शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

महाशिवरात्री: शंकराला बेलपत्र कसे अर्पण करावे? जलाभिषेक करण्याची योग्य पद्धत काय? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 12:24 IST

Mahashivratri 2025: महाशिवरात्रीला शिवपूजन करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक मानले गेले आहे. जाणून घ्या...

Mahashivratri 2025:महाशिवरात्रीला हिंदू संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे. शंकर महायोगी, अतुल पराक्रमी असूनही त्यागी, विरागी असा आहे.  बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. संपूर्ण देशात महाशिवरात्री मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. लाखो भाविक शिव मंदिरात जाऊन विशेष पूजन, जलाभिषेक, रुद्राभिषेक करतात. शंकराचे नामस्मरण, उपासना, मंत्रांचा जप केला जातो. शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेक करण्यासाह बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते. परंतु, यासाठी काही योग्य पद्धती सांगितलेल्या आहेत. त्याबाबत जाणून घेऊया...

महाशिवरात्रीला आवर्जून व्रताचरण करून विशेष शिवपूजन केले जाते. महादेव भक्तांच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण करतात, अशी अनेकांची श्रद्धा आहे. महाशिवरात्रीला शिवपूजन केल्याने चौपट अधिक फल मिळते, असे म्हणतात. महादेवांची पूजा करताना शिवलिंगावर अभिषेक केला जातो. शिवपिंडीवर कोणत्याही दिवशी अभिषेक करता येतो. मात्र, महाशिवरात्रीला त्याचे महत्त्व कैकपटीने वाढते. महाशिवरात्रीला केलेला अभिषेक अभिषेक खूप फलदायी मानला जातो. अनेक जण रुद्राभिषेकही करतात. महादेवांवर अभिषेक करताना गंगाजल, दूध, जल, पंचामृत आदींचा वापर केला जातो. 

महाशिवरात्री शिवपूजनात बेलपत्र कसे वाहावे?

बेलपत्राशिवाय भगवान शिवाची पूजा अपूर्ण मानली जाते. अभिषेक केल्यानंतर शंकराला बेलपत्र अर्पण करावे. बेलपत्रासोबत भांगाचे पान, धोत्र्याचे पान/फळ याव्यतिरिक्त घोंगलाचे फूल वाहण्याची विदर्भात परंपरा आहे. दक्षिण भारतात महाशिवरात्रीला शंकराला निळी कमळे वाहण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे अशोकाची पाने, आवळीची पाने, कण्हेरीची पाने, कदंबाची पाने, ब्राह्मीची पाने, आघाडाची पाने शिवशंकराला शिवपूजनावेळी वाहिली जातात, असे सांगतात. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेल अर्पण करताना त्या बेलाला तीन पाने असल्याची खात्री करूनच ते शिवलिंगावर अर्पण करावे. बेलपत्र हे तीन पेक्षा कमी किंवा तीन पेक्षा जास्त असू नये. बेलपत्र अर्पण करताना ते फाटलेले तसेच खराब झालेले असू नये. तीन पाने पूर्ण अभंग असावीत, असे सांगितले जाते. 

महाशिवरात्रीला जलाभिषेक करणे

शिवलिंगाला अभिषेक करताना पाण्याचा प्रवाह मंद गतीने असावा. अभिषेक अतिवेगाने करू नये. तसेच जलार्पण करताना पाण्याची धार छोटी असावी. लक्षात ठेवा अभिषेक पूर्वेकडे तोंड करून करावा. जलाभिषेक करताना तो बसून करावा. मंदिरात अभिषेक करताना उभे राहिल्यास थोडे वाकून जलार्पण करावे. शिवपिंडीवर अभिषेक करताना अभिषेक पात्राचा वापर केल्यास उत्तम. महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण कुटुंबासह रुद्राभिषेक केल्यामुळे जीवनामध्ये अपार यश मिळते. तसेच सुख-समृद्धी नांदते आणि दुःखापासून मुक्ती होऊन सगळी संकटे दूर होतात, अशी मान्यता आहे. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी जलाभिषेक करणे अतिशय शुभ, पुण्यफलदायी मानले जाते. शिवलिंगामध्ये वेगळ्या प्रकारची ऊर्जा असते. ज्याचा मनावर सकारात्मक परिणाम होऊन आपले मन शांत होते. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहत असेल, तर महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक अवश्य करावा. घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते. त्याचप्रमाणे समस्या संकटे दूर होण्यास मदत होऊ शकते. तसेच कुंडलीतील ग्रहदोष दूर होण्यास मदत होऊ शकते. ग्रहांचा प्रतिकूल प्रभाव कमी केला जाऊ शकतो, असे म्हटले जाते. 

योग्य पद्धतीने प्रदक्षिणा घालावी

कोणत्याही शिवमंदिरात गेल्यावर अर्धीच प्रदक्षिणा घालावी, असे सांगितले जाते. शिवलिंगाला जोडून जी मर्यादा आखून दिली आहे, तिला शिव निर्माल्य असे म्हणतात. ते ओलांडून जाऊ नये, असे सांगितले जाते. शिवमंदिरात गेल्यावर एका बाजूने प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात करावी. जेथे शिवतीर्थ किंवा शिव निर्माल्य येते, तेथून माघारी फिरावे आणि पुन्हा देवासमोर यावे. यानंतर दुसऱ्या बाजूने प्रदक्षिणेस सुरुवात करावी. पुन्हा शिवतीर्थ किंवा शिव निर्माल्य येते, तेथपर्यंत जावे आणि परत मागे फिरून देवासमोर यावे. अशा पद्धतीने एक प्रदक्षिणा पूर्ण होते. अनेकदा एका बाजूने गेल्यावर शिवतीर्थ किंवा शिव निर्माल्य येते, तेथे वाट बंद केलेली असते, तेथून मागे फिरल्यानंतर देवासमोर येऊन नमस्कार करून अनेक जण प्रदक्षिणेतून बाहेर पडतात. दुसऱ्या बाजूने पुन्हा शिवतीर्थ किंवा शिव निर्माल्य असते, तेथे जात नाहीत. मात्र, असे केल्यास प्रदक्षिणा अपूर्ण राहते. ती पूर्ण मानली जात नाही. त्यामुळे योग्य पद्धतीने प्रदक्षिणा घालावी, असे सांगितले जाते.

 

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीPuja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिक