शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
4
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
5
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
6
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
7
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
8
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
9
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
10
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
11
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
12
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
13
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
14
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
15
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
16
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
17
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
18
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
19
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
20
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला

Navratri 2022: तिसरी माळ : वाईट लहरी, नैराश्य यांना पळवून लावणारी देवी चंद्रघंटा हीचा शत्रूवर किती दरारा होता बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 07:00 IST

Navratri 2022: हिंदू देवी देवता केवळ आशीर्वाद देणाऱ्या नाही तर प्रसंगी युद्ध करून शत्रूंचा नि:प्पात करणाऱ्या आहेत, म्हणून त्या शास्त्र आणि शस्त्रधारी आहेत. देवीचे हे रूप त्याचेच प्रतीक!

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी भगवतीचे `चंद्रघण्टा' या नावाने पूजन होते. देवीचे हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे. देवीच्या या रूपात, तिच्या मस्तकावर घण्टेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे, याच कारणाने तिला चंद्रघण्टा म्हटले जाते. 

अतिशय तेजस्वी रूप धारण केलेली देवी चंद्रघण्टा श्रीसुक्तात वर्णन केल्याप्रमाणे हिरण्यवर्ण अर्थात सुवर्णतेजाची झळाळी ल्यालेली आहे. तिला दहा हात आहेत. या दहा हातांमध्ये खड्ग, बाण आणि अन्य शस्त्रास्त्र हाती घेतली आहेत. देवी सिंहारूढ झाली आहे. दैत्यांचा पराभव करण्यासाठी देवी ज्यावेळेस रणांगणावर उतरली, तेव्हा तिच्या नुसत्या घंण्टेच्या नादाने त्रिलोक हादरले. 

नवरात्रीच्या पूजेत तिसऱ्या दिवसाचे अधिक महत्त्व आहे. या दिवशी साधकाचे मन `मणिपूर' चक्रात प्रवेश करते. या स्थितीत गेलेल्या साधकाला देवी चंद्रघण्टेच्या अस्तित्त्वाची जाणीव होते, तसेच दिव्य सुगंध तसेच दिव्य ध्वनी यांचीही अनुभूती येते, असे म्हणतात.

देवी चंद्रघण्टेच्या आशीर्वादाने साधकाचे पापक्षालन होते व ध्येयाआड येणारी संकटे दूर होतात. देवीची आराधना निश्चितच फलदायी आहे. परंतु, देवीचे रूप साधकाला, कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचे बळ देते. तिचे वाहन सिंह, पराक्रमी आणि निर्भय होण्याची शक्ती देते. तिचा घण्टानाद भक्तांना वाईट ध्वनीलहरी तसेच निराशाजनक विचारांपासून दूर ठेवतात.

दुष्टांचे दमन आणि विनाश करण्यात सदैव तत्पर असूनही देवीचे रूप अतिशय सात्विक आहे. जे पाहताच साधकाला प्रचंड दिलासा मिळतो, मन:शांती मिळते. म्हणूनच असे म्हटले जाते, की देवी चंद्रघण्टेची उपासना करणाऱ्या उपासकाला बुद्धी, शौर्य, तेज याबरोबरच विनम्रताही अंगी बाणली जाते.  देवीच्या मुखावरचे अलौकिक तेज भक्तालाही लाभते. देवी आपल्या करुणामयी दृष्टीने प्रत्येक उपासकावर प्रेम, वात्सल्य आणि मायेचा वर्षाव करते आणि दुष्टांना दंड देते. 

आपल्यालाही काया, वाचा आणि मनाने देवीला सर्वस्व अर्पण करायचे असेल, तर तिच्याठायी निस्सिम श्रद्धा हवी. देवीकडे ऐहिक सुखांची मागणी न करता, तिच्यासारखेच शूरत्त्व, वीरत्त्व मागावे. समाजकंटकांचा नायनाट करण्यासाठी बळ मागावे. आपण ज्या आराध्य दैवताची उपासना करतो, त्याचे थोडे तरी गुण आपणही अंगिकारले पाहिजेत. अन्यथा शक्तीउपासक म्हणवून घ्यायचे आणि संकटकाळी पळ काढायचा, असा दुटप्पीपणा देवीला आवडत नाही. अन्याय करणाऱ्या इतकाच अन्याय सहन करणाराही गुन्हेगार असतो. आपल्या दैवतांनी नेहमीच प्रसंगाशी दोन हात करण्याची शिकवण दिली आहे. म्हणून देवीच्या पूजेइतकाच आपल्या कर्तत्त्वाचाही डंका वाजेल, तेव्हा शत्रू भयवंâपित होऊन दुष्कृत्य करण्यास धजावणार नाही. ही मानसपूजाच देवीलाही अपेक्षित आहे. आपण ती करूया आणि एकमुखाने म्हणुया, जगदंब उदयोऽऽस्तु!

टॅग्स :Navratriनवरात्री