शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

Janmashtami 2023: गोकुळाष्टमीला हरिवंशपुराण वाचण्याचा प्रघात आहे, पण का? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 15:53 IST

Janmashtami 2023: गोकुळाष्टमीला आपण विविध प्रकारचे गोडधोड करून कृष्णाला नैवेद्य दाखवतो, त्याला जोड देतो उपासनेची; त्याचाच एक भाग म्हणजे पुराणवाचन!

आज गोकुळाष्टमी आहे. या तिथीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून हा जन्मोत्सव जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गोपाळकृष्णाची पूजा केली जाते, नैवेद्य दाखवला जातो, कथा कीर्तन केले जाते, त्याबरोबरच हरिवंश पुराण वाचण्याचाही प्रघात आहे. या पुराणात काय आहे ते जाणून घेऊ.

हरिवंश पुराणात भगवान गोपालकृष्णाच्या अनेकविध लीलांचे वर्णन असून यातील अनेक लीला कथा भागवत, नारदपुराण, पद्मपुराण इत्यादीमध्ये थोड्याफार फरकाने आल्या आहेत. भगवान विष्णूंनी पृथ्वीचा भूभार हलका करण्यासाठी यादवकुळात वसुदेव देवकीच्या पोटी श्रीकृष्णरूपाने अवतार घेतला इथपासून या ग्रंथाचा प्रारंभ होतो. 

यानंतर श्रीकृष्णाच्या गोकुळातील बालपणीच्या खोड्या, पूतना, तृणावर्त, धेनुकासुर, प्रलंब, अरिष्टासुर इत्या दैत्यांचा केलेला वध, गोकुळातील त्याची गोरस चोरी, यशोदेला घडवलेले विश्वदर्शन, इंद्रगर्वहरण, गोवर्धनोद्धार, कंस वध, जरासंधाशी युद्ध, कालयवनाचा वध इ. अनेक अद्भूतकथा आल्या आहेत. 

कृष्ण मोठा झाल्यावर द्वारकानिर्मिती, रुक्मिणीहरण, स्यमंतकमणिप्रकरण, त्याचे अनेक विवाह, सोळासहस्त्र गोपींची सुटका व त्यांच्याशी कृष्णाचा विवाह, कृष्णाच्या अष्टनायिका, त्याने केलेली युद्धे, शेवटी यादव कुळाचा संहार, उद्धवास उपदेश व शेवटी प्रभासक्षेत्री स्वात्म विसर्जन, अवतार समाप्ती इ. कथा आल्या आहेत. 

ग्रंथाच्या शेवटी हरिवंश पुराणाचे महात्म्य व फलश्रुती सांगितली असून या पुराणाचे पारायण कसे करावे, किती टप्प्यात करावे याचीही माहिती दिलेली आहे. हे हरिवंशपुराण ब्रह्मा-विष्णु-महेश स्वरूप असून याच्या श्रवण पठणाने सर्व पातकांचा नाश होतो व मनुष्याच्या सर्व पवित्र इच्छा पूर्ण होतात. सर्व संकटांचा परिहार होतो. सर्वांचे इह पर कल्याण होते व शेवटी मोक्षप्राप्ती होते असे फलश्रुतीत म्हटले आहे. 

श्रीकृष्ण हा आपला आयुष्यभराचा सोबती आहे. आकाशातला चंद्र जसा आपण चालताना आपल्याबरोबर चालतो असे वाटते, तसा गोपालकृष्ण सदैव आपल्या बरोबर चालत असतो. मग त्याचा विस्तृत परिचय नको का करून घ्यायला? गोपालकृष्णाशी समरस व्हायचे असेल, तर हरिवंशपुराण एकदा तरी मन लावून नक्की वाचा. त्याची अनेक भाषांमध्ये भाषांतरे उपलब्ध आहेत आणि इंटरनेटवर ती पीडीएफ स्वरूपातही सहज मिळू शकतील. कृष्ण जन्माच्या निमित्ताने आपणही मनाशी चंग बांधला, तर हरिवंशपुराण आपले सहज वाचून होईल!

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमी