कार्तिक विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत पूजन, गणपती करेल कल्याण-मंगल; पाहा, महत्त्व-मान्यता

By देवेश फडके | Updated: October 24, 2025 10:02 IST2025-10-24T10:01:57+5:302025-10-24T10:02:16+5:30

Kartik Vinayak Chaturthi October 2025: चातुर्मासातील ही शेवटची विनायक चतुर्थी असून, व्रत पूजनात काही गोष्टींचा अवश्य समावेश करावा, असे सांगितले जाते.

kartik vinayak chaturthi october 2025 date know how to do fast and vrat puja vidhi of lord ganesha will bring you good fortune importance in marathi | कार्तिक विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत पूजन, गणपती करेल कल्याण-मंगल; पाहा, महत्त्व-मान्यता

कार्तिक विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत पूजन, गणपती करेल कल्याण-मंगल; पाहा, महत्त्व-मान्यता

Kartik Vinayak Chaturthi October 2025: आनंद, चैतन्य आणि उत्साहाने भरलेला दिवाळीचा सण सरताना पुन्हा एकदा गणपती बाप्पाचे शुभाशिर्वाद प्राप्त करण्याची सुवर्ण संधी म्हणजे कार्तिक महिन्यातील विनायक चतुर्थी व्रत. लक्ष्मी पूजनात लक्ष्मी देवीसह बुद्धिदाता गणपतीचे पूजन करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. अश्विन अमावास्येनंतर कार्तिक शुद्ध चतुर्थीला येणाऱ्या विनायक चतुर्थीच्या व्रतात गणपती पूजन करून बाप्पाची सेवा केली जाते. चातुर्मासातील शेवटची असलेली कार्तिक विनायक चतुर्थी कधी आहे? घरच्या घरी व्रत पूजन कसे करावे? जाणून घेऊया...

मराठी वर्षातील सर्वाधिक महत्त्व असलेला चातुर्मास काळ सुरू असून, कार्तिक शुद्ध एकादशीला याची सांगता होईल. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणपतीची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी, कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थीचे व्रत केले जाते. शनिवार, २५ ऑक्टोबर २०२५ रोजी कार्तिक महिन्यातील विनायक चतुर्थी आहे.

कुळधर्म, कुळाचार, परंपरा याप्रमाणे विधी करावेत 

शक्य असेल तर आवर्जून गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घ्यावे. तसेच आपापले कुळधर्म, कुळाचार, परंपरा याप्रमाणे विधी करावेत. विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी सोडावे, असे शास्त्रात म्हटले आहे.

गणपती पूजन करताना ‘या’ गोष्टी विसरू नका

अनेकदा मनात इच्छा असूनही व्रत पूजन करता येतेच असे नाही. अशावेळेस सकाळी पाच मिनिटे मोकळी ठेवून गणपती बाप्पाला एक दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी. मनोभावे नमस्कार करावा. प्रार्थना करावी. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात. सुख-समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात, असे म्हटले जाते. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गणपतीला आवडणाऱ्या लाडू, मोदक किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले अवश्य वाहावीत. असे केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन शुभाशिर्वाद देतो, असे म्हटले जाते.

विनायक चतुर्थी व्रत पूजनाची पद्धत

विनायक चतुर्थीला दिवसभर उपवास करावा. सकाळी लवकर उठून नित्यकर्मे करावीत. गणेश पूजनाचा संकल्प करावा. एका चौरंगावर गणपतीची स्थापना करावी. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. षोडशोपचार पद्धतीने पूजा शक्य नसेल, तर पंचोपचाराने गणपती पूजन करावे. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. गणपतीला लाडू, मोदक यांचा नैवेद्य दाखवावा. गणपतीची आरती करून मनोभावे नमस्कार करावा. 

॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥

 

Web Title : कार्तिक विनायक चतुर्थी 2025: शुभ तिथि, पूजा विधि और महत्व

Web Summary : कार्तिक विनायक चतुर्थी 25 अक्टूबर, 2025 को, गणेश का आशीर्वाद पाने का अवसर प्रदान करती है। व्रत रखें, दूर्वा घास, फूल और मिठाई से गणेश की पूजा करें। पारिवारिक परंपराओं का पालन करें और समृद्धि के लिए 'ओम गं गणपतये नम:' का जाप करें।

Web Title : Kartik Vinayak Chaturthi 2025: Auspicious date, Puja Vidhi, and Significance

Web Summary : Kartik Vinayak Chaturthi on October 25, 2025, offers a chance to seek Ganesha's blessings. Observe the fast, worship Ganesha with Durva grass, flowers, and sweets. Follow family traditions and chant 'Om Gan Ganapataye Namah' for prosperity.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.