दु:खाचे मूळ जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 04:28 AM2020-08-13T04:28:10+5:302020-08-13T04:28:19+5:30

आज जगभरात शेकडो विपश्यना केंद्रे आहेत. तेथे विपश्यना विद्या शिकविली जाते. ही विद्या शिकण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. दान पद्धतीवर विपश्यना केंद्रांची व्यवस्था चालते.

Know the root of grief | दु:खाचे मूळ जाणून घ्या

दु:खाचे मूळ जाणून घ्या

googlenewsNext

- फरेदुन भुजवाला

भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितले आहे की, जितके भौतिक पदार्थ आहेत, ते कलापांपासून बनलेले आहेत़ कलाप अणूपेक्षाही छोटा भौतिक घटक आहे, ज्याचा स्वभाव आहे उत्पन्न होणे व नष्ट होणे़ कलाप उत्पन्न होताच नष्ट होण्याची क्रिया आरंभ होते़ प्रत्येक कलापात आठ आधारभूत पदार्थ आहेत - पृथ्वी, वायू, जल, अग्नी तसेच वर्ण, गंध, रस आणि ओज़ यांना वेगळे केले जाऊ शकत नाही़ हे सर्व एक साथ उत्पन्न होऊन नष्ट होतात, म्हणजे सतत परिवर्तनशील आहेत़ यांपैकी प्रथम चार मूलभूत गुण आहेत व इतर गौण आहेत़ जेव्हा हे आठ एकत्र येतात, तेव्हाच कलाप बनतो़ दुसऱ्या शब्दात कलाप समूह त्याला म्हणतात, जेव्हा ही आठ आधारभूत तत्त्वं एक साथ मोठ्या संख्येने चिकटलेली असतात़ तेव्हाच ते मनुष्य वा अन्य प्राणी अथवा पदार्थांच्या रूपाने दिसतात़ कलाप क्षणभरासाठी राहतो आणि पापणीची उघडझाप व्हावी तेवढ्या वेळात अब्जो-खर्बो कलाप उत्पन्न आणि नष्ट होतात़ हे कलाप सतत परिवर्तनशील आहेत़ मनुष्याचे शरीर तसे ठोस नाही जसे दिसते, तर हे नाम-रूपाचा समुच्चय आहे़ हे शरीर असंख्य कलापांनी बनलेले आहे, जे सतत परिवर्तनशील आहे़ कलाप प्रत्येक क्षणी नष्ट होतो आणि तयार होतो़ याचे नष्ट होणे आणि बनणे दु:खच तर आहे़ हेच दु:ख सत्य आहे़ जेव्हा आपण अनित्यतेला दु:ख समजू लागतो, तेव्हाच आपण दु:ख सत्याला खºया अर्थाने समजतो, आपण स्वत: अनुभव करतो. विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका यांचे गुरू सयाजी उ बा खिन यांनी प्रवचनात वारंवार याचा उल्लेख केला आहे़ सयाजी उ बा खिन यांच्याकडून विपश्यना विद्येचा सखोल अभ्यास शिकल्यानंतर सत्यनारायण गोएंका यांनी जगभरात याचा प्रचार आणि प्रसार केला. आज जगभरात शेकडो विपश्यना केंद्रे आहेत. तेथे विपश्यना विद्या शिकविली जाते. ही विद्या शिकण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. दान पद्धतीवर विपश्यना केंद्रांची व्यवस्था चालते.

Web Title: Know the root of grief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.