शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

आनंद तरंग: व्यापक अभिव्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 12:09 AM

परिपक्व समजतो, त्या व्यक्तीही चटकन् रागावतात. पारिजातकाच्या फुलाच्या जखमेनेही घायाळ होतात. आम्ही मनातून चांगले जग निर्माण व्हावे, असा विचार करतो

इंद्रजित देशमुखसमाजमाध्यमांनी व्यक्त होण्यासाठी मोठे माध्यम समोर आणले आहे; पण यातील व्यक्त होणे बऱ्याच प्रमाणात विकृतीच्या पातळीवर गेलेय. कळपशाही व कंपूशाहीतून प्रकट झालेले शब्दांचे विषारी तुषार अंगावर येत आहेत. खूप कमी अभिव्यक्ती विशाल व व्यापक आहे. मी स्वत:विषयी कोष निर्माण केला आहे. ‘मी सर्वज्ञ आहे. निर्दोष आहे.’ हे कोष मी माझ्याभोवती निर्माण केलेत; पण तसे दिसून येत नाही.

परिपक्व समजतो, त्या व्यक्तीही चटकन् रागावतात. पारिजातकाच्या फुलाच्या जखमेनेही घायाळ होतात. आम्ही मनातून चांगले जग निर्माण व्हावे, असा विचार करतो; पण बाह्यजगाच्या धक्क्याने त्या जगाचे स्वप्न भग्न पावतेय. संवाद, अभिव्यक्तीचा दर्जा माणसाच्या समजुतीनुसार वाढतो. जितकी समज खोल, तितका संवादाचा व अभिव्यक्तीचा दर्जा उच्चतम; पण इथे समज खोल व्हायला तयार नाही. परिपक्व लोकही काय प्रतिसाद देतील सांगता येत नाही. मन्सूर नावाच्या संतांना त्या देशातील राजाने सुळावर चढवायचे ठरविले. राजाच्या बाजूने असणारा जमाव जमला. मन्सूर यांचे गुरूही उपस्थित होते. मन्सूर यांना सुळावर देताना लोक दगड मारत होते. मन्सूर शांतपणे दगडांचा स्वीकार करीत होते; पण त्यांच्या गुरूंनी त्यांच्यावर फुले उधळली, तेव्हा ते व्यथित झाले. ‘गुरुजी तुम्हीसुद्धा?’ गुरुजींची फुले त्यांना पचवायला जड गेली; कारण अर्धवट झुंडीने मारलेले दगड सहज आहेत. कारण ते अर्धवटच आहेत; पण परिपक्व माणूसही गर्दीत सहभागी होतो तेव्हा तोही झुंडीपैकी एक होतो, हे वेदनादायी असते. म्हणून संवाद, अभिव्यक्ती दर्जेदार हवी.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक