Lucky Sign: 'यांच्या'मुळे का होईना, 'अच्छे दिन' येतातच येतात, असा अनेकांचा अनुभव आहे; तुमचे मत काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 16:34 IST2022-11-29T16:34:42+5:302022-11-29T16:34:58+5:30

Lucky Sign: आला दिवस चांगला घालवावा हे प्रत्येकाचं ध्येय असतं, त्याला हातभार लावतात 'हे' नैसर्गिक घटक!

Lucky Sign: It is the experience of many that 'good days' come because of 'them'; What is your opinion? | Lucky Sign: 'यांच्या'मुळे का होईना, 'अच्छे दिन' येतातच येतात, असा अनेकांचा अनुभव आहे; तुमचे मत काय?

Lucky Sign: 'यांच्या'मुळे का होईना, 'अच्छे दिन' येतातच येतात, असा अनेकांचा अनुभव आहे; तुमचे मत काय?

चढ उतार हा मनुष्याच्या आयुष्याचा एक भाग आहे. त्यात सुख थोडं दुखं भारी, अशी स्थिती नेहमीच असते. त्यावर समर्थ म्हणतात, ''सुख पाहता जवापाडे दुखं पर्वताएवढे!' असे असूनही मनुष्य सुखाच्या आशेवर जगत असतो. त्यामुळे अच्छे दिन येण्याची सगळेच जण वाट बघतात. पण हे दिवस वाळूसारखे हातून निसटण्याआधी त्याचे पूर्वसंकेत मिळाले तर प्रत्येक क्षण भरभरून जगतात येईल. बरोबर ना? त्यासाठीच ज्योतिष शास्त्राने सांगितल्या आहेत काही गोष्टी. यापैकी तुमच्या बाबतीत काय घडते ते तपासून बघा. 

चांगल्या दिवसाची चाहूल दर्शवणाऱ्या गोष्टी : 

>> घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत वारंवार उडवूनही चिमण्या दीर्घकाळ चिवचिवाट करत असतील तर ती तुमच्या आयुष्यात आनंदाचे आगमन होणार असल्याची खूण आहे. नात्यात गोडवा आणि आनंद आणि समृद्धी वाढण्याचे हे लक्षण आहे.

>> तुमच्या घरासमोरून जाताना गायीचे शेण दारात पडले तर तेदेखील  सुख-समृद्धी वाढण्याचे लक्षण आहे. अशा स्थितीत व्यक्तीला चांगला पैसा मिळतो. 

>> रस्त्यात घोड्याची नाल सापडणे हे सौभाग्याचे लक्षण समजा. कारण असे क्वचितच कोणाच्या बाबतीत घडते. शनिवार सोडून इतर दिवशी घोड्याची नाल सापडली तर ती सोबत ठेवा.

>> तुमच्या घराजवळ अचानक सुंदर फुलपाखरे दिसू लागली तर ते जीवनात आनंदाचे रंग भरण्याचे लक्षण आहे.

>> घरासमोर तुळशीचे रोप उगवले तर घरातील लोकांचे नशीब बदलते. हे काही दिवसात श्रीमंत होण्याचे लक्षण आहे.

>> प्रवासात जाताना मुंगूस किंवा भारद्वाज पक्षी दिसणे लाभदायक असते. तसेच ते धनलाभ होण्याचेही लक्षण असते. 

>> सकाळी उठल्याबरोबर श्रीफळ दिसले किंवा मंदिराची घंटा ऐकू आली तर तीदेखील धन आणि प्रगतीची पूर्वसूचना समजावी. 

Web Title: Lucky Sign: It is the experience of many that 'good days' come because of 'them'; What is your opinion?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.