शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

Mahaveer Jayanti 2023: महावीर जयंतीनिमित्त वाचा भगवान महावीरांनी सांगितलेली यमाच्या सेवकांची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 16:01 IST

Mahaveer Jayanti 2023: महावीरांच्या केवळ अर्ध्या वाक्याने चोराचे भले झाले, जर त्याने पूर्ण उपदेश ऐकला असता तर???

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भगवान महावीर एका गावात आपल्या शिष्यांसह आले. लोकांना ते भक्तीमार्ग समजावून सांगत. त्यांच्या अनमोल वचनांमुळे कित्येकांनी चांगला मार्ग स्वीकारला. त्या गावात एक चोर होता. त्याला महावीरांचा उपदेश आवडत नसे. त्याच्या बरोबरीने चोरी करणारे अनेक चोर आपला पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय सोडून महावीराच्या उपदेशाप्रमाणे आचरण करू लागले होते. त्यामुळे तो जिथे महावीर असतील तिथे थांबत नसे. 

एके दिवशी तो चोर भयंकर आजारी पडला. त्यावेळी त्याने आपल्या मुलाला बोलवून सांगितले, `हे बघ बाळ, मी आता जास्त दिवस जगेन असे वाटत नाही. माझ्यामागे तू आपला पिढ्यानपिढ्या चालत आलेला चोरीचा धंदा पुढे असाच चालू ठेव. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गावात जोपर्यंत महावीर आहेत, तोपर्यंत त्यांच्याजवळ फिरकू पण नकोस. ते जिथे असतील तिथून दूर निघून जा.

थोड्याच दिवसाने चोराने शरीर सोडले. त्याचा मुलगा पुढे वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून चोरीचा व्यवसाय करून निष्णात चोर बनला. बरीच संपत्ती त्याने जमवली. 

एके दिवशी मात्र महावीरांच्या मठाजवळून जाताना त्याला महावीरांचे दर्शन झाले. महावीर जमलेल्या भाविकांना उपदेश करत होते. चोराच्या मुलाने वडिलांनी सांगितल्याप्रमाणे महावीरांच्या मठाजवळ न थांबता तिथून तो पळत सुटला. त्यांचा उपदेश कानावर पडू नये म्हणून कान बंद करून घेतले. तरीही अर्धे वाक्य त्याच्या कानावर पडलेच. महावीर मृत्यूनंतरच्या अवस्थेचे वर्णन करत असताना म्हणत होते की, 'शरीरातील प्राण घेऊन जाणारे यमाचे सेवक उलट्या पायाचे असतात', एवढे वाक्य मात्र ऐकले, पुढचे वाक्य ऐकू येऊ नये म्हणून त्याने कान बंद केले नि तो तिथून पळत सुटला.

एके दिवशी सावकाराच्या वाड्यावर मोठा दरोडा पडला. राजाच्या सैनिकांनी संशयीत म्हणून चोराच्या मुलाला पकडून नेले. चोरी त्यानेच केली होती. परंतु तो कबुल होईना. नाना प्रकारे त्याला कबुल करायवयास लावले, पण व्यर्थ! शेवटचा उपाय म्हणून त्याला गुंगीचे औषध देण्यात आले. सात आठ दिवस बेशुद्ध ठेवल्यावर तो अर्धवट शुद्धीवर आला. तो मरण पावला आहे, असे भासवण्यासाठी त्याच्या भोवती पाच सहा सुंदर स्त्रिया जमवल्या, त्या म्हणाल्या, `आम्ही यमराजाच्या सेविका आहोत. तुझा प्राण आम्ही घेऊन जात आहोत. तू तुझ्या जीवनात जे काही दुष्कर्म केले असेल ते खरंखरं सांगितलं तर तुला आम्ही स्वर्गात नेऊ आणि खोटं सांगितलं तर तुझी नरकात रवानगी करू.'

आपल्याकडून चोरीची कबुली करून घेण्यासाठी तर हे षडयंत्र नसेल! अशी त्याला शंका आली. तेवढ्यात त्याला महावीरांचे वाक्य आठवले. महावीर म्हणाले होते, की 'यमराजांच्या सेवकांचे पाय उलटे असतात.' परंतु यांचे पाय तर आपल्यासारखेच आहेत. म्हणजे नक्कीच आपल्याला शिक्षा करण्यासाठी हे कारस्थान आहे. हे त्याने जानले. परंतु वरकरणी काहीही न दर्शवता तो म्हणाला, `तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मलाही स्वर्गात जायची खूप इच्छा आहे. पण मी एकही दुष्कर्म केलेले नाही.'

राजाचा हा प्रयत्नही व्यर्थ ठरला. काहीही पुरावा नसल्याने राजाला त्याला सोडून द्यावे लागले. केवळ महावीरांच्या अध्र्या वाक्यामुळे त्याची शिक्षा टळली. त्याने विचार केला, की महावीरांचे अर्धे वाक्य जर आपल्याला कारावासाच्या बंधनातून मुक्त करू शकले, तर त्यांचा पूर्ण उपदेश जर ऐकला, तर जीवन खऱ्या अर्थाने मुक्त होईल. नंतर तो त्वरित महावीरांना शरण  गेला. त्याने सारी हकीगत त्यांना सांगितली आणि त्यांचा अनुग्रह घेतला व आपले जीवन सुखी केले.