खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 13:45 IST2025-09-07T13:43:02+5:302025-09-07T13:45:35+5:30
Chandra Grahan 2025: खग्रास चंद्रग्रहणात गर्भवती महिलांनी काय करावे अन् काय टाळावे? गर्भवती महिलांसाठी चंद्रग्रहणाच्या वेळी काय काळजी घ्यावी? जाणून घ्या...

खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
Chandra Grahan 2025 Rules: ०७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ०९ वाजून ५७ मिनिटांपासून खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार असून, यासंदर्भातील सर्व नियम पाळणे आवश्यक असल्याचे सांगितले गेले आहे. यंदाचे खग्रास चंद्रग्रहण मृत्यू पंचकात आहे. त्यामुळे विशेष काळजी घ्यावी, असे म्हटले जात आहे. खग्रास चंद्रग्रहणात गर्भवती महिलांनी काय करावे अन् काय टाळावे? गर्भवती महिलांसाठी चंद्रग्रहणाच्या वेळी काय काळजी घ्यावी? जाणून घेऊया...
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
२०२५ मधील भाद्रपद पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे. ०७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत, असे सांगितले जात आहे. ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे. ग्रहणमोक्षानंतर स्नान करावे. ग्रहणकालामध्ये (पर्वकालामध्ये) झोप, अभ्यंग, भोजन व कामविषयसेवन ही कर्मे करू नयेत. अशौच असता ग्रहण कालात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धी असते. वेधकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राद्ध ही कर्मे करता येतील. बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती व गर्भवतींनी सायंकाळी ५.१५ पासून ग्रहणाचे वेध पाळावेत. ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशीच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये, असे म्हटले जाते.
मृत्यू पंचकात खग्रास चंद्रग्रहण २०२५: सूतक काल कधी? काय करावे अन् काय करू नये; पाहा, नियम
गर्भवती महिलांनी खग्रास चंद्रग्रहण २०२५ मध्ये नेमके काय करू नये? कोणती काळजी घ्यावी?
- गर्भवती महिलांनी आणि अन्य लोकांनी चंद्रग्रहणात अन्न शिजवणे आणि ग्रहण करणे टाळावे. ग्रहणामुळे अन्न दूषित होते. घरात आधीपासून तयार अन्नावर तुळशीची पान घालून ठेवावे. तुळस अन्न शुद्ध ठेवण्यास मदत करते.
- गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण थेट पाहू नये. ग्रहणाच्या काळात चंद्राच्या किरणांना अशुद्ध मानले जाते.
- ग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. विशेषत: रात्रीच्या वेळी अंधाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे.
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
- ग्रहण काळात गर्भवती महिलांनी शांततेने घरात राहावे आणि धार्मिक मंत्रांचे जप करा.
- विष्णुसहस्रनाम म्हणावे किंवा श्रवण करावे. हनुमान चालीसा, गायत्री मंत्र यांचा उच्चार करणे शुभ मानले जाते.
- आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण, जप करणे शुभ मानले गेले आहे.
- मंत्र जप किंवा नामस्मरणाने मनात सकारात्मकता राहते. त्याचा फायदा, लाभ होऊ शकतो.
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण...
- खग्रास चंद्रग्रहण संपल्यानंतर सकाळी डोक्यावरून स्नान करावे. शक्य असल्यास गंगाजलाचा वापर करावा.
- चंद्रग्रहण संपल्यानंतर दानधर्म करा, ज्यामुळे शुभ फळ प्राप्त होतात.
- सदर दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.