Mohini Ekadashi 2022: आज जुळून आला आहे शुभ हर्ष योग, धनप्राप्तीसाठी सूर्यास्तापूर्वी करा 'हा' उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 11:36 IST2022-05-12T11:36:02+5:302022-05-12T11:36:16+5:30
Mohini Ekadashi 2022: आज मोहिनी एकादशी त्यात हा योग जुळून आल्यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे. त्यानिमित्ताने आज कोणती उपासना फलदायी ठरेल ते पाहू.

Mohini Ekadashi 2022: आज जुळून आला आहे शुभ हर्ष योग, धनप्राप्तीसाठी सूर्यास्तापूर्वी करा 'हा' उपाय!
आज १२ मे. मोहिनी एकादशी आहे. आजच्या दिवशी मोहिनी रूप धारण करून भगवान विष्णूंनी देवतांना अमृत मिळवून दिले होते. त्या रूपाचा आठव आणि भगवान विष्णूंप्रती कृतज्ञता म्हणून मोहिनी रूपाची पूजा केली जाते. एकादशीचा उपास केला जातो आणि विष्णूंची पूजा केली जाते. आजच्या या शुभ दिवशी आणखी एक योग जुळून आला आहे. त्या मुहूर्तावर केलेला एक उपाय तुम्हाला आर्थिक लाभ करून देणारा ठरेल. जाणून घेऊया त्याविषयी.
आजच्या दिवशीच्या जुळून आलेला मुहूर्त :
आजच्या दिवशी तीन प्रमुख ग्रह आपापल्या राशीमध्ये राहतील. यासोबतच शुभ हर्ष योग तयार होईल. याशिवाय १२ मे रोजी चंद्र स्वतः कन्या राशीत राहील. ज्योतिषांच्या मते या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जाऊ शकते.
या शुभ मुहूर्तावर करा पुढील उपाय :
हिंदू धर्मग्रंथानुसार मोहिनी एकादशीचे व्रत पाळणाऱ्या व्यक्तीने भगवान विष्णूची विधिपूर्वक पूजा करावी. उपास केला नसेल तर निदान विष्णूंचा 'ओम नमो भगवते वासुदेवाय' हा १० वेळा जप करावा. आजचे व्रत करणाऱ्या माणसाला अनेक वर्षांच्या तपश्चर्येचे पुण्य प्राप्त होते. आजच्या दिवशी सात्विक अन्न खावे किंवा फलाहार करावा. विष्णू सहस्त्र नाम म्हणावे किंवा श्रवण करावे.
धनप्राप्तीसाठी हे उपाय करा :
१२ मे रोजी सायंकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. सूर्यास्तापूर्वी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. मंदिरात जाऊन भगवान विष्णूंच्या कृष्ण किंवा विठ्ठल रुपाला पिवळे फळ, वस्त्र, फळे, फुले अर्पण करावे. दुधाचा किंवा पाण्याचा अभिषेक करावा किंवा अभिषेकाची दक्षिणा मंदिरात अर्पण करावी. देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवावा.