शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Janmashtami 2024: कलियुगातही कृष्णाची भेट शक्य; कधी, कशी, कुठे ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 07:00 IST

Janmashtami 2024: दरवर्षी प्रमाणे यंदाही आपण २६ आणि २७ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी आणि गोपाळकाला उत्सव साजरा करणार आहोत, पण या उत्सवात कृष्णाची भेट कुठे घेता येईल ते पहा!

>> सौ. अस्मिता दीक्षित 

गोपालकृष्ण म्हंटले की आपल्या चेहऱ्यावर एक स्मित आल्याशिवाय राहत नाही . गोड आणि तितकीच नटखट अश्या कृष्णाची अत्यंत लोभसवाणी छबी आपल्या डोळ्यासमोर येते आणि डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागतात . हिंदू धर्मातील जनमानसात लोकप्रिय आणि आत्यंतिक आवडते दैवत म्हणजे श्री कृष्ण. कृष्णाच्या लीला , त्याच्या खोड्या आणि एकूण चरित्र ऐकत आपण सर्व लहानाचे मोठे झालो आहोत . आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर तो आपल्याला विविध रुपात भेटत जातो . कृष्णलीला आणि कृष्णनीती समजणे अवघड आहे. कृष्णाचे चरित्र समजायला खचितच सोपे नाही इतके विविध पैलू त्याला आहेत . 

श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला मध्यरात्री ह्या गोजिरवाण्या किसनाचा जन्म झाला . अष्टमी ही अपार सौंदर्याची तिथी आहे. अत्यंत तेजस्वी असे हे बालक जन्माला आले पण ते तुरुंगात .पुढे देवकी आणि यशोदेने त्याचे पोटच्या मुलाच्याही पेक्षा अधिक ममतेने संगोपन केले. देवकी आणि यशोदा ह्या दोन मातांचे प्रेम त्याला लाभले . 

श्रीकृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार आहे. रामाने पुढील जन्मात डोक्यावर मोरपीस तुझी आठवण म्हणून मिरवीन हा शब्द माता सीतेचा शोध घेण्यास मदत करणाऱ्या एका मयूरला दिल्यामुळे पुढील जन्मात श्रीकृष्णाच्या मुकुटात ते मोरपीस थाटात डोलताना दिसते. कृष्णाचे बालपण आणि एकूणच जीवन साधे सोपे नव्हते तर पदोपदी त्याला संघर्ष करायला लागला. बलरामासारखा भाऊ पाठीशी होता तरीही जन्मापासून अगदी स्वतःचे टिकवण्याची लढाई त्याला लढावी लागली.

श्रीकृष्णाचा जन्म हा वृषभ लग्नावर आणि रोहिणी नक्षत्रावर आहे जिथे चंद्र स्वतः उच्च आहे. लग्नातील चंद्राने त्याला मोहकता आणि सौंदर्य बहाल केले. कृष्णाचा अवतार संपला आणि कलियुगाची सुरवात झाली असे संदर्भ वाचनात येतात . कृष्ण हा जनमानसाचा खरा देव आहे आणि तो सामान्य जनतेचे रक्षण करतच जगला म्हणूनच जन संरक्षणासाठी त्याने कालीयाला धडा शिकवला. 

आज घरोघरी श्री कृष्णाचा जन्मोत्सव आनंदाने साजरा करतात. रात्री १२ वाजता कृष्णाला पाळण्यात घालून आरती नेवेद्य आणि दिवसभर उपवास करून भक्त आपले कृष्णाबद्दलचे प्रेम आणि निस्सीम भक्ती त्याच्या चरणी अर्पण करत आहेत .

पण खरच आपल्याला हा श्रीकृष्ण म्हणजेच हृषिकेश समजला आहे का? कोण आहे हा ? कुठे आहे? आपल्याला संपूर्ण आयुष्यात कधी भेटला आहे का ? हृषिकेश म्हणजे सर्व इंद्रियांचा स्वामी , सर्व इंद्रियांवर ताबा मिळवणारा असा तो हृषीकेश. कुठे आहे तो? तर तो आपल्या आतमध्ये म्हणजेच आपला अंतरात्मा आहे. आपण संपूर्ण आयुष्यात एक क्षणभर तरी आपल्या आत असणार्या ह्या हृशिकेशाला भेटायचा प्रयत्न सुद्धा करत नाही . आज आपण भगवत गीता वाचतो , आजकाल तर शुद्ध उच्चारांसह त्याचा प्रसार अत्यंत जोमाने चालला आहे. पण हे सर्व असले तरी प्रत्यक्ष आयुष्यात कृष्णाने सांगितलेली किती तत्वे आपण खरच आचरणात आणतो हा प्रश्न स्वतःला विचारून पहा .अनेक देवतांचे उत्स्चव आपण साजरे करतो पण त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालत आयुष्य व्यतीत करणे हीच खरी त्या देवतेची सेवा आहे त्यापासून मात्र आपण वंचित राहतो . 

आपल्याला भौतिक सुखांची आजही तितकीच लालसा हाव आहे. मी पणाचा पासून जराही मुक्त झालो नाही आपण .हे शरीर सुद्धा जिथे शाश्वत नाही आपला श्वास सुद्धा आपल्या हातात नाही तरीही सर्व साठवून ठेवण्याची हाव जात नाही. काहीही झाले तरी लगेच राग क्रोध येतो आपल्याला , मानसिक अशांतता आणि पर्यायाने शारीरिक असंख्य व्याधी ह्यातच आपले जीवन व्यतीत होते आणि शेवटच्या क्षणी मात्र आपल्या हा हृषीकेश आठवतो . पण आयुष्य व्यतीत करताना त्याची आठवण का नाही येत आपल्याला? 

हृषीकेश आहे कुठे ? तर तो तुमच्या आमच्यात प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तुत सुद्धा आहे . जिथे जिथे आपले मन जाते तिथे तिथे तो आहे. पण मग असे असूनही आपण अगदी सहज उच्च नीच भेद करतो , प्रत्येकाला कमी आणि स्वतःला अति शहाणे समजतो , आपल्यावाचून सगळ्यांचे अडणार आहे ह्या मूर्ख विचारात स्वतःला गुरफटवून घेतो आणि त्यातच धन्यता मानून जीवन जगत राहतो . माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे , कुणालाही कधीच कमी लेखू नये आणि ईश्वरी अनुसंधान जपत आयुष्य मार्गस्त करावे हि कृष्णाची शिकवण आहे , ती वाचणे आणि प्रत्यक्ष आयुष्यात जगणे ह्या दोन भिन्न  गोष्टी आहेत . मला कृष्ण आवडतो म्हणजे नेमके काय ? त्याने घालून दिलेल्या मर्यादा , शिकवण ह्याचे खरच आयुष्यात पालन करतो आपण ? तर त्याचे निश्चित उत्तर नाही असेच आहे . मोह , एकमेकांचा सतत तिरस्कार करत राहतो , पैशाच्या गुर्मीत वावरतो , दुसर्याचा पाणउतारा करण्याची एकही संधी आपण सोडत नाही. लोभ सुटत नाही आपल्याला . त्याच्यातील ह्या हृशिकेशाला आजन्म दुखावले आहे आपण,  मग हवी कश्याला त्याची संपत्ती ? आणि ती मिळून सुद्धा शांत झोप कधीच लागणार नाही कधीच नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे.  जिवंत असताना कितीही कटू असले तरी हे सत्य आहे. 

कृष्ण कोण आहे ? कृष्ण ही माया , प्रेमाची देवता आहे , प्रेमाचा अखंड झरा आहे कृष्ण .  निस्वार्थ भक्ती आणि करुणा म्हणजेच कृष्ण , अपेक्षाविरहित प्रेम म्हणजे कृष्ण , माणसातील माणुसकी जपत माणसाशी माणसासारखे वागणे , कुणालाही कमी न लेखणे आणि कुणालाही न हिणवणे हि भावना म्हणजे कृष्ण , अहंकाराने जीवनाचा ह्रास होतो म्हणून त्यापासून दूर राहावे  हि शिकवण म्हणजे कृष्ण. सरतेशेवटी समर्पण म्हणजे कृष्ण .  मग त्याच्या पावलावर पाऊल टाकताना आपणही सर्वांच्या प्रेमाच्या लायक होऊ असे वागले पाहिजे. जगावर प्रेम करायला शिकले पाहिजे पण आपण तर प्रत्येकाच्या आत असणार्या ह्या हृषीकेशाला सतत दुखावतो .

श्रीकृष्णाची पूजा केली त्याच्यासमोर दिवसभर बसून जप केला म्हणजे सगळे झाले नाही तर त्याची शिकवण आचरणात आणणे हे सगळ्यात महत्वाचे आहे. आज जन्माष्टमीला आपण पण करुया कि आजपासून आपण कुणालाही दुखावणार नाही कारण आपण एखाद्याला दुखावतो तेव्हा त्याच्यातील “ हृषीकेश “ आपल्याही नकळत दुखावलो जातो त्याचे जराही भान नसते आपल्याला हे दुर्दैव आहे . ह्या नंदसुताला काहीच नको आहे. त्याला फुले , नैवेद्य काहीही नको त्याला तुमच्या अंतरात्म्यातील प्रेम हवे आहे. आणि हेच प्रेम जगातील प्रत्येक व्यक्तीत आहे त्याची देवाण घेवाण करा हेच तर तो आपल्याला सांगत आहे . आपल्या आतमध्ये साठलेला भवनाचा कल्लोळ त्यात हा हृषीकेश गुदमरत आहे. आपले अंतर्मन स्वच्छ असुदे , त्यात ओतप्रोत प्रेम भरलेले असुदे , सर्वांच्या प्रती माया , जिव्हाळा असुदे तरच हा “ हृषीकेश “ आपल्या अंतरात्म्यात सुखावेल . एका दिवसाची जन्माष्टमी साजरी केली म्हणजे काही होत नसते तर त्याची शिकवण आणि आपल्या हृदयातील माणुसकीचा झरा पुढे आजन्म क्षणोक्षणी जतन केला वाहता राहिला तर खर्‍या अर्थाने “ जन्माष्टमी “ साजरी होईल तीही प्रत्येक क्षणी ....

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलJanmashtamiजन्माष्टमी