पैसे कमी पडतात, समस्या संपत नाहीत? ‘हे’ प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; बाप्पा करेल कृपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 12:08 IST2025-02-15T12:04:58+5:302025-02-15T12:08:00+5:30

Magh Sankashti Chaturthi February 2025: संकष्टीच्या मुहूर्तावर या स्तोत्र पठणाची सुरुवात करावी आणि रोज एक वेळ ठरवून न चुकता अकरा वेळा हे स्तोत्र म्हणावे, असे सांगितले जात आहे.

magh sankashti chaturthi 2025 start doing recite this impactful rinmukti stotra to get rid of financial troubles and debt relief | पैसे कमी पडतात, समस्या संपत नाहीत? ‘हे’ प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; बाप्पा करेल कृपा

पैसे कमी पडतात, समस्या संपत नाहीत? ‘हे’ प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; बाप्पा करेल कृपा

Magh Sankashti Chaturthi February 2025: रविवार, १६ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे. सर्वांना आपलेसे वाटणारे दैवत म्हणजे गणपती बाप्पा. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांच्या हाकेला धावून जाणार आहे. 

गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने अडचणी, समस्येतून बाहेर पडण्यासाठी गणपतीचे नामस्मरण, काही विशेष स्तोत्रांचे पठण, मंत्रांचे जप करणे अतिशय शुभ, पुण्यफलदायी, लाभदायी ठरू शकते, असे सांगितले जाते. 

‘हे’ प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; बाप्पा करेल कृपा

आताच्या धकाधकीच्या जीवनात अनेक अडचणी, समस्यांचा सामना करावा लागतो. आपल्या समस्या, अडचणी संपतच नाहीत, असेच अनेकदा वाटत राहते. अनेक गोष्टींमुळे कायम पैशांची चणचण भासत राहते. अनेकदा कर्जाचे ओझे वाढत जाते. बाकी कसलीही सोंगे आणता येतात, पण पैशांचे सोंग आणता येत नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे आर्थिक स्वरूपाच्या समस्या, अडचणी आल्या तर सगळे काही अवघड होऊन बसते. या समस्येतून काही अंशी दिलासा मिळावा, अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडावा, यासाठी एक स्तोत्र अतिशय प्रभावी ठरते, असे सांगितले जाते. हे प्रभाव स्तोत्र म्हणजे ‘ऋणमुक्ती स्तोत्र’. हे स्तोत्र एक दिवस म्हणून उपयोगाचे नाही, तर संकष्टीच्या मुहूर्तावर या स्तोत्र पठणाची सुरुवात करावी आणि रोज एक वेळ ठरवून न चुकता अकरा वेळा हे स्तोत्र म्हणावे. अनन्यभावे गणेशाला शरण जावे आणि आर्थिक अडचणी दूर होऊ दे आणि कर्जमुक्ती होऊ दे अशी विनंती करावी. 

ऋणमुक्ती स्तोत्र

अस्य श्रीऋणविमोचनमहागणपतिस्तोत्रमन्त्रस्य शुक्राचार्य ऋषि:, 
ऋणविमोचन महागणपतिर्देवता, अनुष्टुप छन्द:, ऋणविमोचनमहागणपतिप्रीत्यर्थे जपे विनियोग:।

ऊँ स्मरामि देवदेवेशं वक्रतुण्डं महाबलम । षडक्षरं कृपासिन्धुं नमामि ऋणमुक्तये ।।१।।

महागणपतिं वन्दे महासेतुं महाबलम । एकमेवाद्वितीयं तु नमामि ऋणमुक्तये ।।२।।

एकाक्षरं त्वेकदन्तमेकं ब्रह्म सनातनम । महाविघ्नहरं देवं नमामि ऋणमुक्तये ।।३।।

शुक्लाम्बरं शुक्लवर्णं शुक्लगंधानुलेपनम । सर्वशुक्लमयं देवं नमामि ऋणमुक्तये ।।४।।

रक्ताम्बरं रक्तवर्णं रक्तगंधानुलेपनम । रक्तपुष्पै: पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये ।।५।।

कृष्णाम्बरं कृष्णवर्णं कृष्णगंधानुलेपनम । कृष्णयज्ञोपवीतं च नमामि ऋणमुक्तये ।।६।।

पीताम्बरं पीतवर्णं पीतगंधानुलेपनम । पीतपुष्पै: पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये ।।७।।

सर्वात्मकं सर्ववर्णं सर्वगन्धानुलेपनम । सर्वपुष्पै: पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये ।।८।।

एतदृणहरं स्तोत्रं त्रिसन्ध्यं य: पठेन्नर: । षण्मासाभ्यन्तरे तस्य ऋणच्छेदो न संशय: ।।९।।

सहस्त्रदशकं कृत्वा ऋणमुक्तो धनी भवेत ।।१०।।

।। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ।।

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

 

Web Title: magh sankashti chaturthi 2025 start doing recite this impactful rinmukti stotra to get rid of financial troubles and debt relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.