शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

kojagiri Purnima 2024: कोजागरीला 'कोss जागर्ति' म्हणत लक्ष्मी माता खरंच येते का? वाचा जागरणाचे महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 12:03 IST

Kojagiri Purnima 2024: मोबाइल हाती आल्यापासुन आपले रोजचेच जागरण होते, तरी आजच्या रात्री जागरणाचे वेगळे महत्त्व काय ते जाणून घ्या!

अश्विन शुद्ध पौर्णिमेला 'कोजागिरी पौर्णिमा' म्हणतात. आज १६ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमा आहे. आजच्या रात्री लक्ष्मी पूजन करायचे असते व रास-गरबा खेळत रात्रभर जागरण करायचे असते. आजच्या रात्री देवी लक्ष्मी येऊन पाहते, `कोण जागे आहे?' जो जागत असेल, त्याला देवीचा आशीर्वाद मिळतो आणि खुद्द लक्ष्मीचा वरदहस्त म्हणजे धनसंपत्तीचा वर्षाव! हे महत्त्व लक्षात घेऊन अनेक जण कोजागिरी पौर्णिमेचे व्रत करतात.

कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव, आनंदाचा उत्सव! जागे राहणे म्हणजे केवळ झोपलेले नसणे, हा त्याचा अर्थ नाही. मोबाइल हाती आल्यापासुन तसे जागरण तर आपण रोजच करतो. परंतु, आपल्या कर्तव्याप्रती, धर्माप्रती, संस्कृतीप्रती, जागृत असणे महत्त्वाचे! जो कोणी अशा पद्धतीने जागृत असतो, अशा जागृत माणसालाच लक्ष्मी प्राप्त होते. आळशी, प्रमादी, झोपाळू माणसापासून लक्ष्मी दूर जाते. 

कोजागिरी पौर्णिमेला चंद्र सोळा कलांनी फुललेला असतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ असतो. संपूर्ण वर्षापेक्षा त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो. चातुर्मासात मेघ भरलेले असल्यामुळे चंद्रदर्शन होत नाही. त्यामुळे पाऊस गेल्यानंतरच्या निरभ्र आकाशात चंद्र अधिक आकर्षक वाटतो. 

चंद्राजवळ सुंदरता आणि शीतलता आहे. ती आपल्याही आयुष्यात यावी, हा चंद्रदर्शनाचा हेतू. आपल्या सभोवताली अशी शांत वृत्तीचे लोक विंâवा संतवृत्तीचे लोक असतील, तर आपण त्यांच्या सहवासात रमतो. त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करतो. चंद्रदर्शनही असेच विलोभनीय असते. कोजागिरीनिमित्त त्याच्या सान्निध्यात वेळ घालवणे, हे निमित्त! त्यानिमित्ताने खाण्याचे-गाण्याचे कार्यक्रम रंगतात. चंद्रावर आधारित गाण्यांनी वातावरणात आणखीनच प्रसन्नता येते. 

लक्ष्मीचे वाहन हत्ती असल्यामुळे पाटावर रांगोळी किंवा तांदुळाने हत्ती रेखाटून त्याला हळद-कुंकू वाहिले जाते. फुले , हार वाहिले जातात. श्रीसुक्त किंवा देवीचे स्तोत्र म्हटले जाते. देवीला आणि चंद्राला दुधसाखरेचा नैवेद्य दाखवला जातो. चंद्रकिरणे दुधात पडल्यावर तो प्रसाद सर्वांना वाटला जातो. दुधाच्या जोडीला पोह्यांचा बेत ठेवला जातो. पूजा झाली, की देवीचा श्लोक म्हणून पूजेची सांगता केली जाते.

अश्विने शुद्धपक्षे तु भवेद्या चैव पूर्णिमातद्रात्रौ पूजनं कुर्याच्छ्रियो जागृतिपूर्वकम्निशीये वरदा लक्ष्मी: को जागतीरति भाषिणीजगति भ्रमते तस्यां लोकचेष्टावलोकिनीतस्मै वित्तं प्रयच्छामि यो जागर्ति महितले।।

‘रांधा, वाढा आणि उष्टी काढा’, या जीवनसूत्रात अडकलेल्या स्त्रियांना या सणांच्या निमित्ताने थोडीशी विश्रांती, मनोरंजन, पोटभर गप्पा आणि खिरापतीची मेजवानी. 

टॅग्स :kojagariकोजागिरीAstrologyफलज्योतिष