शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

Life Lesson: सद्गुरू सांगतात, 'आपण झोपून उठतो तो आपला पुनर्जन्मच आहे असे समजा; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 07:00 IST

तुम्ही झोपेतून जागे झाले असाल तर हा एक चमत्कार समजा, कारण अनेकांनी ही संधी काल रात्रीच गमावली! - सद्गुरू

ताण- तणाव, काळजी, चिंता, नैराश्य इ. अनेक कारणांमुळे आपण शांत झोप गमावून बसलो आहोत. परंतु लक्षात घ्या, झोपेपेक्षा आयुष्यात महत्त्वाचे काहीही नाही. कारण झोपेतून जागे होणे हे पुनर्जन्माहुन कमी नाही. सांगत आहेत सद्गुरू!

जगभरात जवळपास अडीच लाख लोक आदल्या रात्री झोपतात परंतु दुसऱ्या दिवशीही सकाळ बघू शकत नाहीत. कारण झोपेतच त्यांचा नैसर्गिक रित्या मृत्यू होतो. त्या अडीच लाखांमध्ये आपला क्रमांक लागला नाही, याहून मोठा आनंद दुसरा कोणत्या गोष्टीचा असू शकतो का? ही गोष्ट एखाद्या उत्सवातून कमी नाही. हा उत्सव कसा साजरा करायचा? तर सकाळी उठल्यावर छोटेसे स्मित करून! मात्र मुख्य समस्या हीच आहे, की आजच्या तणावयुक्त जगात आपण हसणे विसरलो. विषय, विचार, विकार आपल्यावर एवढे हावी झाले आहेत की आपण रात्री शांत झोपूही शकत नाही. 

आपला शेवट कसा घडणार आहे माहीत नाही, फक्त मागच्या २४ तासांचा विचार करा. आपण शय्येवर नाही तर मृत्यू शय्येवर बसलेलो आहोत असे समजा आणि स्वतःशी प्रामाणिक राहा. जर तुम्ही दिवसभरात कोणाशी खोटेपणाने वागला नसाल, कोणाला दुखावले नसेल, कोणाला फसवले नसेल, तर तुम्हाला पुढच्या दिवसाची भ्रांत करायची गरज नाही. तुमचे कर्म चांगले असेल तर फळ चांगलेच मिळेल याची खात्री बाळगा. आणि शांत झोप लागण्यासाठी पुढील उपाय करा. 

>> लहान मुलांसारखे फक्त झोपायचे आहे असे ठरवून त्या स्थितीचा आनंद घ्या. तुमचे मनच नाही तर शरीर आणि मुख्यतः डोकं हलके झाल्यासारखे वाटू लागेल. 

>> संध्याकाळी हलका आहार घ्या. मांसाहार किंवा जड पदार्थ खाणार असाल, तर झोपण्याच्या चार तास आधी खा. 

>> झोपण्याआधी कोमट पाण्याने स्नान करा. अंघोळीमुळे केवळ अंगावरचा मळ जातो असे नाही, तर त्यामुळे मनःशुद्धी सुद्धा होते.

>> ज्या खोलीत झोपता त्या खोलीत एखाद्या कोपऱ्यात तेलाचा दिवा लावा. छोटीशी वाटणारी ही गोष्ट खूप प्रभावी ठरेल, करून बघा. 

>> उत्तर दिशेला डोकं करून झोपू नका. कारण उत्तर दिशेला डोकं करून झोपल्याने मेंदूकडे रक्तस्त्राव होऊन अस्वस्थता वाढते. तुम्ही बर्फ़ाळ प्रदेशात राहात असाल तर दक्षिण दिशेला डोकं करून झोपू नका आणि उष्म प्रदेशात राहात असाल तर उत्तर दिशेला डोकं करून झोपू नका. हा साधा नियम लक्षात ठेवा. 

>> अलार्मच्या झटक्याने झोपेतून जागे होणे चांगले नाही. प्रत्येकाला आपल्या झोपेची गरज माहीत असते. त्यानुसार झोपेची वेळ पूर्ण करण्यासाठी लवकर झोपा आणि नैसर्गिक रित्या जाग येऊ द्या. 

>> विश्रांतीच्या अवस्थेतून तुम्ही  तेव्हा सक्रिय होण्यासाठी डाव्या कुशीवर वळून उठा. दोन्ही हात चोळून डोळ्यावर ठेवा. तुमची मज्जासंस्था जागृत होते. शरीर हलवण्याआधी मेंदू सक्रिय करणे गरजेचे असते. 

लक्षात ठेवा, दिवसापेक्षा रात्रीच्या झोपेत तुमचा व्यक्तिमत्त्व विकास वेगाने होतो. त्यामुळेच सकारात्मकता वाढते आणि आयुष्य आनंदी होते. त्यामुळे साधी झोप नाही तर शांत झोप महत्त्वाची असते हे कायम लक्षात ठेवा!

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी