सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 11:15 IST2025-11-02T11:13:24+5:302025-11-02T11:15:12+5:30
Kartik Som Pradosh Vrat 2025: सोम प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी तसेच प्रदोष काळी काही शिव मंत्रांचे जप करणे सर्वोत्तम फलदायी मानले गेले आहे.

सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
Kartik Som Pradosh Vrat 2025: अलीकडेच मराठीतील अत्यंत महात्म्य असलेला आणि अनन्य साधारण महत्त्वाचा चातुर्मास काळ समाप्त झाला आहे. कार्तिक महिना सुरू आहे. या कार्तिक महिन्यातील प्रदोष व्रत सोमवारी येत आहे. महादेव शिवशंकरांना समर्पित असलेले प्रदोष व्रत अत्यंत शुभ फलदायी असल्याचे म्हटले जाते. सोमवार, ०३ नोव्हेंबर २०२५ रोजी सोम प्रदोष आहे. सोमवारी प्रदोष येणे शुभ पुण्य फलदायी मानले जात आहे. सोम प्रदोष व्रत पूजन करताना काही मंत्रांचे यथाशक्ती जप करणे, लाभाचे मानले जाते. जाणून घेऊया...
प्रदोष व्रत तिथी सोमवारी येते तेव्हा त्याला सोम प्रदोष व्रत म्हणतात. प्रदोष दिनी केलेले महादेवांचे पूजन पुण्य फलदायी तसेच शुभ लाभदायी मानले गेले आहे. सोम प्रदोषाच्या दिवशी कुंडलीतील चंद्र ग्रह मजबूत होण्यासाठी चंद्रदेवाशी निगडीत गोष्टी अर्पण कराव्यात, दानधर्म करावा, चंद्रदेवाचे मंत्र जपून नामस्मरण करावे, असे म्हटले जाते. सोम प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी तसेच सायंकाळी दिवेलागणीला प्रदोष काळी काही मंत्रांचे जप करणे सर्वोत्तम फलदायी मानले गेले आहे.
सोम प्रदोष व्रतात जप करायचे अत्यंत प्रभावी शिव मंत्र
महामृत्युंजय मंत्र
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
मृत्युंजयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे। अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः।।
शिव गायत्री मंत्र
ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि, तन्नो रुद्रः प्रचोदयात्।
शिव नामावली मंत्र
॥ श्री शिवाय नम:॥
॥ श्री शंकराय नम:॥
॥ श्री महेश्वराय नम:॥
॥ श्री सांबसदाशिवाय नम:॥
॥ श्री रुद्राय नम:॥
॥ॐ पार्वतीपतये नम: ॥
॥ॐ नमो नीलकण्ठाय नम:॥
- अगदीच काही शक्य झाले नाही, तर केवळ पाच मिनिटांचा वेळ काढावा अन् महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा.
॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ हर हर महादेव ॥