शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 18:35 IST

Ayodhya Ram Mandir News: श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला २०२४-२५ मध्ये विविध स्त्रोतांकडून ३१६ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळाल्याचे म्हटले जात आहे.

Ayodhya Ram Mandir News: अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण होऊन दीड वर्ष उलटून गेले, तरी भाविकांची राम दर्शनाची आस अद्यापही कमी झालेली नाही. आजही अयोध्येत लाखो भाविक राम मंदिराच्या दर्शनासाठी येत आहेत. इतकेच नव्हे तर आता रामललासह श्रीरामांच्या भव्य राम दरबाराचे दर्शनही भाविकांना घेता येणार आहे. सन २०२५ च्या अखेरपर्यंत राम मंदिर परिसरातील सर्व कामे पूर्ण होणार असल्याचे म्हटले जात आहे. यातच मुंबईतील एका उद्योजकाने महादान केल्याची माहिती मिळाली आहे. या बड्या उद्योजकाने राम मंदिरासाठी तब्बल १७५ किलो सोने अर्पण केले आहे. परंतु, हे गुप्त दान केले असून, याची माहिती उघड करण्यात आलेली नाही. 

अयोध्येतील राम मंदिराला पैशांच्या स्वरुपात आणि सोने-चांदी स्वरुपात दान करणाऱ्या भाविकांची यादी हजारोंच्या घरात आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राला आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवरून एका भाविकाने महादान दिले आहे. मुंबईतील एका उद्योजकाने राम मंदिराला सुमारे १७५ किलो सोने दान केले आहे. या सोन्याची किंमत सुमारे १५० कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे. उद्योजकाने दान केलेले सोने राम मंदिराच्या शिखर-कलशापासून ते दरवाजे आणि दाराच्या चौकटीपर्यंत वापरले गेले आहे. राम मंदिराच्या शिखरासह परिसरातील सहा मंदिरांचे शिखर-कलश सोन्याने सुशोभित केले आहेत. शेषावतार मंदिराच्या शिखराला सोन्याने सुशोभित करण्याचे काम अजूनही सुरू आहे.

दहा कोटी रुपये घ्या अन् आमचे नाव द्या

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे निमंत्रित सदस्य आणि मंदिर बांधकामाचे प्रभारी गोपाळ राव यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, १७५ किलो सोने देणाऱ्या भाविकाने आपले नाव गुप्त ठेवण्याची विनंती केली आहे. दुसरीकडे, एका भाविकाने दहा कोटी रुपये दान केल्यानंतर निर्माणाधीन प्रेक्षागृहाला आपले नाव द्यावे, अशी अपेक्षा ठेवली आहे. परंतु, ही बाब श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून फेटाळ्यात आली आहे. यापूर्वीही अनेकांनी दहा कोटींहून अधिक रुपयांचे दान दिले आहे. परंतु, कोणाचेही नाव कोणत्याही ठिकाणी देण्यात आलेले नाही. 

दरम्यान, अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राला २०२४-२५ मध्ये विविध स्त्रोतांकडून ३१६.५७ कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे या काळात श्रीराम मंदिर प्रकल्पाशी संबंधित बांधकाम कामावर सर्वाधिक ४५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. तीर्थक्षेत्राच्या विश्वस्तांच्या बैठकीत सादर केलेल्या उत्पन्न आणि खर्चाच्या अंदाजपत्रकावरून ही माहिती मिळाली.

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याspiritualअध्यात्मिक