शहरं
Join us  
Trending Stories
1
"निकाल आल्यावर कुणाला दोष द्यायचा याची काहींची तयारी सुरु..."; मार्कर मुद्द्यावर CM चा टोला
2
निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे...
3
...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा
4
"पालिका निवडणुकांसाठी शेअर बाजार बंद ठेवणं खराब नियोजनाचं लक्षण," का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"निवडून येणारे लोकसेवक असावेत, मालक नव्हे!"; संजय शिरसाठ यांचे विरोधकांना खडे बोल
6
BMC Election 2026: 'हा काय विकास? शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा!'; राज ठाकरेंचा संताप, 'पाडू' मशीनवरून सरकारला ठणकावले
7
Maharashtra Municipal Election 2026 Voting LIVE Updates: "आमचा विजय निश्चित, विरोधी पक्ष उद्या काय सांगायचे? याची प्रॅक्टिस करतायेत" - फडणवीस
8
Fitness Tips: जिमच्या मेहनतीवर पाणी फिरवणाऱ्या 'या' ७ चुका आजच थांबवा!
9
भाजप आणि शिंदे सेनेत राडा, काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण?
10
स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय? मोदी सरकार देतंय ९० हजारांचे कर्ज; अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
11
'या' देशाकडे आहे जगातील सर्वाधिक १,१०,००० मेट्रिक टन चांदी; पाहा भारताकडे किती आहे चांदीचा साठा
12
भोपाळमध्ये काळाचा घाला! मकर संक्रांतीच्यानिमित्ताने स्नानासाठी निघालेल्या ५ भाविकांचा भीषण अपघातात मृत्यू
13
BMC Election 2026: मोठी बातमी! शाईऐवजी मार्कर निवडणूक आयोगानेच दिला, पुसला जातोय...; मुंबई आयुक्तांची कबुली
14
मतदान केंद्रात शिरला घोणस जातीचा विषारी साप, उडाली खळबळ
15
मुलानेच केला आईचा खून, बंदुकीतून झाडली गोळी, भयानक घटनेनं कोकण हादरलं, धक्कादायक कारण समोर आलं 
16
IIT इंजिनिअर बनला 'डिजिटल धोबी'! ८४ लाखांची नोकरी सोडून उभा केला १६० कोटींचा 'यूक्लीन' ब्रँड
17
६५-७० लढाऊ विमाने घेऊन अमेरिकेची युद्धनौका इराणच्या दिशेने निघाली; समुद्रात मोठी खळबळ...
18
सासू, पाच सुना आणि मुलगी, भीषण अपघातात झाला मृत्यू, अंत्यसंस्काराहून परतताना घडली दुर्घटना
19
"मैत्रीपूर्ण लढत कधीच होत नाही, हा केवळ..."; मनसे नेते राजू पाटील यांची शिवसेना-भाजप युतीवर टीका
20
Makar Sankranti 2026: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी माता कुंतीने दिले होते 'हे' दान; यंदा तुम्हीही लुटा 'कुंतीचे वाण'
Daily Top 2Weekly Top 5

Makar Sankranti 2026: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी माता कुंतीने दिले होते 'हे' दान; यंदा तुम्हीही लुटा 'कुंतीचे वाण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 11:20 IST

Makar Sankranti 2026: अखंड सौभाग्यासाठी आयुष्यात एकदा तरी स्त्रियांनी कुंतीचे वाण द्यावे असे म्हणतात, ते नेमके काय आहे ते जाणून घेऊ. 

मकर संक्रांतीपासून(Makar Sankranti 2026) रथसप्तमीपर्यंत(Rathasaptami 2026) हळदी-कुंकवाचे कार्यक्रम चालतात. यात अनेक सुवासिनी 'कुंतीचे वाण' लुटतात. महाभारतातील माता कुंतीच्या नावावरून ओळखले जाणारे हे वाण विशेषतः आरोग्य आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी दिले जाते. यंदा हे दान १४ ते २५ जानेवारी या काळात देता येईल. 

काही हरवलंय? काळजी सोडा! 'हा' एक मंत्र तुमची वस्तू शोधून देईल; अनेकांनी घेतलाय अनुभव 

कुंतीच्या वाणामागील पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, महाभारताच्या काळात माता कुंतीने आपल्या मुलांच्या (पांडवांच्या) दीर्घायुष्यासाठी आणि विजयासाठी मकर संक्रांतीच्या काळात भगवान सूर्याची उपासना केली होती. यावेळी त्यांनी काही विशिष्ट वस्तूंचे दान केले होते, ज्याला पुढे 'कुंतीचे वाण' असे म्हटले जाऊ लागले. असे मानले जाते की, हे वाण दिल्याने घरातील मुलांचे आरोग्य उत्तम राहते आणि कुटुंबावर येणारी संकटे दूर होतात व अखंड सौभाग्य लाभते. 

कुंतीच्या वाणात कोणत्या वस्तू असतात?

हे वाण इतर वाणांपेक्षा थोडे वेगळे असते. यात प्रामुख्याने ५ किंवा १३ च्या संख्येत वस्तू घेतल्या जातात. कुंतीच्या वाणात साधारणपणे खालील गोष्टींचा समावेश असतो:

१. सौभाग्याचे लेणं: हळद-कुंकू, काचेच्या बांगड्या, काळी पोत किंवा कंगवा. २. आरोग्यदायी फळे: बोरं, ऊसाची कापे, हरभरे, गाजर. ३. धान्य आणि गूळ: तीळ-गुळाचे लाडू किंवा तिळाची वडी. ४. विशेष वस्तू: काही ठिकाणी कुंतीचे वाण म्हणून तांब्याची छोटी भांडी, डबे किंवा स्टीलच्या वस्तूही दिल्या जातात.

Makar Sankranti 2026: मकर संक्रांत ते रथसप्तमी; हळदी-कुंकवासाठी हाच काळ का निवडला जातो?

वाण लुटण्याची पद्धत

सुवासिनींना घरी बोलावून किंवा मंदिरात जाऊन हे वाण दिले जाते.वाण देण्यापूर्वी सुवासिनींचे औक्षण केले जाते, त्यांना हळद-कुंकू लावले जाते."कुंतीचे वाण, अक्षय दान" असे म्हणून हे वाण श्रद्धेने दिले जाते.

कुंतीच्या वाणाचे महत्त्व

हे वाण 'अक्षय' मानले जाते, म्हणजेच याचे फळ कधीही संपत नाही. मकर संक्रांतीच्या शुभ काळात जेव्हा सूर्य उत्तर दिशेला मार्गस्थ होतो, तेव्हा दिलेले हे दान माता कुंतीप्रमाणेच आपल्या कुटुंबाला शक्ती आणि संरक्षण प्रदान करते, अशी भावना महिलांमध्ये असते.

Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक स्वभावाने तीळगुळाहून गोड, पण चिडले की समोरच्यावर संक्रांत!

हे वाण ५ जणींना द्यावे लागते. 

>> एक वाण तुळशीला >> दुसरे ज्याने आपल्याला हे वाण दिले त्या सुवासिनीला>> तिसरे घरातल्या जावेला, नणंदेला >> उर्वरित २ मात्र ओळखीत पण नात्यात नसलेल्या सुवासिनींना द्यावे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Makar Sankranti 2026: Kunti's 'Vaan' for children's long life and prosperity.

Web Summary : During Makar Sankranti, women exchange 'Kunti's Vaan' for family's well-being. This tradition, linked to Mata Kunti, involves gifting items like haldi-kumkum, fruits, and grains from January 14-25. It's believed to bless children with health and protect families from misfortune.
टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीTraditional Ritualsपारंपारिक विधीPuja Vidhiपूजा विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण