Maha Kumbha Mela 2025: १३ जानेवारी रोजी प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरु झाला आहे. महाशिवरात्रीपर्यंत महाकुंभमेळा सुरू राहणार आहे. तब्बल १४४ वर्षांनंतर येणाऱ्या या महाकुंभमेळ्याचे महत्त्व आणि महात्म्य अनन्य साधारण असेच आहे. येत्या २९ जानेवारी रोजी पौष अमावस्येला शाही स्नान असणार आहे. ही तिथी मौनी अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. केवळ देशभरातून नाही, तर परदेशातूनही अनेक भाविक, पर्यटक या महाकुंभमेळ्याला हजेरी लावून गंगास्नान, शाहीस्नानात सहभागी होत आहेत. प्रत्यक्ष महाकुंभमेळ्यात सहभागी होता येत नसले, तरी महादेव शिवशंकराच्या काही मंत्रांचा १०८ वेळा जप केल्यास पुण्यफल आणि शुभ लाभ प्राप्त होऊ शकतात. १०८ वेळा शक्य नसेल, तर किमान ११ वेळा जप करावा, असे सांगितले जात आहे.
महाकुंभमेळा सुरू आहे. या कालावधीत २९ जानेवारी २०२५ रोजी मौनी अमावास्या येत आहे. या अमावास्येला भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी शिव उपासना करून गंगा स्नान करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. काही मान्यतांनुसार, या दिवशी शिव मंत्रांचा जप केल्याने मानसिक शांतता तर लाभतेच, याशिवाय जीवनातील समस्या कमी होण्यात मदत मिळू शकते. सकारात्मकता येऊ शकते. विशेषतः ज्यांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे, ते या दिवशी मंत्रांचा जप करून या दोषापासून मुक्ती मिळवू शकतात. शिव मंत्रांचा जप केल्याने भीतीपासून मुक्तता मिळते. तसेच असेही मानले जाते की, या मंत्रांचा जप करून शिवकृपा लाभल्यास जीवनात प्रगती आणि समृद्धी येऊ शकते, असे म्हटले जाते.
७ शिव मंत्राचा ११ वेळा जप करा; कालसर्प दोषमुक्ती मिळवा
ॐ नमः शिवाय॥
ॐ नागदेवताय नमः॥
ॐ पषुप्ताय नमः॥
ॐ अनंतवैराग्यसिंघाय नम:॥
ॐ नवकुलाय विद्यमहे विषदंताय धीमहि तन्नो सर्प: प्रचोदयात्॥
ॐ महादेवाय विद्महे रुद्रमूर्तये धीमहि तन्नः शिवः प्रचोदयात्॥
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
मंत्रांचा जप करताना कोणती काळजी घ्यावी? पाहा, नियम
या दिवशी स्नान करताना हात जोडून भगवान शिवाचे ध्यान करा. मंत्रांचा किमान ११ वेळा जप करा. जर तुम्ही गंगेत स्नान करू शकत नसाल तर तुम्ही घरी पूजास्थळाजवळ बसून शिवमंत्रांचा जप करू शकता.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.