शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

Navratri 2025 Date: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 13:57 IST

Shardiya Navratri 2025 Start Date: Navratri 9 Days 9 Colours: नवरात्रीचा उत्सव म्हणजे चैतन्य, आनंद, उत्साह आणि अध्यात्माचा सुंदर मेळ, त्याबरोबरच उत्सवाचे स्वरूप जाणून घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

Navratri 2025 Start Date: २१ सप्टेंबर रोजी पितृपक्षाची (Pitru Paksha 2025) सांगता होऊन २२ सप्टेंबर पासून शारदीय नवरात्र (Shardiya Navratri 2025) सुरु होत आहे. ठिकठिकाणी नवरात्री तयारीही सुरू झाली आहे. घरातून गृहिणींची आवराआवरीची लगबग सुरु आहे. तरुणांना गरब्याचे, दांडियाचे वेध लागले आहेत आणि ते कमी म्हणून की काय, तर नवरात्रीच्या नऊ रंगांच्या कपड्यांची जुळवाजुळव सुरु आहे. एकूणच सर्वत्र उत्सवाचे, जल्लोषाचे वातावरण तयार होत आहे. मात्र हा उत्सव आपण का साजरा करतो, ते आधी जाणून घेतले पाहिजे. चला तर जाणून घेऊया देवीच्या नवरात्रीचे महत्त्व!

पौराणिक पार्श्वभूमी :

देवीची नवरात्र आपण साजरी करतो. कारण शरद ऋतूमध्ये अश्विन महिन्याच्या प्रतिपदेपासून नवमी पर्यंत तिने महिषासुर नावाच्या राक्षसाशी घनघोर युद्ध केलं आणि त्याचा दारुण पराभव करून दहाव्या दिवशी विजयश्री मिळवली म्हणून विजयादशमी साजरी करतो. या विजयोत्सवाची आठवण म्हणून नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याचा दहावा दिवस आपण देवीची पूजा अर्चा करतो, जागरण करतो, दानधर्म करतो आणि उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी भोंडला,गरबा, दांडिया खेळत आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करतो. 

घटस्थापनेचा अर्थ (Reason behind Ghata Sthapana 2025):

नवरात्रीत बसवले जाणारे घट हे पृथ्वीचे प्रतीक मानले जातात. त्यात पाणी भरून पंचमहाभूतांची पूजा केली जाते. हा घट मातीवर ठेवून त्या मातीत नवधान्य पेरले जाते. नऊ दिवसांत सर्वात अधिक फोफावणारे धान्य पाहून शेतकरी राजाला कोणते पीक पुढील वर्षात जास्त येणार याचा अंदाज बांधता येतो. उपासनेचा भाग म्हणून या ऋतूमध्ये सर्वात जास्त उपलब्ध असणाऱ्या झेंडूच्या फुलांच्या माळा रोज एक याप्रकारे नऊ दिवस घाटावर बांधल्या जातात. दहाव्या दिवशी पूजेचे उद्यापन म्हणून तो घट हलवला जातो. निसर्गाने जे काही दिले आहे, ते सर्व जतन करून संवर्धन करण्याचा बोध या घटस्थापनेच्या कृतीतून मिळतो. पावसाचे पाणी घटासारखे अडवून पाणीसाठा केला तर दुष्काळ जन्य परिस्थिती उद्भवणार नाही, हा संदेश मिळतो. 

घटस्थापनेचा शुभ मुहूर्त (Navratri 2025 Ghatasthapana Muhurat)

२२ सप्टेंबर २०२५ 

  • शुभ मुहूर्त : सकाळी 6.09 वाजेपासून ते सकाळी 8.06 वाजेपर्यंत आहे.
  • अभिजित मुहूर्त : सकाळी 11.49 वाजेपासून ते दुपारी 12.38 वाजेपर्यंत आहे. 

नवरात्र उपासना (Navratri Upasna 2025) :

या दहा दिवसांत सप्तशतीचे पाठ वाचून, त्यातील मंत्र जप करून देवीच्या विविध शक्तिरूपाची पूजा केली जाते. यात शांती, क्षुधा (भूक), तृष्णा (तहान), निद्रा, लक्ष्मी, सरस्वती, सावली, वात्सल्य ही सगळीच रूपं शारीरिक आणि मानसिक बळ देतात म्हणून या सप्तशतीतील सिद्धमंत्र म्हटले जातात. कुंकुमार्चन केले जाते, कुमारिकांचे पूजन केले जाते, सवाष्ण ओटी भरून जेऊ घातली जाते, तसेच नऊ दिवस देवीची आरती म्हणून, ओटी भरून, जोगवाही मागितला जातो. काही जण उपास करतात, कोणी अनवाणी चालतात, कोणी नामस्मरण, स्तोत्रपठण करतात. भौतिक सुखातून मन वळवून अध्यात्मात, भगवंत चिंतनात वेळ घालवावा आणि ऊर्जा संपादन करावी हा त्या कृतीमागचा हेतू असतो. 

हादगा, भोंडला : (Bhondla 2024)

नवरात्रीत गरबा, दांडिया खेळतात हे आपल्याला माहीत आहे, पण कोजागिरी पौर्णिमेपर्यंत सुरु असणारा भोंडला नव्या पिढीला कदाचित परिचयाचा नसेल. तरी अजूनही काही ठिकाणी भोंडला खेळला जातो. भोंडल्याची मजेशीर गाणी म्हणत मनावरचा ताण घालवला जातो. प्रत्येक जण काही ना काही खाऊ घरून घेऊन येतात, तो बाकीच्यांनी ओळखायचा, यालाच खिरापत ओळखणे म्हणतात. मग सगळ्यांनी आणलेला सगळा खाऊ सगळ्यांना पुरेल या बेताने वाढला जातो. पाटावर खडूने, रांगोळीने किंवा तांदुळाने हत्तीचा आकार काढला जातो. हत्ती हे लक्ष्मीचे वाहन म्हणून त्याचे पूजन केले जाते, शिवाय हस्त नक्षत्रावर कोसळणारा धो धो पाऊस, निसर्गाची भावी तरतूद करून जातो, पृथ्वी सुजलाम सुफलाम करून जातो, त्याबद्दल कृतज्ञता म्हणूनही हत्तीची पूजा करून त्याभोवती फेर धरला जातो. 

नवरात्रीमधील सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्यातून होणारे लाभ : (Navratri Cultural Program 2024)

उत्सवाच्या निमित्ताने श्रीसूक्त या वैभव देणाऱ्या स्तोत्राचे सामूहिक पठण केले जाते. नऊ दिवस नऊ ठिकाणी भोंडला, हातगा खेळला जातो. त्यानिमित्ताने गृहिणी, नोकरदार महिला नटून थटून एकत्र येतात, पारंपरिक गाणी म्हणतात, रात्री गरबा खेळून जागरण करतात, खिरापत ओळखण्याचा कार्यक्रम करतात, खाऊ खातात आणि तना-मनाचा ताण घालवून शब्दश: 'मोकळ्या' होतात. सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने स्त्रियांसाठी हे एकप्रकारचे आउटलेट आहे, असे म्हणतात येईल. जे नितांत गरजेचे आहे. नवरात्रीमुळे तो हेतू देखील साध्य होतो. फक्त त्यात अश्लील नृत्य तसेच शरीर प्रदर्शन करणाऱ्या कपड्यांचा वापर टाळला पाहिजे, तरच उत्सवाचे पावित्र्य जपले जाईल. 

यंदाचे नवरात्रीचे नवरंग पुढीलप्रमाणे (Navratri 9 Colors 2025): 

22 सप्टेंबर 2025, सोमवार, पांढरा रंग ⚪

23 सप्टेंबर 2025, मंगळवार, लाल रंग 🔴

24 सप्टेंबर 2025, बुधवार, निळा रंग 🔵

25 सप्टेंबर 2025, गुरुवार, पिवळा रंग 🟡

26 सप्टेंबर 2025, शुक्रवार, हिरवा रंग  🟢

27 सप्टेंबर 2025, शनिवार, राखाडी रंग 🔘

28 सप्टेंबर 2025, रविवार, केशरी रंग  🟠

29 सप्टेंबर 2025, सोमवार, मोरपंखी रंग 🟢

30 सप्टेंबर 2025, मंगळवार, गुलाबी रंग 🔴

टॅग्स :Navratri Mahotsav 2025शारदीय नवरात्रोत्सव २०२५Puja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणcolourरंगspiritualअध्यात्मिकLaxmi Pujanलक्ष्मीपूजनTempleमंदिरNavratriनवरात्री