शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

Janmashtami 2022: कृष्णजन्माच्या वेळी १०८ वेळा करा दिलेला मंत्रजप; होईल सर्व इच्छांची पूर्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 13:06 IST

Janmashtami 2022: कृष्ण नामात जेवढे सामर्थ्य आहे तेवढेच कृष्ण मंत्रातही सामर्थ्य आहे. त्यामुळे समस्त इच्छांपुर्तीसाठी कृष्ण जन्माचा क्षण चुकवू नका!

जन्माष्टमी हा अशा युगपुरुषाचा जन्मोत्सव आहे, ज्याने प्रतिकूल परिस्थितीतही अनुकूलतेने कसे जगावे याचा आदर्श जगाला घालून दिला. तो युगपुरुष म्हणजे भगवान श्रीकृष्ण! त्याने जन्म घेतला तो कारावासात, मुसळधार पावसात, मिट्ट काळोख्या रात्री कोणालाही भयाण वाटावा असा तो क्षण मात्र गोपालकृष्णाच्या जन्माने पावन झाला. कितीही कठीण प्रसंग असो, प्रबळ इच्छा असेल तर मार्ग निघतोच, हे त्याने जन्मतः दाखवून दिले आणि आयुष्यातल्या प्रत्येक कठीण प्रसंगावर हसतमुखाने मात करायलाही शिकवले.

श्रावण वद्य अष्टमीला तेव्हाची मध्यरात्र आणि आताच्या कालमापानुसार सुमारे १२. ४० मिनिटांनी कृष्ण जन्म झाला.यंदा १८ ऑगस्ट रोजी कृष्णजन्मोत्सव आहे. हा योग अतिशय शुभ मानला जातो. या मुहूर्तावर कृष्ण जन्म साजरा करावा. कृष्णाला पाळण्यात घालून फुलं गुलाल उधळून कृष्णाचा गजर करावा आणि आपल्या मनातील सुप्त इच्छा कृष्णाजवळ प्रगट करून पुढील मंत्रांपैकी एक मंत्र निवडून म्हणावा. हे मंत्र मनोभावे म्हटले असता या मंत्रांची प्रचिती येते. आपली मनोकामना पूर्ण होईपर्यंत दिलेल्या मंत्राचा रोज जास्तीत जास्त १०८ अन्यथा कमीत कमी ११ वेळा जप जरूर करावा.

मनोकामना पूर्ण करण्यासाठी -ज्योत्स्नापते नमस्तुभ्यं नमस्ते ज्योतिशां पते! नमस्ते रोहिणी कान्त अर्घ्य मे प्रतिगृह्यताम्!!

संतानप्राप्तीसाठी -देवकी सुत गोविंद वासुदेव जगत्पते! देहिमे तनयं कृष्ण त्वामहं शरणं गतः!!

विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी-ओम् क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्ल्भाय स्वाहा।

शांत-समाधानी जीवन जगण्यासाठी-ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।

नोकरी, व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी-अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीShravan Specialश्रावण स्पेशल