शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

Janmashtami 2023: कलियुगात कृष्णाचा शोध कसा व कुठे घ्यायचा? जन्माष्टमीच्या निमित्ताने कृष्णभेटीचे गूढ जाणून घेऊया!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 12:23 PM

Janmashatmi 2023: आयुष्याच्या प्रत्येक वळणावर श्रीकृष्ण भेटावा असे आपल्याला वाटते, मग त्याला शोधायचे कुठे तेही वाचा!

>> सौ. अस्मिता दीक्षित 

गोपालकृष्ण म्हंटले कि आपल्या चेहऱ्यावर एक स्मित आल्याशिवाय राहत नाही . गोड आणि तितकीच नटखट अश्या कृष्णाची अत्यंत लोभसवाणी छबी आपल्या डोळ्यासमोर येते आणि डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागतात . हिंदू धर्मातील जनमानसात लोकप्रिय आणि आत्यंतिक आवडते दैवत म्हणजे श्री कृष्ण. कृष्णाच्या लीला , त्याच्या खोड्या आणि एकूण चरित्र ऐकत आपण सर्व लहानाचे मोठे झालो आहोत . आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर तो आपल्याला विविध रुपात भेटत जातो . कृष्णलीला आणि कृष्णनीती समजणे अवघड आहे. कृष्णाचे चरित्र समजायला खचितच सोपे नाही इतके विविध पेहलू त्याला आहेत . 

श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला मध्यरात्री ह्या गोजिरवाण्या किसनाचा जन्म झाला . अष्टमी हि अपार सौंदर्याची तिथी आहे. अत्यंत तेजस्वी असे हे बालक जन्माला आले पण ते तुरुंगात .पुढे देवकी आणि यशोदेने त्याचे पोटच्या मुलाच्याही पेक्षा अधिक ममतेने संगोपन केले. देवकी आणि यशोदा ह्या दोन मातांचे प्रेम त्याला लाभले . 

श्रीकृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार आहे. रामाने पुढील जन्मात डोक्यावर मोरपीस तुझी आठवण म्हणून मिरवीन हा शब्द माता सीतेचा शोध घेण्यास मदत करणाऱ्या एका मयूरला दिल्यामुळे पुढील जन्मात श्रीकृष्णाच्या मुकुटात ते मोरपीस थाटात डोलताना दिसते. कृष्णाचे बालपण आणि एकूणच जीवन साधे सोपे नव्हते तर पदोपदी त्याला संघर्ष करायला लागला. बलरामासारखा भाऊ पाठीशी होता तरीही जन्मापासून अगदी स्वतःचे टिकवण्याची लढाई त्याला लढावी लागली.

श्रीकृष्णाचा जन्म हा वृषभ लग्नावर आणि रोहिणी नक्षत्रावर आहे जिथे चंद्र स्वतः उच्च आहे. लग्नातील चंद्राने त्याला मोहकता आणि सौंदर्य बहाल केले. कृष्णाचा अवतार संपला आणि कलियुगाची सुरवात झाली असे संदर्भ वाचनात येतात . कृष्ण हा जनमानसाचा खरा देव आहे आणि तो सामान्य जनतेचे रक्षण करतच जगला म्हणूनच जन संरक्षणासाठी त्याने कालीयाला धडा शिकवला. 

आज घरोघरी श्री कृष्णाचा जन्मोत्सव आनंदाने साजरा होत आहे. रात्री 12 वाजता कृष्णाला पाळण्यात घालून आरती नेवेद्य आणि दिवसभर उपवास करून भक्त आपले कृष्णाबद्दलचे प्रेम आणि निस्सीम भक्ती त्याच्या चरणी अर्पण करत आहेत .

पण खरच आपल्याला हा श्रीकृष्ण म्हणजेच हृषिकेश समजला आहे का? कोण आहे हा ? कुठे आहे? आपल्याला संपूर्ण आयुष्यात कधी भेटला आहे का ? हृषिकेश म्हणजे सर्व इंद्रियांचा स्वामी , सर्व इंद्रियांवर ताबा मिळवणारा असा तो हृषीकेश. कुठे आहे तो? तर तो आपल्या आतमध्ये म्हणजेच आपला अंतरात्मा आहे. आपण संपूर्ण आयुष्यात एक क्षणभर तरी आपल्या आत असणार्या ह्या हृशिकेशाला भेटायचा प्रयत्न सुद्धा करत नाही . आज आपण भगवत गीता वाचतो , आजकाल तर शुद्ध उच्चारांसह त्याचा प्रसार अत्यंत जोमाने चालला आहे. पण हे सर्व असले तरी प्रत्यक्ष आयुष्यात कृष्णाने सांगितलेली किती तत्वे आपण खरच आचरणात आणतो हा प्रश्न स्वतःला विचारून पहा .अनेक देवतांचे उत्स्चव आपण साजरे करतो पण त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालत आयुष्य व्यतीत करणे हीच खरी त्या देवतेची सेवा आहे त्यापासून मात्र आपण वंचित राहतो . 

आपल्याला भौतिक सुखांची आजही तितकीच लालसा हाव आहे. मी पणाचा पासून जराही मुक्त झालो नाही आपण .हे शरीर सुद्धा जिथे शाश्वत नाही आपला श्वास सुद्धा आपल्या हातात नाही तरीही सर्व साठवून ठेवण्याची हाव जात नाही. काहीही झाले तरी लगेच राग क्रोध येतो आपल्याला , मानसिक अशांतता आणि पर्यायाने शारीरिक असंख्य व्याधी ह्यातच आपले जीवन व्यतीत होते आणि शेवटच्या क्षणी मात्र आपल्या हा हृषीकेश आठवतो . पण आयुष्य व्यतीत करताना त्याची आठवण का नाही येत आपल्याला? 

हृषीकेश आहे कुठे ? तर तो तुमच्या आमच्यात प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तुत सुद्धा आहे . जिथे जिथे आपले मन जाते तिथे तिथे तो आहे. पण मग असे असूनही आपण अगदी सहज उच्च नीच भेद करतो , प्रत्येकाला कमी आणि स्वतःला अति शहाणे समजतो , आपल्यावाचून सगळ्यांचे अडणार आहे ह्या मूर्ख विचारात स्वतःला गुरफटवून घेतो आणि त्यातच धन्यता मानून जीवन जगत राहतो . माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे , कुणालाही कधीच कमी लेखू नये आणि ईश्वरी अनुसंधान जपत आयुष्य मार्गस्त करावे हि कृष्णाची शिकवण आहे , ती वाचणे आणि प्रत्यक्ष आयुष्यात जगणे ह्या दोन भिन्न  गोष्टी आहेत . मला कृष्ण आवडतो म्हणजे नेमके काय ? त्याने घालून दिलेल्या मर्यादा , शिकवण ह्याचे खरच आयुष्यात पालन करतो आपण ? तर त्याचे निश्चित उत्तर नाही असेच आहे . मोह , एकमेकांचा सतत तिरस्कार करत राहतो , पैशाच्या गुर्मीत वावरतो , दुसर्याचा पाणउतारा करण्याची एकही संधी आपण सोडत नाही. लोभ सुटत नाही आपल्याला . त्याच्यातील ह्या हृशिकेशाला आजन्म दुखावले आहे आपण,  मग हवी कश्याला त्याची संपत्ती ? आणि ती मिळून सुद्धा शांत झोप कधीच लागणार नाही कधीच नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे.  जिवंत असताना कितीही कटू असले तरी हे सत्य आहे. 

कृष्ण कोण आहे ? कृष्ण हि माया , प्रेमाची देवता आहे , प्रेमाचा अखंड झरा आहे कृष्ण .  निस्वार्थ भक्ती आणि करुणा म्हणजेच कृष्ण , अपेक्षाविरहित प्रेम म्हणजे कृष्ण , माणसातील माणुसकी जपत माणसाशी माणसासारखे वागणे , कुणालाही कमी न लेखणे आणि कुणालाही न हिणवणे हि भावना म्हणजे कृष्ण , अहंकाराने जीवनाचा ह्रास होतो म्हणून त्यापासून दूर राहावे  हि शिकवण म्हणजे कृष्ण. सरतेशेवटी समर्पण म्हणजे कृष्ण .  मग त्याच्या पावलावर पाऊल टाकताना आपणही सर्वांच्या प्रेमाच्या लायक होऊ असे वागले पाहिजे. जगावर प्रेम करायला शिकले पाहिजे पण आपण तर प्रत्येकाच्या आत असणार्या ह्या हृषीकेशाला सतत दुखावतो .

श्रीकृष्णाची पूजा केली त्याच्यासमोर दिवसभर बसून जप केला म्हणजे सगळे झाले नाही तर त्याची शिकवण आचरणात आणणे हे सगळ्यात महत्वाचे आहे. आज जन्माष्टमीला आपण पण करुया कि आजपासून आपण कुणालाही दुखावणार नाही कारण आपण एखाद्याला दुखावतो तेव्हा त्याच्यातील “ हृषीकेश “ आपल्याही नकळत दुखावलो जातो त्याचे जराही भान नसते आपल्याला हे दुर्दैव आहे . ह्या नंदसुताला काहीच नको आहे. त्याला फुले , नैवेद्य काहीही नको त्याला तुमच्या अंतरात्म्यातील प्रेम हवे आहे. आणि हेच प्रेम जगातील प्रत्येक व्यक्तीत आहे त्याची देवाण घेवाण करा हेच तर तो आपल्याला सांगत आहे . आपल्या आतमध्ये साठलेला भवनाचा कल्लोळ त्यात हा हृषीकेश गुदमरत आहे. आपले अंतर्मन स्वच्छ असुदे , त्यात ओतप्रोत प्रेम भरलेले असुदे , सर्वांच्या प्रती माया , जिव्हाळा असुदे तरच हा “ हृषीकेश “ आपल्या अंतरात्म्यात सुखावेल . एका दिवसाची जन्माष्टमी साजरी केली म्हणजे काही होत नसते तर त्याची शिकवण आणि आपल्या हृदयातील माणुसकीचा झरा पुढे आजन्म क्षणोक्षणी जतन केला वाहता राहिला तर खर्या अर्थाने “ जन्माष्टमी “ साजरी होईल तीही प्रत्येक क्षणी ....

श्री कृष्णार्पणमस्तु...

संपर्क : 8104639230

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीShravan Specialश्रावण स्पेशल