शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Janmashtami 2021 : भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर दोहोंचा जन्म आजच ; एकाने गीतामृत पाजले तर दुसऱ्याने ज्ञानामृत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 15:36 IST

Janmashtami 2021: संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने ९००० ओव्यांचा वाक् यज्ञ केल्यावर, त्याची सांगता करत असताना ९ ओव्यांमध्ये  भगवंताकडे मागणे मागितले. स्वत:साठी का? नाही...तर विश्वासाठी!

श्रावण वद्य अष्टमी हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस तसेच संत ज्ञानेश्वरांचाही जन्मदिवस! भगवान गोपाळकृष्णाने अर्जुनाच्या माध्यमातून अखिल विश्वाला गीतामृत पाजले तर संत ज्ञानेश्वरांनी तेच गीतामृत सर्वसामान्य जनाला विविध दृष्टांत देत प्राकृत मराठी भाषेत ओवीबद्ध करून ज्ञानेश्वरी स्वरूपात मांडले. एवढेच नाही तर ज्ञानेश्वरांनी विश्वकल्याणासाठी विश्वात्मक देवाकडे 'पसायदान' मागितले. 

संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने ९००० ओव्यांचा वाक् यज्ञ केल्यावर, त्याची सांगता करत असताना ९ ओव्यांमध्ये  भगवंताकडे मागणे मागितले. स्वत:साठी का? नाही...तर विश्वासाठी! हेच संतलक्षण आहे. आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी, साधू-संतांनी जेव्हा जेव्हा भगवंताकडे याचना केली, त्यात कधी स्वार्थ नव्हताच, तर केवळ 'समष्टी'साठी प्रार्थना होती. 

पसायदानातही माऊली विश्वात्मक देवाला आर्जव करते, माझ्याकडून जो वाक् यज्ञ करवून घेतलास, त्यात सारे काही सांगून झाले आहे आणि आता मागायची वेळ आली आहे. हे मागणे माझ्या एकट्यासाठी नसून अखिल विश्वासाठी आहे, ते तू पूर्ण कर. तोषावे म्हणजे तृप्त हो आणि तृप्त होऊन मी जे सर्वांसाठी मागतोय, ते पसाय म्हणजे प्रसादरूपी दान आमच्या पदरात घाल.

माउलींच्या शब्दात एवढी ताकद होती, की त्यांनी जे खळांची व्यंकटी सांडो ऐवजी जे खळांची पिढी नष्ट होवो, म्हटले असते तरी देवाने ऐकले असते. एवढा त्यांचा अधिकार होता. पण माउलींचा लोकांच्या चांगुलपणावर विश्वास आहे. ते म्हणतात वाईट वृत्ती कमी अधिक प्रमाणात सगळ्यांमध्ये असते. म्हणून व्यती वाईट ठरत नाही. म्हणून जी व्यंकटी अर्थात दुष्ट वृत्ती आहे ती नष्ट होउदे, म्हणजे रामराज्य अवतरेल. 

एकदा का वाईट वृत्ती नष्ट झाली, तर उरतील फक्त चांगले लोक. जे समष्टीचा विचार करतील, ज्यांच्या ठायी भूतदया असेल, परस्पर प्रेम असेल, सद्भावना असेल, ते केवळ चांगल्या कार्यासाठीच प्रवृत्त होतील, त्यांच्या हातून चांगलीच कामे घडतील आणि या सर्वांच्या प्रयत्नामुळे हे विश्व अतिशय सुंदर होईल. कारण येथील प्रत्येक जीवाला, दुसऱ्या जीवाप्रती सहानुभूती असेल.अशा लोकांना 'जो जे वांछिल तो ते लाहो' म्हणजेच ते जे मागतील ते त्यांना दे, कारण त्यात दुसऱ्यांबद्दल द्वेष भाव नसेल. तर प्रत्येकजण स्वतः बरोबर इतरांच्या उत्कर्षाचा विचार करेल. 

अशी स्थिती निर्माण झाल्यावर इथले वृक्ष कल्पतरू होतील आणि इथली रत्ने चिंतामणी होऊन इच्छापूर्ती होतील. सुखा समाधानाने, गुण्या गोविंदाने सगळे नांदतील. दुःख, वैर, द्वेष, मत्सर लयाला गेल्यामुळे निःशंकपणे लोकांचे मन ईश्वर चिंतनात रममाण होईल. तो दिवस नक्की येईल, अशी माउलींना खात्री वाटते. ते ज्यादिवशी घडेल त्या दिवशी हा ज्ञानदेव 'सुखिया झाला' असे समजावे!

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वर