शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Janmashatmi 2024: सध्या सुरू आहे श्रीकृष्ण नवरात्र, पण सांगता कधी ते जाणून घ्या आणि करा पुजाविधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 12:20 IST

Janmashtami 2024: यंदा २६ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी आणि २७ ला दही हंडी व गोपाळकाल्याचा उत्सव आपण साजरा करणार आहोत, त्याबरोबरच जाणून घ्या कृष्ण नवरात्रीबद्दल!

आपण देवीची नवरात्र ऐकली आहे, रामाची नवरात्र ऐकली आहे, खंडोबाची नवरात्र ऐकली आहे, पण श्रीकृष्णाचीही नवरात्र असते, हे अनेकांनी प्राथमच ऐकले असेल. याचे कारण एकच, की कालौघात अनेक व्रत कालबाह्य झाल्यामुळे आपल्याला त्याबद्दल पुरेशी माहिती नाही. श्रीकृष्ण नवरात्र आपल्यासाठी नवीन असली, तरी कृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीला होतो व दुसऱ्या दिवशी हंडी फोडून काला करून उत्सवाची सांगता होते, हे तर आपल्याला माहीत आहेच! याचाच पूर्वार्ध म्हणजे श्रीकृष्णाची नवरात्र! श्रावण वद्य प्रतिपदा ते नवमी हा उत्सव असतो. यंदा श्रीकृष्ण नवरात्रीचा उत्सव २० ऑगस्ट रोजी सुरू झाला असून २६ ऑगस्ट  रोजी त्याची सांगता होईल. 

गोकुळाष्टमीचा (Janmashtami 2024) उत्सव कथा कीर्तनाने आठ दिवस आधी सुरू होऊन अष्टमीला कृष्णजन्म आणि नवमीला काल्याचे कीर्तन होत असे. आजही काही मंदिरांमध्ये चातुर्मासाची, श्रावण महिन्याची नाहीतर अष्टमीतल्या सप्ताहाची कीर्तने आयोजित केली जातात. त्या कीर्तनांमधून या नवरात्रीबद्दल तसेच या उत्सवाबद्दल सविस्तर माहिती कळते. आता जेमतेम उत्सवाची कीर्तनं होतात आणि हंडीसाठी (Dahi Handi 2024)लोक उत्सुक असतात. त्यामुळे माहितीचा स्रोत आटून गेला. 

गोकुळाष्टमी नवरात्र- श्रावण प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हे नवरात्र करतात. मात्र ते महाराष्ट्रात अधिककरून देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांच्या घरी काही कुळांमध्ये करण्याची प्रथा आहे. या नवरात्रात भागवत सप्ताह केला जातो. ते शक्य नसल्यास भागवताच्या एखाद्या स्कंधाचे या पठण श्रवण केले जाते. अथवा अखंड नामसप्ताह, कीर्तनाचे आयोजन केले जाते. अनेक कृष्ण मंदिरात तसेच विठ्ठल मंदिरातही हे नवरात्र उत्साहाने साजरे होते. याची समाप्ती गोपाळकाल्याने होते. भंडारा मात्र बहुतेक ठिकाणी असतो.

पूर्वापार हे व्रत फक्त काही कुळांपुरतेच मर्यादित आहे. परंतु अलिकडे कृष्णभक्ती करणारे अनेक भाविक हे व्रत करतात. सध्याच्या धवापळीच्या काळात भागवत सप्ताह करणे सर्वांनाच शक्य होईल असे नाही. परंतु सामुहिक पद्धतीने एकत्र होऊन सप्ताहाचे आयोजन केले, तर तेही निश्चित जमू शकते. 

असे कार्यक्रम विधीचा, पूजेचा एक भाग किंवा सोपस्कार नाही, तर या गोष्टी आपल्या मनाला प्रसन्नता, उभारी देण्यासाठी आहेत. या निमित्ताने समाजाचे एकत्रीकरण होते, अंतर्गत मतभेद दूर होतात, भांडण मिटून स्नेहभोजन होते. गप्पा रंगतात. यांत्रिक युगात जगत असलेल्या मानवाला चार घटका माणसांचा सहवास मिळतो आणि माणूस खऱ्या अर्थाने माणसाळतो. 

अशा संधी न दवडता, निमित्त शोधून संघटित होण्याची गरज आहे. ही एकजूट सणाच्या निमित्ताने झाली, तरच संकटप्रसंगीदेखील कामी येईल. लोकमान्यांनी हेच तंत्र वापरून गणेश उत्सव आणि शिवजयंतीला सार्वजनिक रूप दिले. पुन्हा एकदा काळाची गरज ओळखून आजच्या मोबाईलयुगात स्वत:ला आणि इतरांना अशा कार्यासाठी एकत्र करणे गरजेचे आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांना हातभार लागेल, स्थानिकांना रोजगार मिळेला, मुलांना वृद्धांना विरंगुळा मिळेल आणि पुढच्या पिढीच्या हाती नकळत संस्कृतीचे हस्तांतरण होईल.

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीDahi HandiदहीहंडीNavratriनवरात्रीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३Shravan Specialश्रावण स्पेशल