठेवायची असते. आपणच आपल्या मनाला समजावू शकतो. आपणच आपल्या मनाला घडवू शकतो.

कोणतीही वृत्ती प्रथमत: मनात निर्माण होते. मनाने ठरवले तर हात, पाय, वाचा, दृष्टी इत्यादी इंद्रियाकडे ते धाव घेते. ज्याप्रमाणे बाहुलीला दोरी जिकडे नेईल तिकडे बाहुली जाते, त्याचप्रमाणे मनाप्रमाणेच सर्व इंद्रिये कार्य करतात. मन हे सर्व इंद्रियांच्याद्वारे धाव घेते. आज सध्याच्या घडीला कोरोने विषाणूच्या महामारीमुळे सर्वांची मने धास्तावली आहेत. मनाला आधार देणे गरजेचे आहे. मनात आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. मन स्थिर बनवा. मनाला या दु:खापासून हटवा. स्वत:ची काळजी घ्या. मनाला आराम द्या, मनाला भरकटू देऊ नका. मनानेच मनपण राखायचे आहे. आपल्या मनाने धास्ती घेतली की, आपण हारतो. मनाने खंबीर बनून येणाऱ्या संकटांना तोंड द्या. या विश्वात जी गोष्ट निर्माण होते तिचा नाश अटळ असतो. तसा या कोरोना विषाणू महामारीचा नाश अटळ आहेच. थोडा काळ जावा लागेल. कोणत्याही बाबतीत शुभ संकल्प करावेत. आपले मन कशाशीही चिकटता कामा नये. मनाला स्थिर करण्यासाठी सकाळी ध्यान व योगाचा आधार घ्या. नाना प्रकारच्या दु:खानी ग्रासलेल्या मानसिकतेतून बाहेर पडा. आहे त्या परिस्थितीशी एकरूप व्हा. मनातून भीती काढून टाका. मनाच्या वरून तुमच्या सुखाची पावती मिळते. मग दु:खी असले तर शरीरावर त्याचा परिणाम होतो. ज्याप्रमाणे अंकुराचा लुसलुशीतपणा हा जमिनीचा मृदूपणा सांगतो, त्याप्रमाणे मनुष्याच्या हावभावावरून त्याच्या मनाचा स्वभाव सांगता येतो. मनाला भ्रांतीत अडकवू नका. मनातून मुळासकट कोरोनाची भीती घालवा. कोणत्याही वेळी, कशानेही न मळता आपण मनाने स्वच्छ राहावे. शरीराद्वारे घडणाऱ्या हालचाली मनाच्या मार्गाने घडतात म्हणून मनाला सावरा. मनाची स्थितीच सुख-दु:खांना कारणीभूत आहे. म्हणून मनाची स्थिरता महत्त्वाची आहे. या चंचलरूपी मनाला सावरायचे झाले तर १० मिनिटे का होईना मौनात राहा. ज्याच्या योगाने मन शांत होईल. मौनाच्या संगतीने मनाला शांत करा. जीवनात अनेक गोष्टी मनाविरुद्ध घडतात. या प्रपंचरूपी डोहात सगळे आपल्या मनासारखे होत नसते. जरी एखादी घटना घडली तरी आपले मन परत-परत इच्छा करते. या संसाररूपी सागरात मन नेहमी भटकत असते. त्याला सुखाची अपेक्षा असते. परंतु सुख-दु:ख समान मानून मनाची स्थिती स्थिर ठेवायची असते. आपणच आपल्या मनाला समजावू शकतो. आपणच आपल्या मनाला घडवू शकतो.- डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)