सोमवती अमावास्या: ‘या’ १० गोष्टी लक्षात ठेवा, आवर्जून पालन करा; नेमके काय करावे? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 11:01 IST2024-12-29T10:59:16+5:302024-12-29T11:01:05+5:30

Margashirsha Somvati Amavasya December 2024: सन २०२४ची शेवटची अमावास्या असल्याने मार्गशीर्ष अमावास्येला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

margashirsha somvati amavasya december 2024 should do these 10 things and get auspicious blessings of mahadev | सोमवती अमावास्या: ‘या’ १० गोष्टी लक्षात ठेवा, आवर्जून पालन करा; नेमके काय करावे? जाणून घ्या

सोमवती अमावास्या: ‘या’ १० गोष्टी लक्षात ठेवा, आवर्जून पालन करा; नेमके काय करावे? जाणून घ्या

Margashirsha Somvati Amavasya December 2024: ३० डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीर्ष अमावास्या आहे. सन २०२४ मधील हे शेवटचे व्रताचरण आहे. तसेच २०२४ मधील शेवटची अमावास्या आहे. या दिवशी भगवान शंकरासोबत देवी पार्वतीची पूजा केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी योग्य प्रकारे पूजा केल्याने सुख, शांती आणि समृद्धी मिळते. या दिवशी वृद्धी योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. मार्गशीर्ष सोमवती अमावास्येला काही नियम पाळणे आवश्यक असल्याचे म्हटले जाते. 

अमावास्या तिथी सोमवारी सुरू होत असल्यामुळे या अमावास्येला सोमवती अमावास्या, असे म्हटले जाते. सोमवती अमावास्येला महादेव शिवशंकराची उपासना करणे लाभदायक असते, अशी मान्यता आहे. धर्म शास्त्रात सोमवती अमावास्येचे महत्त्व सांगण्यात विशेषत्वाने विषद करण्यात आले आहे.  सोमवती अमावास्येला सूर्य आणि चंद्र ग्रह सरळ रेषेत असतात, असे सांगितले जाते. या दिवशी काही जण विशेष व्रत करतात. या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना, व्रत करतात. सोमवती अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. सोमवार हा महादेव शिवशंकराच्या पूजनासाठी विशेष मानला जातो. सोमवती अमावास्येला शंकराचे नामस्मरण, पूजन, भजन करण्याने विशेष पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. 

सोमवती अमावास्येला नेमके काय करावे? 

- हा दिवस दानधर्मासाठी शुभ मानला जातो.

- भारताच्या काही भागात लोक या दिवशी उपवास करतात.

- या दिवशी लोक विविध प्रकारचे धार्मिक विधी करतात.

- या दिवशी गंगा स्नान करणे शुभ मानले जाते.

- या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी मिसळून कच्चे दूध अर्पण करा आणि त्याच्याभोवती ७ वेळा प्रदक्षिणा घाला.

- या तिथीला पाण्यात तीळ मिसळून दक्षिण दिशेला पितरांच्या नावाने अर्पण करा.

- महादेवाला अभिषेक करा. 

- शिवमंत्रांचा यथाशक्ती जप करावा.

- सूर्याला अर्घ्य अर्पण करा.

- या तिथीला गाईला चारा खाऊ घालणे शुभ मानले जाते.


 

Web Title: margashirsha somvati amavasya december 2024 should do these 10 things and get auspicious blessings of mahadev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.