शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Navratri 2025 Puja Vidhi: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 16:05 IST

Navratri Ghatasthapana Vidhi in Marathi: २२ सप्टेंबर रोजी नवरात्रीचा पहिला दिवस आहे, त्या दिवशी घटस्थापना कशी आणि कोणत्या मुहूर्तावर करावी याबाबत सविस्तर जाणून घ्या.

Navratri 2025 Puja Vidhi in Marathi: आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्र सुरू होते. यंदा २२ सप्टेंबर रोजी नवरात्र (Navratri 2025) प्रारंभ होत आहे. नवरात्रीनिमित्त अनेक घरात घटस्थापना(Ghatasthapana 2025) करण्याचा कुळाचार आहे. अनेक जणींना घटस्थापना करण्याची इच्छा असते, परंतु शास्त्रशुद्ध पद्धत माहित नसते. चला तर जाणून घेऊया घटस्थापनेचा आणि नवरात्री उत्थापनाचा शास्त्रशुद्ध विधी!

Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा

घटस्थापना विधी (Navratri Ghatasthapana Puja Vidhi 2025): 

घट बसतेवेळी देवीची पूजा करावी. पूजा केलेला टाक घ्यावा. अभिषेक करावा नंतर स्थापना करावी. स्थापना करण्यापूर्वी प्रथम पाट घ्यावा. त्यावर गहू पसरून पाण्याने भरलेला कलश ठेवावा. पाण्यात पैसे, सुपारी घालावी. तांब्यावर गव्हाने भरलेले लहान ताम्हन ठेवावे. त्यात देवीचा टाक ठेवावा. 

हळद-कुंकू गंध, फुल यांनी पूजा करावी. या दिवशी गव्हाचे महत्त्व जास्त असते. पाटापुढे शंख, घंटा ठेवावी. खाली पत्रावळ ठेवून पत्रावळीवर चाळलेली काळी माती टाकून गहू, पुन्हा माती, पुन्हा गहू पेरावेत. असे दोन तीन वेळा करावे. मध्ये पेल्यासारखे भांडे ठेवून त्यांची पूजा करावी. 

सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 

यात पाणी, हळद, कुंकू वाहून फुलांची माळ करून त्यावर सोडावी. कलशाची पूजा करावी. पाटावर रांगोळी काढावी. कारळ्याच्या फुलांची किंवा झेंडुच्या फुलांची माळ करावी. ही फुले मिळाली नाहीत, तर अन्य कोणत्याही सुवासिक फुलांची माळ नवरात्रीत नऊ दिवस घटावर रोज एक याप्रमाणे बांधावी. 

शक्य झाल्यास नवरात्रीत नऊ दिवस चोवीस तास समई तेवत ठेवावी. ज्या दिवशी एका तिथीचा क्षय असेल त्या दिवशी दोन वेळा माळा घालून नऊ दिवसांच्या माळा पूर्ण कराव्यात. रोज आपण फराळाचे जिन्नस करतो, त्यांचा नैवेद्य दाखवून नंतर फराळ करावा. रोज सायंकाळी देवीची आरती, जप, पोथीवाचन करावे.

घटस्थापना शुभमुहूर्त (Navratri 2025 Ghatasthapana Puja Shubh Muhurat):

२२ सप्टेंबर रोजी, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, कलश स्थापनाचा शुभ मुहूर्त सकाळी ६:०० ते ८:०० वाजेपर्यंत असेल. अभिजित मुहूर्त सकाळी ११:४९ ते दुपारी १२:३८ पर्यंत असेल.

नवरात्र उत्थापन  विधी : 

रावणाशी युद्ध करण्यापूर्वी त्यात यश मिळावे म्हणून श्रीरामांनीदेखील नवरात्र व्रत केले होते. रावणवध दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी केला. म्हणून काहीजणांकडे नवरात्र दसऱ्याच्या दिवशी उठवण्यात येते. तर काही जणांकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीला सायंकाळनंतर उठवण्यात येते.

नवरात्र उठते वेळी प्रथम देवीची पूजा करून घटाला माळ घालून करावी. नंतर माळ वर खुंटीवर ठेवावी. टाक ताम्हनात घेऊन अभिषेक करावा. धुवून पुसून देवघरात स्थापना करावी व पूजा करावी. 

Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!

जेवणाचा नैवेद्य दाखवून, पुरणाचे दिवे तयार करून पुरणाची आरती करावी. पुरणाचे दिवे नऊ, पाच, सात असे करावेत सर्व दिवे लहान करावेत एक दिवा मोठा करावा. सर्व दिव्यात तूप आणि वात घालावी, मोठ्या दिव्यात हाताने केलेल्या दोरीच्या पाच वातीचा एक जुडगा लावावा. पुरणाची आरती करावी.

कलशातील पाणी घराच्या चारही दिशांना शिंपडून घ्यावे आणि बाकीचे तुळशीत ओतावे. दाराला आंब्याचे तोरण लावावे. दूध साखरेचा नैवेद्य दाखवून नवरात्रीचे उत्थापन करावे. 

जगदंब उदयोस्तु...!

टॅग्स :Navratri Mahotsav 2025शारदीय नवरात्रोत्सव २०२५Puja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणLaxmi Pujanलक्ष्मीपूजनNavratriनवरात्री