शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Janmashtami 2021 : श्रीकृष्णाचे जन्मरहस्य फारच कमी जणांना कळले होते...तुम्हाला माहीत होते का? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 18:25 IST

Janmashtami 2021 : जो कर्तव्याला जागतो, त्याच्या गोकुळात अर्थात इंद्रिय समूहाच्या देहात सदैव कृष्ण नांदतो!

श्रीकृष्णाच्या प्रत्येक कृतीतून बोध घेण्यासारखा आहे. धर्म नीतीसाठी आयुष्यभर झगडूनही तो सरळ सरळ मान्य करतो, 'माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा!' याचाच अर्थ त्याने आपले मोठेपण कधी बिंबवले नाही, तर त्याच्या कर्तुतत्वातून ते उलगडत गेले, अगदी जन्मापासून! आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस. त्यानिमित्ताने त्याचे जन्मरहस्य काय होते, ते जाणून घेऊया!

Janmashtami 2021 : श्रावण वद्य अष्टमीला कृष्णजन्म सोहळा का आणि कसा साजरा करतात याची सविस्तर माहिती

कंस भगिनी देवकी आणि वसुदेव यांच्या लग्नप्रसंगी वरातीचे वेळी त्या उभयतांच्या रथाचे सारथ्य प्रत्यक्ष कंस करत होता. त्यावेळेस आकाशवाणी झाली, की देवकीचा आठवा पुत्र तुझा वध करेल. ही आकाशवाणी ऐकताच संतप्त होऊन कंसाने देवकी वसुदेवाला बंदिवासात टाकले. पुढची कथा आपल्याला माहीत आहेच. यथावकाश श्रीकृष्ण जन्म झाला. कृष्णाच्या सांगण्यावरून वसुदेवाने श्रीकृष्णाला गोकुळात नेण्याचे ठरवले.

श्रीकृष्णाच्या योगमायेने बंदिवासाचे दार आपोआप उघडले. श्रीकृष्णाला टोपलीत ठेवण्यात आले. यमुना नदी पार करून जायचे होते. यमुना नदीला पूर आला होता. त्या नदीला कृष्णाच्या चरणांचे दर्शन घ्यायचे होते. वसुदेवाने श्रीकृष्णाला यशोदा नंदराजाकडे सुखरूप नेऊन सोडले. त्यांची कन्या प्रत्यक्ष माया घेऊन वसुदेव तिथून बंदिवासात आले. तोच देवकीचा आठवा पुत्र आहे असे समजून कंस त्या बाळाला मारायला धावला. त्याच्या हातून ती माया निसटली आणि म्हणाली तुझा काळ जन्माला आला आहे. सावध हो...! 

अशी ही कृष्णकथा! तुम्ही म्हणाल, ही तर आम्हालाही माहीत आहे, मग यात नेमके रहस्य काय? तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कृष्णाने आदर्श जीवनाचा वस्तुपाठ घालून दिला. अगदी आपल्या जन्म कथेतूनही. कृष्णाच्या जन्मकथेतून माणसाच्या जन्माच रहस्य देखील आपोआप उलगडत जातं. ते रहस्य असे - मातेच्या उदर बंदिवासातून आपण बाहेर पडतो. आईशी नाळ तुटते. जन्माला एकटे आलो, जाणारही एकटेच! सर्व नाती लौकिकातील नाती आहेत. त्या नात्यांना कर्तव्य दशे पुरतेच मर्यादित ठेवले पाहिजे. प्रेमपाशात अडकून न राहता जो कर्तव्याला जागतो त्याचेच भले होते. नाती आज ना उद्या सुटणार आहेतच. म्हणून ती मुद्दामून तोडायची असे नाही. तर त्या नात्यांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडून आपल्या जीवनाचे उद्दिष्ट गाठले पाहिजे. वसुदेव देवकीला कृष्णाचे जन्मदात्रे म्हणून मान मिळाला, परंतु पुत्रासहवास नंद यशोदेला मिळाला. कृष्णाने त्यांना हे सौभाग्य दिले परंतु तो धर्मकार्यार्थ जन्माला आला होता. ते अवतार कार्य पूर्ण करण्यासाठी ना तो माता पित्यांजवळ थांबला ना गोप गोपिकांमध्ये फार काळ रमला. तो कर्तव्याला जागला म्हणूनच प्रत्येकाच्या हृदयात कृष्ण कायमस्वरूपी घर करून राहिला! आहे की नाही हे सुंदर रहस्य, आपल्या आणि कृष्णाच्या जन्माचे? 

गोपालकृष्ण भगवान की जय!

Janmashtami 2021 : गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात का धुवू नयेत? या प्रथेमागची कथा!

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमी