शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

Navratri 2022: आधी-व्याधी दूर करणारी आणि सुख सौभाग्य देणारी कुष्मांडा माता, तिची उपासना का व कशी करावी ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 13:53 IST

Navratri 2022: आधी-व्याधी दूर करणारी आणि सुख सौभाग्य देणारी कुष्मांडा माता, तिची उपासना का व कशी करावी ते जाणून घ्या!

>> ह.भ.प. योगेश्वर उपासनी महाराज ( राष्ट्रीय कीर्तनकार, भागवताचार्य )

आज अश्विन शुद्ध चतुर्थी... म्हणजेच श्री परांबा भगवती मातेच्या शक्ती जागरण महोत्सवातील चवथी माळ..आज आपण भगवतीच्या " कुष्मांडा "या श्री विग्रहाचे पूजन करणार आहोत. " कुष्मा+ण्ड ' या शब्दाचा मराठी अर्थ कोहळा /भोपळा किंवा आपण ज्याला भोरकोहळा म्हणतो ते फळ. कू ष्माण्डा या संस्कृत शब्दाची व्युत्पत्ती पुढीलप्रमाणे सांगितली आहे... " कु " म्हणजे काही, " उष्म " म्हणजे ताप किंवा ऊर्जा, आणि " अंड "म्हणजे ब्रम्हांड ! म्हणजेच जिच्या ऊर्जेच्या अंशातून या ब्रम्हांडाची निर्मिती झाली ती " कूष्माण्डा "

आपणास व्यवहारात अनुभव आहे की एखादे अलौकिक किंवा अतिभव्य कार्य करत असताना आपण नकळतच आपली चैन,मन:शांती, आनंद व चेह-यावरील स्मितहास्य घालवून बसतो. परंतु केवळ ऊर्जेच्या अंशातून ब्रह्मांडाची निर्मिती करणाऱ्या या भगवती कुष्माण्डेचे वर्णन मंद हास्य करत ब्रह्मांड निर्मिती करणारी देवता असे आहे. तिच्या त्या मंद,मंजुळ, मधुर व ब्रम्हांड निर्मिती करणाऱ्या हास्याला ग्रंथात "ईषित हास्य " असा विशेष शब्द वापरण्यात आलेला आहे. भगवतीच्या या श्री विग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे ती सर्वत्र विराजमान असून ती "सर्वव्यापिनी" आहे. ती अष्टभुजा म्हणजे आठ हात असलेली असून ती सिंह वाहिनी आहे. तिच्या आठही हातात तिने विविध प्रकारचे अस्त्र शस्त्र धारण केल्याचा उल्लेख मिळतो. तिच्या हातातील शस्त्र पुढील प्रमाणे.....

१) गदा २)धनुष्य ३)बाण ४)चक्र ५)कमलपुष्प ६)अमृतकलश ७)कमंडलू व आठव्या हातात साधकांना सर्व प्रकारच्या सिद्धी व निधी ( साधनेतून उपलब्ध ) करून देणारी ८)जपमाला  असा तिचा आठही हातातला अलौकिक शृंगार आहे. 

विश्व "दैत्य विहीन " करण्यासाठीच या कूष्माण्डा रूपामध्ये भगवतीचा प्रादुर्भाव झालेला आहे. तुलसी रामायणामध्ये परमात्मा श्रीरामचंद्रांच्या मुखातून श्री तुलसीदास जी म्हणतात " निषिचर हीन करहु मही " म्हणजे मी विश्व राक्षस विहीन करीन.भगवान श्री रामचंद्रांनी केलेला हा निर्धार  या राम वरदायिनी भगवतीने सुद्धा आचरणात आणलेला आपणास दिसतो.

ही भगवती कुष्मांडा  " आद्यस्वरूपी व आदिशक्ती  " असल्यामुळे साधकाने शांतचित्ताने, स्थिर व पवित्र मनाने तिची आराधना केल्यास साधकाचे सर्व रोग, शोक नाश पावतात असे तिच्या आराधनेचे फल ऋषी-मुनींनी वर्णन केलेले आहे. या बरोबरच साधकास आयुष्य, उत्तुंग यश, अतुलित बल व निरामय आरोग्याची प्राप्तीही या भगवतीच्या उपासनेतून होते. ही भगवती एका अर्थाने  " आशुतोषच "आहे. आशु म्हणजे तात्काळ व तोष म्हणजे आनंद /प्रसन्न होणारी! अतिशय अल्प उपासनेने किंवा अल्प भक्तीने प्रसन्न होऊन साधकाला "सुगमता" प्राप्त करून देणारी ही माता कुष्मांडा आहे. याचबरोबर आधी व्याधींपासून मुक्ती देणारी, सुख-समृद्धी आणि उत्कर्ष व वैभव देणारी ही माता आहे. दहाही दिशां मधून तिच्या ऊर्जेचा संचार असल्यामुळे ही एका अर्थाने " दशदिशा व्यापीनी "च आहे. या दहाही  दिशांना पादाक्रांत करून, व्यापून, भरून उरणाऱ्या तिच्या या श्री विग्रहाचे रहस्य पण समजून घेणे आवश्यक आहे. हि भगवती आपणास काही ज्ञान देऊ इच्छिते ती आपणास सांगते की मिळेल तिथून ज्ञानग्रहण करा.

ओम भद्रं कर्णे भि:,श्रुणुयाम देवा: ।भद्रं पश्येम अक्षभिर्र यजत्रा: ।स्थिर्रै रंग्रैर स्वस्तुवान् । स्वस्तर्नु भी: ।व्यशेम देव हितं यदायु: ।। ( ऋग्वेद )

ऋग्वेदातिल या प्रार्थनेचे प्रत्यक्ष प्रमाणच जणु....! दशदिशातून ज्ञान प्राप्ती करणे हे साधकाचे सतत ध्येय असले पाहिजे. 

दाही दिशांना जाऊ फिरू मेघासम आकाश भरू ।   अथक निरंतर परिश्रमाने या भूमीचा स्वर्ग करू।।क्षेत्र कुठेही रिक्त राहिले  हे आता होणे नाही ।दानवतेच्या विष वल्ली चे कोठेही बेणे नाही ।देवत्वाचे भरुनी अमृत नवरचना निर्माण करू।या भूमीचा स्वर्ग करू ।।हा निर्धार अंगी बाणणार्याचि मुर्तीमंत प्रेरणाच....!

साधकाने क्रमशः कोणत्या दिशेतून काय मिळवावे, काय प्राप्त करावे याचे मार्गदर्शन ही भगवती करते, ते आपण बघूया......

१)  पूर्व दिशा:-- पूर्व दिशा नेहमी साधकाला त्याच्या ध्येयसिद्धीची प्रेरणा देत असते. ती साधकाला सांगते पुढे बघ व अविरत चालत रहा......चरैवेति चरैवेति चराती चरतो भग: साधना करत असताना हा साधकाचा सतत निर्धार असला पाहिजे.  अंतरी जिद्द ठेवून दूरदर्शीत्वाने साधनेची वाटचाल करत रहा हे ही पूर्व दिशाआम्हास सुचवते. मुक्त कैवल्य तेजोनिधी, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, श्री ज्ञानेश्वर माऊली आपल्या भावार्थदीपिकेत पूर्वेचे महत्व सांगताना म्हणतात......

जैसी  पूर्व दिशेचा राउळी। उदयाची सूर्ये दिवाळी।की येरीही दिशा तियेंची काळी । काळीमा नाही।।सूर्ये अधीष्टिली प्राची । जगा राणीव दे प्रकाशाची।  तैसी श्रोतयां ज्ञानाची । दिवाळी करू ।।

 २)पश्चिम :-- पश्चिम दिशा ही आपल्या पाठीशी असते, साधकाने ध्येयाप्रती वाटचाल करत असताना आपल्या पाठीशी काय आहे?  आपण मागे काय सोडून आलेलो आहोत?  याचे सतत अनुसंधान ठेवणे गरजेचे असते. थोडक्यात ध्येयप्राप्तीच्या वाटचालीमध्ये सिंहावलोकन करून आपण कुठपर्यंत पोहोचलो आहोत याचा सतत अभ्यास ही पश्चिम दिशा आपल्याला शिकविते.  मागील चुकांमधून शिकून नवीन मार्गक्रमणाची जिद्द ही पश्चिम दिशा आपणास शिकविते.

३) उत्तर :-- उत्तर ही कुबेराची दिशा म्हटली आहे, कुबेर म्हणजे संपत्तीचा मालक. त्याचप्रमाणे उत्तर दिशेला अढळ असलेला ध्रुवतारा आहे. श्रीमद् भागवतातील" साधक ध्रुव " हा सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून ध्येयप्राप्ती करणाऱ्या साधकांचे "आदर्श गंतव्य" म्हणून सांगितला आहे. या अढळ तार्या सारखी आपली साधना अचल, अढळ व गतिमान ठेवून एकाग्रतेने ध्येय साधण्याची जिद्द या उत्तर दिशेतून आपण स्वीकारावी असे कुष्मांडा भगवती आपणास शिकविते.  साधकाने  " कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे " असे समर्थ रामदासही सांगतात.

४) दक्षिण :--  ही यमाची दिशा समजली जाते.  बजरंग बली हनुमान आदिशक्ती स्वरूप असलेल्या भगवती सीता मातेचा शोध घेण्यासाठी दक्षिणेकडेच उड्डाण करून गेले. आणि दक्षिणेतल्या लंकेत जाऊन आतताई रावणाच्या लंका दहनाचे कार्यही हनुमंताने केले. दक्षिण दिशा वेळ आणि काळाची जाणीव ठेवून साधकाने वाटचाल कशी करावी हे आपणास शिकवते. इंग्रजीत TIME IS MOMEY  म्हटले आहे. पण साधकासाठी टाईम म्हणजे काळ, हा मनी पेक्षा जास्त मौल्यवान असतो याची जाणीव व्हावी म्हणून श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात, " रिकामा अर्ध घडी राहू नको!''

प्रति श्वासं सविश्वासं रामं वद दिने दिने ।को विश्वास: पुन: श्वास: आगमिष्यति वा न वा ।।

असे आपल्याला सांगून ठेवलेले आहेच.

" घटिका जाती पळे  जाती तास वाजे झणांणा ।आयुष्याचा नाश होतो राम कांरे म्हणा ना?।।

हा प्रश्न साधकाने स्वतःला विचारला पाहिजे असेच जणू समर्थ रामदास आपल्याला यातून सुचवितात. यानंतर ईशान्य,अग्नेय, वायव्य व नैऋत्य या चारही उपदिशा मधून साधकाने साधन व साध्यासाध्य विवेकाचा तौलनिक अभ्यास करून, वेळेचे भान ठेवून,(काळ,काम, वेगाचे गणित ) चित्तात समत्व आणून, ध्येय प्राप्तीसाठी निरंतर वाटचाल करण्याची जिद्द शिकावी, असे यातून आपल्याला सुचित केले आहे.

 ऊर्ध्व म्हणजे वरची दिशा:-- यशप्राप्तीसाठी ध्येयाकडे नेहमी सतत लक्ष असणे गरजेचे आहे पण त्याच बरोबर आपल्या मुळाशी असलेले आपले अनुसंधान तुटता कामा नये याची सतत जाणीव ठेवली पाहिजे.  श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात......

देह तरी वारिली कडे ।आपुलिया परी हिंडे । परी बैसकां न मोडे । अंतरीची ।।

अशी साधकाची अवस्था असली पाहिजे. आपला पाया हा मजबूत, व्यापक व सिद्धांतपूर्ण असला पाहिजे. पाया मजबूत असेल तर भरारी उत्तुंग घेता येते किंवा श्रेष्ठतम ध्येय गाठता येते. 

पथका अंतिम लक्ष नही है सिंहासन चढते जाना ।सब समाजको लिये साथ मे आगे है बढते जाना ।।

"सर्वेशां अ विरोधेन" " समष्टी कल्याण" हे अ-व्याहत ध्येय असावे. भगवतीच्या या श्री विग्रहाचा साधकाच्या अनाहत चक्रामध्ये वास आहे. या अनाहत चक्रातील नाद शून्य साधना साधकाने केल्यास त्याला ऐहिक उन्नती व वैश्विक प्रभुता प्राप्त होते. अशाप्रकारे कोणत्याही प्रकारचा गोंधळ गोंगाट न करता शांतपणाने साधना करणाऱ्या ध्येय सिद्ध साधकांची मांदियाळी दशदिशा मध्ये फिरून सगळीकडे " अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आता " या वैश्विक मोक्षाची अनुभूती मिळवण्यासाठी कटिबद्ध व्हावे हेच या भगवतीच्या चरित्रातून आपण शिकणे गरजेचे आहे. या प्रकारच्या समर्पित साधकांची संघशक्ती जागृत करण्याची वृत्ती आमचे ठाई निर्माण होवो म्हणून त्या भगवती कुष्मांडेस शरण जाऊन तिला प्रार्थना करूया आणि म्हणूया.......

सुरा संपूर्ण कलशं रुधिरा प्लुत मेवच ।दधाना हस्त पादाभ्यां कुष्मांडा शुभदास्तुमे।। 

हे भगवती कुष्मांडे....! आम्हांस राष्ट्रमाता भारत मातेस  " विश्वगुरू पदी " स्थापन करण्याची जिद्द व निष्ठा अंगी बाणु दे व  त्यास्तव आजिवन कार्य करण्याची प्रेरणा सतत दे अशी तिला प्रार्थना करून म्हणूया......उदयोस्तु जगदंब उदयोस्तु.......

अक्षर योगी :  94 222 84 666 /  79 72 00 28 70

टॅग्स :Navratriनवरात्री