शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

Navratri 2021: नवरात्रीत रोज संध्याकाळी देवीची आरती म्हणणार ना? त्याआधी समजून घ्या भावार्थ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 12:21 IST

Navratri 2021 : आरती म्हणजे आर्ततेने घातलेली साद. देवीची आरती म्हणतात आपण तिला नक्की काय मागणं मागतोय, हे समजून घेऊ!

'दुर्गे दुर्गट भारी तुजवीण संसारी' ही आरती आपण आजवर कितीतरी वेळा म्हटली असेन. संगीतकार अजय-अतुल यांनी आरतीचे गाणे केले आणि त्याची मोहिनी अधिकच वाढली. उद्यापासून शारदीय नवरात्र सुरू होईल. घरोघरी देवीचे पूजन, स्तवन, कीर्तन होईल,त्यावेळेसही ही आरती म्हटली जाईल. देवीच्या अद्वितीय पराक्रमाचा आरतीरूपाने जयघोष होईल. ही पूजा केवळ आदिमायेची नाही, तर अखिल विश्वाला नवजीवन देणाऱ्या स्त्रित्वाची आहे. तिलाच समर्पित ही आरती...

दुर्गे दुर्घट भारी, तुजविण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी,वारी वारी जन्ममरणाते वारी,हारी पडलो आता संकट निवारी।।

महिषासुर, शुंभ-निशुंभ, मधु-कैटभ अशा असंख्य दैत्यांचे पारिपत्य करणारी देवी जगदंबा, तुझा जयजयकार असो. तू दानवांचा नाश करून देवाला, मानवाला, अखिल विश्वाला तारून नेलेस, तशीच करूणा आमच्यावरही कर. जन्म-मरणाच्या फेऱ्यातून आम्हाला सोडव. आमच्या आयुष्याचे ध्येय गाठण्याची आम्हाला शक्ती दे आणि आमच्या मार्गात येणाऱ्या संकटांचे निवारण कर.

Navratri 2021 : घटस्थापना कशी करावी आणि नवरात्रीचे उत्थापन कसे करावे, याची शास्त्रशुद्ध माहिती!

त्रिभुवन भुवनी पाहता, तूज ऐसी नाही, चारी श्रमले परंतु, न बोलवे काही,साही विवाद करिता पडिले प्रवाही,ते तू भक्तालागी पावसी लवलाही।।

हे त्रिपुरसुंदरी, तुझ्या अलौकीक तेजावर भाळून खुद्द असूराला  तुझ्याशी विवाह करण्याचा मोह आवरता आला नाही. मात्र, तू केवळ स्तुतीवर भाळणारी नाहीस, तू शौर्याला, पराक्रमाला मानणारी आहेस. तू दैत्यांना युद्धात पराजित करण्याचे आव्हान दिलेस. त्यांनी तुझ्या स्त्रीत्वाला कमी लेखण्याची चूक केली आणि आपलाच सर्वनाश ओढावून घेतलास. तुझ्या कर्तबगारीची वर्णने आम्ही सप्तशतीत वाचली आहेत. ती वर्णन वाचताना आमची परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी वाणी थकली. आमच्या ठायी असलेले षडरिपूदेखील तुझ्यासमोर नतमस्तक झालेत, आता फक्त तू आम्हाला आपलेसे करून घे आणि तुझा वरदहस्त आमच्या शीरावर ठेव.

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा,क्लेशापासून सोडी, तोडी भवपाशा,अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा,नरहर तल्लीन जाहला पदपंकजलेशा।।

कोणतही मोठे संकट असो, परंतु त्यातून निघण्याचा मार्ग आईकडे असतोच. तू तर, समस्त विश्वाची जननी आहेस. तुझ्या नुसत्या सुदर्शनाने भक्तांना केवढातरी दिलासा मिळतो. तु सोबत आहेस, ही खात्री असली, की संकट, दु:खं, क्लेश यांना आयुष्यात थारा राहतच नाही. मन शांत झाले की भवपाशातून सोडवणूक करणेही सोपे जाते. आणि तरीसुद्धा आम्ही जर या मायाजाळात अडकून राहिलो, तर त्यातून सोडवायला तू जवळ आहेसच. 'अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा?' अतिशय तळमळीने, व्याकुळतेने, कृपाभिलाषी होऊन आम्ही तुझ्याकडे पाहत आहोत. ज्याप्रमाणे, लहान मुलाला क्षणभरही आपली आई नजरेआड झालेली चालत नाही, तशीच भक्तांनाही तू नजरेआड गेलेली चालत नाही. एवढी तल्लीनता तुझ्या ठायी आलेली आहे.

Navratri 2021: नवरात्रीत अनवाणी चालण्यामागे शास्त्राधार आहे की आणि काही... जाणून घेऊ!

तुझी प्रत्यक्ष भेट कधी होईल माहित नाही, तोवर मी माझ्या सभोवताली असलेल्या स्त्रिरूपातील तुझ्या अंशाचा नितांत आदर करेन. दुसऱ्यांना आदर करायला शिकवेन. माझी आई, बहीण ,बायको, मैत्रीण आनंदी असेल, सुरक्षित असेल, तर माझ्या हातून तुझीच पूजा झाली असे समजेन आणि केवळ नवरात्रीतच नव्हे, तर आमरण तुझ्या कार्याचा जागर करत राहीन. 

टॅग्स :Navratriनवरात्री