Kalashtami 2022: कालाष्टमीच्या मुहूर्तावर 'अशा' रीतीने करा कालभैरवाची पूजा; टाळा 'या' चुका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 13:24 IST2022-12-13T13:24:00+5:302022-12-13T13:24:15+5:30
Kalashtami 2022: १६ डिसेंबर रोजी कालाष्टमी आहे. या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात. यादिवशी शिव पार्वतीचीही पूजा केली जाते.

Kalashtami 2022: कालाष्टमीच्या मुहूर्तावर 'अशा' रीतीने करा कालभैरवाची पूजा; टाळा 'या' चुका!
कालभैरव हा भगवान शिवाचा उग्र अवतार आहे. तर प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी ही कालभैरवाला समर्पित असते, म्हणून तिला कालाष्टमी म्हणतात. त्यादिवशी कालभैरवाची पूजा करतात. कालभैरवाला प्रसन्न केल्याने जीवनातील सर्व दु:ख दूर होतात. तसेच दुर्गा मातेच्या पूजेसाठीही ही तिथी महत्त्वाची मानली जाते. शुक्रवार, १६ डिसेंबर रोजी कालाष्टमी आहे. या दिवशी कालभैरवाची पूजा करण्यासोबतच इतर काही नियमांचे पालन केल्यानेही खूप फायदा होतो.
कालाष्टमीला काय करावे आणि काय करू नये -
- कालाष्टमीच्या दिवशी भगवान कालभैरवाची पूजा विधीपूर्वक करावी. या दिवशी कालभैरवाची कथा जरूर ऐकावी. तसेच काल भैरव मंत्र 'ओम काल भैरवाय नमः' चा जप करावा.
- कालाष्टमीच्या दिवशी गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करावे. शक्य असल्यास कालभैरव मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावावा.
- कालाष्टमीच्या दिवशी कुत्र्याला पोळी किंवा भाकरी खाऊ घाला.
- कालाष्टमीच्या दिवशी कोणाशीही खोटे बोलण्याची किंवा फसवणूक करण्याची चूक करू नका. असे केल्याने तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
- कालभैरवाची पूजा करण्याबरोबरच भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा.
- कालभैरवाची पूजा करताना मनात कोणाबद्दल विपरीत भाव आणू नये. कोणाचे वाईट चिंतू नये. त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात.