शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते"; आमचे आदर्श मुस्लिमविरोधी नसल्याचे राजनाथ सिंहांचे विधान
2
Tim David नं मोडला किंग कोहलीचा विक्रम; अर्धशतकी खेळीसह असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
3
“कधीही कोणत्याही उपराष्ट्रपतींना अशी राजकीय विधाने करताना पाहिले नाही”: कपिल सिब्बल
4
RCB vs PBKS : पावसाच्या बॅटिंगनंतर विराटसह RCB च्या स्टार फलंदाजांची 'घसरगुंडी' अन् पंजाबचा भांगडा!
5
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
6
Maiden IPL Fifty For Tim David : एकटा पडला, शेवटपर्यंत नडला अन् पहिली फिफ्टीही ठोकली
7
धक्कादायक; सोलापूरचे न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडली गोळी
8
IPL 2025 :पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तेच १८ वर्षांनी पुन्हा विराट कोहलीच्या वाट्याला आलं
9
“अमित शाह भेट वैयक्तिक होती तर तो भार सरकारी तिजोरीवर कशाला, तटकरेंनी...”; कुणी केली टीका?
10
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर भरावा लागणार जीएसटी? सरकारने केली घोषणा
11
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...
12
टेस्ला भारतात येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींची मस्क यांच्याशी चर्चा; फोनवर काय झाला संवाद?
13
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
14
IPL 2025 : जुने तेवर दिसले! दिग्गज क्रिकेटर म्हणाला; लवकरच रोहितच्या भात्यातून मोठी खेळीही येईल
15
साखरपुड्यातच होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मिठीत घेतलं अन्... लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं!
16
“काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...”; सक्तीला संजय निरुपम यांचे समर्थन
17
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
18
रोल्स रॉयसच्या कारची नावे कायम भुतांवरून का असतात? इतर कंपन्यांनी ठेवली तर कोणी घेणारही नाही...
19
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
20
शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या

Kaal Bhairav Jayanti 2022: १६ नोव्हेंबर रोजी काळभैरव जयंती; न विसरता म्हणा कालभैरवाष्टक स्तोत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 17:03 IST

Kaal Bhairav Jayanti 2022: कार्तिक अष्टमीला काळभैरव जयंती साजरी केली जाते, आपल्या परीने आपण स्तोत्रपठण करून मानसपूजा करू. 

देवाधिदेव महादेव यांना आपण भोलेनाथ म्हणतो. परंतु त्यांनी तिसरा डोळा उघडला की नजरेस पडतो, तो त्यांचा रुद्रावतार! असेच शत्रूंच्या संहारासाठी त्यांनी धारण केलेले एक रूप म्हणजे कालभैरव. बुधवारी अर्थात १६ नोव्हेंबर रोजी त्यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने जगद्गुरू शंकराचार्य निर्मित सदर स्तोत्राचे आवर्जून पठण करावे. 

भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते, असे सांगितले जाते. कालाष्टमीच्या दिवशी काळभैरवांचा जन्म झाला होता. त्यामुळे कार्तिक महिन्यातील अष्टमीला काळभैरव अष्टमी असे देखील म्हटले जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षातील अष्टमी ही काळभैरवला समर्पित आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्यात "कालाष्टमी" असते. पण या सर्वात महत्वाची कार्तिक महिन्याची अष्टमी असून हा दिवस पापी, अत्याचारी व अन्यायी लोकांना शिक्षा देण्याचा दिवस म्हणून मानला जातो, अशी आख्यायिका आहे. मान्यतेनुसार काळा कुत्रा हा काळभैरवचे प्रतीक मानला जातो. या दिवशी काळभैरवाष्टक तसेच महाकाळभैरवाष्टक म्हणावे. व काळभैरवाची स्तुती करावी. 

कालभैरवाष्टकम्

देवराज्य सेव्यमान पावनाघ्रिपंकजम्।व्यालयज्ञ सूत्रमिंदू शेखरं कृपाकरम्।नारदादि योगिवृंद वंदितं दिगंबरम्।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे ।।१।।

भानुकोटिभास्वरं भवाब्दितारकं परं।नीलकण्ठमीप्सिथार्थ दायकं त्रिलोचनम।कालकाल मम्बुजाक्ष मक्षशूलमक्षरं।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।२।।

शूलटंक पाशदण्ड पाणिमादिकारणं।श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम।भीमविक्रम प्रभुं विचित्र तांडवप्रियं।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।३।।

भुक्तिमुक्ति दायकं प्रशस्तलोकविग्रहं।भक्तवस्तलं स्थितं समस्तलोकविग्रहं।विनिकण्वन्मनोज्ञ् हेम् किंकिणीलस्तकटिं।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।४।।

धर्मसेतू पालकं अधर्ममार्ग् नाशकम्।कर्मपाशमोचकम् सुशर्मदारकम् विभुम्।स्वर्णवर्ण शेष् पाश शोभितांगमण्डलं।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।५।।

रत्नपादुकाप्रभाभिराम पाद युग्मकम्।नित्यमद्वितीयमिष्ट दैवतं निरंजनम्।मृत्युदर्प नाशनं करालदंष्ट्र मोक्षणम्।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।६।।

अट्टहास भिन्नपद्म जाण्ड् कोश संततिं।दृष्टिपात नष्टपाप जालमुग्र शासनं।अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्धरं।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।७।।

भूतसंघनायकं विशालकिर्तीदायकं।काशिवास लोकपुण्यपापशोधकं विभुम्।नितिमार्गकोविदम् पुरातनम् जगत्पतिं।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।८।।

कालभैरवाष्टकम् पठन्ति ये मनोहरं।ज्ञानमुक्ति साधनम् विचित्रपुण्यवर्धनम्।शोक मोह दैन्य लोभ कोपतापनाशनम्।ते प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधिम् धृवम् ।।९।।

इति श्रीमत् शंकराचार्यविरचितं कालभैरवाष्टकम् संपूर्णम्।