शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Mahakumbh 2025: यावेळी कुंभस्नानाची संधी हुकली? जाणून घ्या पुढचे कुंभपर्व कुठे आणि कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 11:55 IST

Mahakumbh 2025: महाशिवरात्रीला महाकुंभमेळ्याची सांगता होईल, त्यामुळे साहजिकच पुढचा कुंभमेळा कधी व कुठे याची उत्सुकता निर्माण झाली आहे, त्याची माहिती. 

सध्या प्रयागराज येथे महाकुंभ (Mahakumbh 2025) सुरू आहे आणि त्याच्या बातम्या रोजच चर्चेत असतात. जगभरातून लोक मोठ्या संख्येने प्रयागला पोहोचून त्रिवेणी स्नानाचा लाभ घेत आहेत. कारण यंदाचा महाकुंभ योग तब्ब्ल १४४ वर्षांनी जुळून आला आहे. त्यामुळे त्याचे महत्त्वही वाढले आहे. या महाकुंभ पर्वात देशभरातीलच नाही तर जगभरातील कोट्यवधी भाविकांनी कुंभ स्नानाचा लाभ घेतला. हे पर्व महाशिवरात्रीला (Maha Shivratri 2025) अर्थात २६ फेब्रुवारीला संपणार आहे, त्यामुळे पुढचा कुंभमेळा कधी व कुठे याबद्दल उत्सुकता निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्याबद्दल जाणून घेऊ. 

प्रयागराजमध्ये १२ वर्षांतून एकदा महाकुंभ आयोजित केला जातो, तर हरिद्वार, उज्जैन आणि नाशिकमध्ये दर ६ वर्षांनी सामान्य कुंभ आयोजित केला जातो. पुढील कुंभ २०२७ (Kumbhmela 2027) मध्ये नाशिक येथे होणार आहे. यापूर्वी २०१५ मध्ये  नाशिक येथे महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. महाकुंभ च्या हा कार्यक्रम प्रयागराजमध्ये १२ वर्षांतून एकदा होतो, तर सामान्य कुंभ हरिद्वार, उज्जैन आणि नाशिकमध्ये दर ६ वर्षांनी होतो. महाकुंभातील स्नान हे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. महाकुंभात स्नान केल्याने पापांचा नाश होऊन पुण्य प्राप्त होते, असा समज आहे. त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या कुंभ मेळ्यात सहभागी होण्याची तयारी आतापासूनच करून ठेवा. 

नाशिकमध्ये भरणार पुढचा कुंभमेळा :

महाकुंभाचा संबंध समुद्रमंथनाशी आहे. पुराणांमध्ये आढळलेल्या वर्णनानुसार, समुद्रमंथनातून निघालेल्या अमृत पात्रातील थेंब ४ ठिकाणी सांडले. पृथ्वीवरील ही चार ठिकाणे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक. अमृत ​​कलशातून सांडलेले थेंब प्रयागराजमधील गंगा, यमुना आणि सरस्वती नदी, उज्जैनमधील शिप्रा नदी, हरिद्वारमधील गंगा नदी आणि नाशिकमधील गोदावरी नदीच्या संगमात पडले. हे कारण आहे या नद्यांच्या काठावर दर १२ वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. कुंभाचे ठिकाण ज्योतिष गणनेच्या आधारे ठरवले जाते. ग्रहगणनेच्या आधारे पुढील कुंभ नाशिक येथे होणार आहे.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाNashikनाशिक