शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

नवरात्रोत्सव: भक्तांची आर्त हाक अन् स्वामींचा अन्नपूर्णा अवतार; स्वरुप, कथा, मान्यता पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 12:26 IST

Swami Samarth Annapurna Story In Marathi: स्वामी समर्थ महाराजांच्या अन्नपूर्णा देवी स्वरुपाचे अनेक ठिकाणी पूजन केले जाते. जाणून घ्या...

Swami Samarth Annapurna Story In Marathi: नवरात्र सुरू आहे. नवरात्रात देवीच्या विविध स्वरुपांचे पूजन, नामस्मरण केले जाते. दत्तात्रेयांचे अवतार मानले गेलेले अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांची लीला अगाध असल्याचा प्रत्यत अनेकांना आला आहे. आजच्या काळातही स्वामींचे अनुभव आलेली माणसे हजारोंच्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात. स्वामीकृपेचा कृतकृत्य भाव प्रत्येकाच्या बोलण्यात, वागण्यात आल्याचे प्रकर्षाने दिसून येते. स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांना वेळोवेळी मदत केल्याच्या अनेक कथा, अनुभव भाविकांना आलेले असून, यातून स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीही एकटे पडू देत नसत, हेच स्पष्ट होते. अशाच एका प्रसंगात भक्तांसाठी स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्णा रुप धारण केले. स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरुपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते. जाणून घेऊया...

अन्नपूर्णा देवी पार्वतीचा अवतार आहे. भारतीय संस्कृती, परंपरांनुसार, घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानले जाते. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाजांनी अशाच एका प्रसंगी सेवेकऱ्यांना प्रसाद भोजन दिले. झाले असे की, एकदा रानातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद भटांसह सुमारे १०० सेवेकरी होते. दिवसभर चालून चालून त्या सर्वांना खूप भूक लागली होती. आणखी काही अंतर थोडे चालून पार केल्यानंतर स्वामी एका शेतात बसले. खुद्द स्वामी आलेत म्हटल्यावर तेथील शेतकऱ्यांनी स्वामींना फलाहार दिला, पाणी दिले. स्वामींनी फलाहार ग्रहण केला. मात्र, इतरांच्या भोजनाचे काय? हा प्रश्न सर्वांनाच पडला. 

तुम्ही सर्वांनी हे अन्न ग्रहण करावे

तेवढ्यात स्वामी सर्वांना म्हणाले की, त्या आम्रवृक्षाखाली जा. श्रीपाद भटांसह आलेल्या सेवेकऱ्यांना वाटले की, तेथे कोणीतरी जेवण देईल. श्रीपादभटांना मात्र स्वामींवर पूर्ण श्रद्धा होती, विश्वास होता. श्रीपाद भट काही न बोलता त्यातील काही सेवेकऱ्यांना घेऊन आम्रवृक्षाखाली गेले. तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती. श्रीपादभटांनी चौकशी केल्यानंतर ती महिला म्हणाली की, आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती. मात्र, अजून ती आलेली नाहीत. सूर्यास्त होत आला आहे. आता कोणी येईल, असे वाटत नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे अन्न ग्रहण करावे.

श्री स्वामी समर्थ महाराजांचे अन्नपूर्णा स्वरुपात सर्वत्र पूजन होऊ लागले

वृद्ध सुवासिनी महिलेने, शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपादभटांना दिला. ते सर्व जेवण घेऊन श्रीपादभट व अन्य सेवेकरी स्वामींकडे जाण्यास निघाले. श्रीपादभटांनी त्या सुवासिनी महिलेसही स्वामींकडे येण्याचा आग्रह केला. मात्र, तुम्ही पुढे चला मी मागाहून दर्शनाला येते, असे म्हणून त्यांनी श्रीपादभटांना पुढे पाठवून दिले. श्रीपाद भटांनी सर्व सेवेकऱ्यांना जेवण वाढून घेण्यास सांगितले. सर्व तृप्त झाले. अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांनीच सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन घातले, अशी सर्वांची श्रद्धा आहे. फार थोड्याचे भाग्य ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचे अन्नपूर्णा स्वरुपात सर्वत्र पूजन होऊ लागले, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

टॅग्स :Navratri Mahotsav 2023शारदीय नवरात्रोत्सव 2023Navratriनवरात्री