शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Maha Shivratri 2026: शरीराचे कंपन आणि पाणावलेले डोळे देतील दिव्य प्रचिती; महाशिवरात्रीचा 'तो' ५२ मिनिटांचा काळ महत्त्वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 15:28 IST

Mahashivratri 2026 Vrat Importance in Marathi: महाशिवरात्रीला 'या' ठराविक कालावधीत तुमची प्रत्येक इच्छा महादेवापर्यंत पोहोचवण्याची आहे सुवर्णसंधी; सविस्तर वाचा. 

फेब्रुवारी १५, २०२६ रोजी साजरी होणारी महाशिवरात्री(Mahashivratri 2026) ही केवळ उपवासाची  किंवा उपासनेची रात्र नसून, ती ब्रह्मांडीय ऊर्जा (Cosmic Energy) आपल्या बाजूने वळवण्याची एक मोठी संधी आहे. महाशिवरात्रीच्या रात्री येणारा 'निशीत काळ' हा भगवान शिवाची आराधना आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी (Manifestation) सर्वात शक्तिशाली मानला जातो.

महाशिवरात्री २०२६: नशिबाची साथ कोणाला मिळणार? महादेवाच्या कृपेसाठी राशीनुसार करा 'हे' दान

महाशिवरात्रीच्या रात्री जेव्हा जग निद्रावस्थेत असते, तेव्हा शिवभक्त मात्र 'जागर' करतात. हा जागर केवळ डोळे उघडे ठेवण्यासाठी नसून तो अंतर्मनातील इच्छा जागृत करण्यासाठी असतो. यंदा १५ फेब्रुवारीला रात्री १२:०९ ते पहाटे १:०१ या मुहूर्तावर 'निशीत काळ' असेल. हा असा काळ आहे जेव्हा शिव आणि शक्तीचे मिलन होते आणि विश्वातील ऊर्जा उच्च स्तरावर असते.

मॅनिफेस्टेशन (Manifestation) विधी: 

जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखादा सकारात्मक बदल हवा असेल किंवा एखादी इच्छा पूर्ण करायची असेल, तर निशीत काळात खालील कृती करा:

१. तुमची इच्छा लिहा: रात्री १२:०९ ते १:०१ च्या दरम्यान शांत ठिकाणी बसा. एका कागदावर तुमची इच्छा 'पूर्ण झाली आहे' अशा सकारात्मक भाषेत लिहा. २. १०८ वेळा मंत्रजप: डोळे मिटून 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा १०८ वेळा जप करा. जप करताना तुमची इच्छा पूर्ण होत असल्याचे दृश्य (Visualize) डोळ्यांसमोर आणा. ३. शरण जा (Surrender): जप पूर्ण झाल्यानंतर तो कागद महादेवाच्या चरणी अर्पण करा किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवा. "हे महादेवा, मी माझी इच्छा तुझ्या चरणी सोपवत आहे, आता तूच मार्ग दाखव," असा भाव ठेवा. ४. विश्वास ठेवा: विधी पूर्ण झाल्यावर 'विश्वास' ठेवा की प्रक्रिया सुरू झाली आहे.

महाशिवरात्री २०२६: ७२ तासांचा महासंयोग! महाशिवरात्रीला जोडून आले 'हे' दोन मोठे शुभ योग बदलतील तुमचे नशीब!

शक्तीची प्रचिती कशी ओळखावी?

हा विधी करताना जर तुम्हाला खालीलपैकी काही जाणवले, तर समजा की तुमची प्रार्थना महादेवापर्यंत पोहोचली आहे:

>> शरीरात विशेषतः पाठीच्या कण्यात कंपने (Vibrations) जाणवणे.

>> डोळ्यांतून आनंदाश्रू येणे किंवा मन अत्यंत भावूक होणे.

>> हृदय चक्र किंवा आज्ञा चक्र (Third Eye) जवळ ऊर्जेची हालचाल जाणवणे.

Solar Eclipse 2026: सूर्यग्रहणाबरोबरच पंचकाचेही सावट; ज्योतिषांनी दिलाय खास 'या' राशींना सावधतेचा इशारा!

निशीत काळ का महत्त्वाचा?

निशित काळ (Nishita Kaal) हा हिंदू पंचांगानुसार मध्यरात्रीचा आठवा मुहूर्त आहे, जो सामान्यतः १ तासापेक्षा कमी असतो. महाशिवरात्रीच्या वेळी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो, जेव्हा महादेवाचे अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय असते असे मानले जाते. या कालावधीत पूजा, अभिषेक आणि नामस्मरण करणे अत्यंत पुण्यफलदायी मानले जाते. पाहा व्हिडिओ - 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mahashivratri 2026: Experience Divine Energy; The Crucial 52-Minute Window

Web Summary : Mahashivratri 2026 offers a powerful opportunity to manifest desires during the 'Nishita Kaal,' from 12:09 AM to 1:01 AM on February 15th. Manifestation rituals include writing desires, chanting 'Om Namah Shivaya,' and surrendering to Lord Shiva. Experiencing vibrations or tears indicates prayer acceptance.
टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणLord Shivaमहादेव