शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
3
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
4
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
5
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
6
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
7
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
8
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
9
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
10
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
11
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
12
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
13
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
14
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
15
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
16
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
17
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
18
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
19
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
20
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?

Navratri 2021: दुसरी माळ : तपश्चर्येशिवाय काही मिळत नाही, हे शिकवणारी देवी ब्रह्मचारिणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2021 8:00 AM

Navratri 2021: ब्रह्मचरिणी देवीचे हे रूप अनंत फळ देणारा आहे. देवीच्या उपासनेत मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य, सदाचार, संयमात वृद्धी होते. आयुष्यातील संघर्षमयी प्रसंगातही मन विचलित होत नाही.

आई भगवतीचे नवरात्रीतले दुसरे रूप आहे ब्रह्मचारिणीचे! इथे ब्रह्न हा शब्द तपश्चर्या या अर्थी वापरला आहे. ब्रह्मचारिणी अर्थात तपश्यर्या करणारी. वेद, तत्व आणि तप हे ब्रह्न शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ब्रह्मचारिणी हे देवीचे स्वरूप पूर्ण ज्योतिर्मय आणि भव्य आहे. तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलु आहे.

पूर्वजन्मात ब्रह्मचारिणी देवीने हिमालयाच्या वंशात जन्म घेतला होता. तेव्हा महर्षी नारद यांच्या मार्गदर्शनावरून तिने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप मोठी तपपश्चर्या केली होती. याच अत्यंत अवघड तपश्चर्येमुळे तिला ब्रह्मचारिणी म्हणून ओळखले जाऊ लागले. देवीने एक हजार वर्षे फळे आणि कंदमुळे खाऊन तपश्चर्या केली होती. नंतरची शंभर वर्षे फक्त भाज्या खाऊन  तर कधी जमिनीवरो पडलेली बेलपत्रे खाऊन आणि उर्वरित वर्षे कडक उपास करत ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता घोर तपश्चर्या केली होती. देवीने अन्नत्याग करत हळू हळू बिल्वपत्रांचे सेवनही बंद केले, म्हणून तिला `अपर्णा' असेही नाव मिळाले. 

हजारो वर्षे तपश्चर्या केल्यामुळे ब्रह्मचारिणी देवीच्या मुखावर तेज आले, मात्र शरीर कृष झाले, क्षीण झाले. तिची अशी अवस्था पाहून आई मेनाला तिची काळजी वाटत असे. तिला तपश्चर्येतून जागे करण्यासाठी आईने बऱ्याचदा हाक मारली, ती हाक `उ मा' या नावे गाजली आणि देवीला आणखी एक नाव मिळाले, उमा!

देवीच्या कठोर तपश्चर्येमुळे तिन्ही लोकांत हाहा:कार माजला. देवता, ऋडि, सिद्धगण, मुनि सर्वांनाच देवी ब्रह्मचारिणीच्या तपश्चर्येचा हेवा वाटू लागला. शेवटी खुद्द ब्रह्मदेव आले आणि त्यांनी प्रसन्न होऊन आकाशवाणी केली, `हे देवी, आजवर एवढी कठोर तपश्चर्या कोणीही केली नाही. ती फक्त तूच करू जाणे. तुझ्या तपश्चर्येची चर्चा युगानुयुगे केली जाईल. तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान चंद्रमौळी तुला पतिरूपात प्राप्त होईल. आता तू तुझी तपश्चर्या थांबव. लवकरच तुझे वडील तुला घ्यायला येतील, त्यांच्याबरोबर तू परत जा.'

ब्रह्मदेवांचे शब्द खरे ठरले आणि देवीचा भगवान शंकराशी विवाह झाला. ब्रह्मचरिणी देवीची ही कथा दर नवरात्रीत ऐकली जाते. तिच्यासारखी आपणही इप्सित गोष्टीच्या प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली पाहिजे, हा त्यामागचा हेतू.

Navratri 2021 : पहिली माळ : स्वाभिमानी, तपस्विनी, व्रतस्थ अशा शैलपुत्रीची कहाणी!

ब्रह्मचरिणी देवीचे हे रूप अनंत फळ देणारा आहे. देवीच्या उपासनेत मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य, सदाचार, संयमात वृद्धी होते. आयुष्यातील संघर्षमयी प्रसंगातही मन विचलित होत नाही. देवीच्या कृपेने यश व सिद्धी प्राप्त होते. ब्रह्मचरिणी देवीच्या उपासनेमुळे `स्वाधिष्ठान' चक्रात मन स्थिरावते. या स्थितीत पोहोचलेला योगी देवीची कृपा प्राप्त करतो, अशी मान्यता आहे. 

दधाना करपद्माभ्यामक्षमालाकरमण्डलू,देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा।।

टॅग्स :Navratriनवरात्री