शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Navratri 2024: ३ ऑक्टोबरपासून अश्विन मास सुरू होत आहे; वाचा या मासातील मुख्य सणवार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 09:40 IST

Navratri 2024: शरद ऋतुच्या आल्हाददायक वातावरणात दसरा-दिवाळीसह या महिन्यात आणखी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते पाहू.

शिवपत्नी पार्वती म्हणजेच आदिशक्ती कालिमाता-भवानी-अंबा-जगदंबा-महालक्ष्मी हिची जी अनेक रूपे आहीत त्यामध्येच एक दुर्गेचे रूप आहे. घटस्थापना हा तिचा उत्सव आहे, सण आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत हे नवरात्र असते. यंदा ३ ऑक्टोबरपासून आश्विन मास सुरू होत आहे आणि त्याच्या पहिल्या दिवसापासून अर्थात प्रतिपदेपासून नवरात्रीचा (Navratri 2024) उत्सवही सुरू होत आहे. तर १२ ऑक्टोबर रोजी दसरा (Dussehra 2024) आहे. १७ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima 2024)आहे आणि २८ ऑक्टोबर रोजी वसुबारसेने दिवाळीची (Diwali 2024) सुरुवात होणार असून २९ ला धनत्रयोदशी (Dhan Teras 2024), ३१ ला नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi 2024), १ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन (Laxmi Pujan 2024), २ ला दिवाळी पाडवा (Diwali Padwa 2024) आणि ३ ला भाऊबीज (Bhai Duj 2024) असा क्रम असणार आहे. २ नोव्हेंबर पासून कार्तिक मास सुरू होणार असून वारकर्‍यांना विठू माऊलीच्या दर्शनाचे अर्थात कार्तिकी एकादशीचे (Kartiki Ekadashi 2024)वेध लागतील. ती १२ नोव्हेंबर रोजी असणार आहे. एकूणच अश्विन महिना प्रचंड धामधुमीचा, आनंदाचा, जल्लोषाचा काळ असणार आहे. त्याची सुरुवात घटस्थापनेने होणार आहे. त्याबद्दल थोडी अधिक माहिती घेऊ. 

घटस्थापनेसाठी मातीची एक वेदी करतात. त्यावर घट स्थापन करून त्याभोवती धान्य पेरतात. घटावरील पात्रामध्ये दुर्गेची मूर्ती ठेवतात. तिचवर रोज एक याप्रमाणे झेंडूच्या किंवा तिळाच्या फुलांच्या माळा सोडतात. नंदादीप नऊ दिवस तेवत ठेवतात. सप्तशतीचा पाठ म्हणतात. काही ठिकाणी या दिवशी रोज एका कुमारिकेला जेवावयास बोलवतात किंवा काही ठिकाणी सवाष्णीला जेवायला बोलवतात. घटस्थापना हा एक कुळधर्मच आहे. 

महिषघ्नी महामाये चामुण्डे मुण्डमालिनीद्रव्यआरोग्य विजयं देहि देवि नमोऽस्तुते।

महिषासुराला मारणाऱ्या महामाया, चामुंडा आणि गळ्यात मुंडक्यांची माळा धारण करणाऱ्या देवी, मी तुला वंदन करतो. तू मला धन, आरोग्य आणि विजयश्री दे' असा मंत्र घटपूजेच्या वेळी म्हणण्यात येतो. 

दुर्गापूजेचा हा उत्सव बंगालमध्ये फार मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. भारतातील सर्व राज्यातही तो कमी जास्त प्रमाणात साजरा होत असतो. रावणाशी युद्ध करण्यापूर्वी त्यात यश मिळावे म्हणून श्रीरामांनीदेखील नवरात्र व्रत केले होते. रावणवध दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी केला. म्हणून काहीजणांकडे नवरात्र दसऱ्याच्या दिवशी उठवण्यात येते. तर काही जणांकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीला सायंकाळनंतर उठवण्यात येते.

काहींच्याकडे घटस्थापनेसाठी मातीची वेदी केली जाते. घरच्या देवीचीही नऊ दिवस षोडशोपचारे पूजा केली जाते. काही जण घटस्थापना करून रोज एक एक माळ घटावर बांधतात. नवरात्रात काही ठिकाणी पशूबळी देण्यात येतो. 

या नऊ दिवसांत विशेषत: अष्टमीला काही घरांमध्ये जोगवा मागण्याचा कुळाचार आहे. देवीच्या नावाने इतरांच्या घरी जाऊन कोरड्या धान्याची भिक्षा मागतात व त्या धान्याचे भोजन नैवेद्य समजून घेतात, यालाच जोगवा म्हणतात. 

जोगव्याची अनेक गाणी प्रसिद्ध आहेत. पैकी एकनाथ महाराजांनी लिहिलेला जोगवा आजही एक सूरात घरोघरी गायला जातो...

अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासूर मर्दना लागुनी ।त्रिविध तापाची कराया झाडणी ।भक्तांलागोनी पावसी निर्वाणी ॥१॥आईचा जोगवा जोगवा मागेन । द्वैत सारुनी माळ मी घालीन ।हाती बोधाचा झेंडा मी घेईन । भेदरहित वारीसी जाईन ॥२॥नवविध भक्तिच्या करीन नवरात्रा ।करुनी पोटी मागेन ज्ञानपात्रा।धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा । दंभ संसार सांडिन कुपात्रा ॥३॥पूर्ण बोधाची घेईन परडी ।आशा तृष्णेच्या पाडीन दरडी ।मनोविकार करीन कुर्वंडी । अद्भूत रसाची भरीन दुरडी ॥४॥आता साजणी जाले मी नि:संग । विकल्प नवऱ्याचा सोडियला संग ।कामक्रोध हे झोडियेले मांग ।केला मोकळा मारग सुरंग ॥५॥ऐसा जोगवा मागुनी ठेविला ।जाउनी महाद्वारी नवस फेडिला ।एकपणे जनार्दन देखिला ।जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६॥

चला तर, आपणही आई जगदंबेचा जोगवा मागायला सज्ज होऊया...!

टॅग्स :Navratri Mahotsav 2024शारदीय नवरात्रोत्सव २०२४Navratriनवरात्रीDiwaliदिवाळी 2023Dasaraदसराkojagariकोजागिरी