शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
2
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 
3
ऑटोमॅटीक कार चालवत असाल तर लक्ष द्या; रक्ताच्या गुठळ्या, कार्डियाक अरेस्टचा धोका
4
"मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?
5
"३ महिन्यात निर्णय घ्या"; कोर्टाच्या निर्णयावर उपराष्ट्रपती नाराज, म्हणाले, "न्यायालय आदेश देऊ शकत नाही"
6
माझा आजचा दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे; कारण सांगत धनंजय मुंडेंनी दिली माहिती
7
हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा; नेते म्हणाले, “आमच्यावर भाषा लादू शकत नाही”
8
पंचांशी वाद घातल्याबद्दल मुनाफ पटेलला बीसीसीआयने ठोठावला दंड, दिल्ली- राजस्थान सामन्यात काय घडलंं?
9
२०३२ पर्यंत गुरुची अतिचारी गती: ९ राशींना गुरुबळ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; बक्कळ लाभ, भरभराट!
10
चीनच्या कंपनीने मारुतीच्या फ्राँक्सची कॉपी केली; 1200 किमी रेंजवाली एसयुव्ही लाँच केली
11
२०० रुपयांपर्यंतचे Jio, Airtel आणि Vi चे प्लान्स, मिळताहेत जबरदस्त बेनिफिट्स
12
"तुम मराठी लोग गंदा है...", घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद, मनसैनिकांनी काय केलं पाहा...
13
सोन्याच्या दरात मोठी तेजी, पोहोचलं १ लाखांच्या जवळ, किंमत कमी होण्याची शक्यता आहे का? पाहा नवे दर
14
लोणावळा रेल्वे रुळाजवळ सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ!
15
IPL 2025: २५ दिवसांपूर्वी केलेली भविष्यवाणी आज काव्या मारनला हसवणार की रडवणार? प्रकरण काय
16
"एकनाथ शिंदेंच्या घरात शूटिंग केलं तेव्हा.."; क्षितीश दातेने सांगितला 'धर्मवीर'चा अनुभव
17
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा कुबेर महाराजांची तसबीर आणि 'या' पाच भाग्यदायी वस्तू!
18
"स्क्रीनवर चांगली दिसण्यासाठी ती...", श्रीदेवीच्या मृत्यूबाबतीत बोनी कपूर यांचा धक्कादायक खुलासा
19
Dia Mirza : "तो सीन करताना मी थरथरत होती, मला उलटी झाली"; दीया मिर्झाने सांगितला शुटिंगचा अनुभव
20
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले दीड कोटी! आता बोनस शेअर्स आणि लाभांशाची लागणार लॉटरी

‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 08:50 IST

Shri Swami Samarth Manas Puja: श्री स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा कशी करावी? जाणून घ्या...

Shri Swami Samarth Manas Puja: श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला, तरी एक विश्वास, चैतन्य आणि आनंद मिळतो, असा अनेकांचा अनुभव आहे. दत्तगुरुंचा अवतार असलेले स्वामी समर्थ महाराजांची कोट्यवधी घरांमध्ये नित्यनियमाने पूजा, नामस्मरण केले जाते. अनेकविध ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे मठ आहेत. या स्वामींच्या मठात जाऊन हजारो भाविक दर्शन घेतात. स्वामी समर्थ महाराजांसमोर नतमस्तक होतात. अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी भाविकांची श्रद्धा आहे. प्रत्यक्ष मठात जाणे, स्वामींचे नित्यनियमाने पूजन करणे शक्य नसेल तर काळजी करू नये. स्वामी समर्थ मानस पूजा करावी, असे म्हटले जाते.

मानस पूजा म्हणजे मनातल्या मनात केलेली पूजा. अशा मानस पूजेसाठी मूर्ती, प्रतिमा, चित्र पाहिजे असे नाही. आपल्या इष्ट देवताचे स्वरुप आपल्या मन:पटलावर आणून त्याची मानसिक अर्चना करणे, म्हणजे मानसपूजा. अशी पूजा करणे सोपे नाही. त्यात नुसती शब्दांचे उच्चारण करायची नसते, तर मनाची पूर्ण एकाग्रता साधून पूजा करावी, असे सांगितले जाते. मानसपूजा म्हणजे काय? तर बाह्य कर्मकांडाचे उपचार न करता मनानेच सर्वसमर्पणयुक्त केलेली देवतेची पूजा. शिव मानस पूजा किंवा देवी मानस पूजा प्रचलित आणि प्रसिद्ध आहे. 

कोट्यवधी घरांमध्ये दररोज आपापल्या आराध्य देवतांची देवपूजा केली जाते. आजच्या धकाधकीच्या आणि बिझी शेड्युलमुळे अनेकदा घाईघाईत पूजा उरकली जाते. अनेकदा नैमित्तिक कामाचा भाग म्हणून ती एक औपचारिकता झालेली असते. अनेकदा पूजा म्हणजे कोरडे उपचार होतात. वेळेअभावी किंवा इतर काही कारणाने जेथे बाह्य कर्म पूजा करणे जमत नाही. अशा वेळी या दोघांमधील सुवर्णमध्य साधणारी साधना म्हणजे मानसपूजा. जेथे तुम्हाला बाह्य पूजा उपचार केल्याचे मानसिक समाधानही मिळते आणि मनाची सात्विक बैठक सिद्ध होऊन भगवंताशी अनुसंधान राखण्यास मदत ही होते. सगुण आराधनेने समाधान आणि त्याचवेळी निर्गुणाकडे होणारी वाटचाल याचा एकत्रित आनंद देणारी उपासना म्हणजे मानसपूजा.परमेश्वराप्रती संपूर्ण समर्पणभाव ठेवून केलेली ही मानसपूजाच परमेश्वराला अपेक्षित असते. प्रथम ध्यान श्लोकाने स्वामी समर्थ महाराजांचे स्वरूप मनात स्थिर करावे.

श्री स्वामी समर्थ मानस पूजा

|| श्रीगणेशाय नम: ||

नमो स्वामी राजम दत्तावतारम || श्री विष्णु ब्रम्हा शिवशक्ति रूपम || ब्रम्ह स्वरूपाय करूणा कराय || स्वामी समर्थाय नमो नमस्ते ||

हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा || मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा || कुठें माय माझी म्हणे बाळ जैसा || समर्था तुम्हा विण हो जीव तैसा || १ ||

स्वामी समर्था तुम्ही स्मतृगामी || हृदयासनी या बसा प्रार्थितो मी || पूजेचे यथासांग साहित्य केले || मखरांत स्वामी गुरू बैसविले || २ ||

महाशक्ति जेथे उभ्या ठाकताती || जिथें सर्व सिद्धी पदी लोळताती असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ || परब्रह्म साक्षात गुरूदेव दत्त || ३ ||

सुवर्ण ताटी महारत्न ज्योती || ओवाळोनी अक्षता लावू मोती || शुभारंभ ऐसा करूनी पूजेला || चरणा वरी ठेवूया मस्तकाला || ४ ||

हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा || तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा ।। प्रणिपात साष्टांग शरणागताचा || तुम्ही वाहिला भार या जीवनाचा || ५ ||

ही ब्रम्हपूजा महाविष्णू पूजा || शिव शंकराची असें शक्तिपूजा || दहीदुध शुद्धोदकाने तयाला || पंचामृती स्नान घालू प्रभूला || ६ ||

वीणा तुतार्‍या किती वाजताती || शंखादि वाद्ये पहा गर्जताती ।। म्हणती नगारे गुरूदेव दत्त || श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ || ७ ||

प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली || श्री दत्तस्वामीसिया स्नान घाली।। महासिद्ध आलें पदतीर्थ घ्याया || महिमा तयांचा कळता जगा या || ८ ||

मीं धन्य झालो हे तीर्थ घेता || घडू दे पूजा ही यथासांग आता।। अजानबाहू भव्य कांती सतेज || नसे मानवी देह हा स्वामीराज || ९ ||

प्रत्यक्ष श्रीसदगुरू दत्तराज || तया घालुया रेशिमी वस्त्र साज || सुगंधित भाळी टीळा रेखियेला || शिरी हा जरीटोप शोभे तयाला || १० ||

वक्षस्थळी लाविल्या चंदनाचा || सुवास तो वाढवी भाव साचा || शिरी वाहूया बिल्व तुलसीदलाते || गुलाब जाई जुई अत्तराते || ११ ||

गंधाक्षता वाहूनीया पदाला || ही अर्पूया जीवन पुष्प माला || चरणी करांनी मिठी मारू देई || म्हणे लेकरासी सांभाळ आई || १२ ||

इथें लावुया केशर कस्तुरीचा || सुगंधीत हा धूप नानाप्रतिचा || पुष्पांजली ही तुम्हा अर्पियेली || गगनांतूनी पुष्प वृष्टी जहाली || १३ ||

करूणावतारी अवधूत कीर्ति || दयेची कृपेचीं जशी शुद्धमूर्ती || प्रभा फाकली शक्तिच्या मंडलांची || अशी दिव्यता स्वामी योगेश्र्वरांची || १४ ||

हृदमंदिराची ही स्नेह ज्योती || मला दाखवी स्वामिची योगमुर्ति || करू आरती आर्त भावे प्रभूची || गुरूदेव स्वामी दत्तात्रयाची || १५ ||

पंचारती ही असे पंचप्राण || ओवाळूनी ठेवू चरणा वरून || निघेना पुढें शब्द बोलू मी तोही || मनीचें तुम्ही जाणता सर्व काहीं || १६ ||

हे स्वामीराजा बसा भोजनाला || हा पंचपक्वान्न नैवेद्य केला || पुरणाची पोळी तुम्हा आवडीची || लाडू करंजी असें ही खव्याची || १७ ||

डाळिंब द्राक्षें फळें आणि मेवा || हे केशरी दूध घ्या स्वामीदेवा || पुढें हात केला या लेकरानें || प्रसाद द्यावा आपुल्या करानें || १८ ||

तांबुल घ्यावा स्वामी समर्था || चरणाची सेवा करू द्यावी आता || प्रसन्नतेतून मागू मी काय || हृदयी ठेव माते तुझे दोन्हीं पाय || १९ ||

सर्वस्व हा जीव चरणीच ठेवू || दुजी दक्षिणा मी तुम्हां काय देऊ || नको दूर लोटू आपुल्या मुलासी || कृपा छत्र तुमचेच या बालकासी || २० ||

धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला || पदी ठेवू दे शीर शरणा गताला || हृदयी भाव यावें असे तळमळीचे || करी पुर्ण कल्याण जे या जिवाचे || २१ ||

तुझें बाळ पाही तुझी वाट देवा || नका वेळ लावू कृपाहस्त ठेवा || मनी पूजनाची असे दिव्य ठेव || वसो माझीया अन्तरी स्वामी देव || २२ ||

|| श्री दत्तार्पणमस्तु ||

|| श्रीगुरूदेव दत्त ||

|| श्री स्वामी समर्थ || 

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३spiritualअध्यात्मिक