कालभैरव जयंतीला शंकराचार्यांनी रचलेले स्तोत्र दिवसभरात किंवा झोपण्यापूर्वी आवर्जून म्हणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 13:43 IST2023-12-04T13:42:49+5:302023-12-04T13:43:03+5:30
Kaal Bhairav Jayanti 2023: ५ डिसेंबर रोजी कालभैरव जयंती आहे; या दिवशी कालभैरवाची उपासना करण्याबरोबरच दिलेले स्तोत्र नक्की म्हणा!

कालभैरव जयंतीला शंकराचार्यांनी रचलेले स्तोत्र दिवसभरात किंवा झोपण्यापूर्वी आवर्जून म्हणा!
देवाधिदेव महादेव यांना आपण भोलेनाथ म्हणतो. परंतु त्यांनी तिसरा डोळा उघडला की नजरेस पडतो, तो त्यांचा रुद्रावतार! असेच शत्रूंच्या संहारासाठी त्यांनी धारण केलेले एक रूप म्हणजे कालभैरव. मंगळवारी ५ डिसेंबर रोजी त्यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने जगद्गुरू शंकराचार्य निर्मित सदर स्तोत्राचे आवर्जून पठण करावे.
भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते, असे सांगितले जाते. कालाष्टमीच्या दिवशी काळभैरवांचा जन्म झाला होता. त्यामुळे कार्तिक महिन्यातील अष्टमीला काळभैरव अष्टमी असे देखील म्हटले जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षातील अष्टमी ही काळभैरवला समर्पित आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्यात "कालाष्टमी" असते. पण या सर्वात महत्वाची कार्तिक महिन्याची अष्टमी असून हा दिवस पापी, अत्याचारी व अन्यायी लोकांना शिक्षा देण्याचा दिवस म्हणून मानला जातो, अशी आख्यायिका आहे. मान्यतेनुसार काळा कुत्रा हा काळभैरवचे प्रतीक मानला जातो. या दिवशी काळभैरवाष्टक तसेच महाकाळभैरवाष्टक म्हणावे. व काळभैरवाची स्तुती करावी.
कालभैरवाष्टकम्
देवराज्य सेव्यमान पावनाघ्रिपंकजम्।
व्यालयज्ञ सूत्रमिंदू शेखरं कृपाकरम्।
नारदादि योगिवृंद वंदितं दिगंबरम्।
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे ।।१।।
भानुकोटिभास्वरं भवाब्दितारकं परं।
नीलकण्ठमीप्सिथार्थ दायकं त्रिलोचनम।
कालकाल मम्बुजाक्ष मक्षशूलमक्षरं।
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।२।।
शूलटंक पाशदण्ड पाणिमादिकारणं।
श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम।
भीमविक्रम प्रभुं विचित्र तांडवप्रियं।
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।३।।
भुक्तिमुक्ति दायकं प्रशस्तलोकविग्रहं।
भक्तवस्तलं स्थितं समस्तलोकविग्रहं।
विनिकण्वन्मनोज्ञ् हेम् किंकिणीलस्तकटिं।
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।४।।
धर्मसेतू पालकं अधर्ममार्ग् नाशकम्।
कर्मपाशमोचकम् सुशर्मदारकम् विभुम्।
स्वर्णवर्ण शेष् पाश शोभितांगमण्डलं।
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।५।।
रत्नपादुकाप्रभाभिराम पाद युग्मकम्।
नित्यमद्वितीयमिष्ट दैवतं निरंजनम्।
मृत्युदर्प नाशनं करालदंष्ट्र मोक्षणम्।
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।६।।
अट्टहास भिन्नपद्म जाण्ड् कोश संततिं।
दृष्टिपात नष्टपाप जालमुग्र शासनं।
अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्धरं।
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।७।।
भूतसंघनायकं विशालकिर्तीदायकं।
काशिवास लोकपुण्यपापशोधकं विभुम्।
नितिमार्गकोविदम् पुरातनम् जगत्पतिं।
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।८।।
कालभैरवाष्टकम् पठन्ति ये मनोहरं।
ज्ञानमुक्ति साधनम् विचित्रपुण्यवर्धनम्।
शोक मोह दैन्य लोभ कोपतापनाशनम्।
ते प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधिम् धृवम् ।।९।।
इति श्रीमत् शंकराचार्यविरचितं कालभैरवाष्टकम् संपूर्णम्।