ओडिसातील पुरी येथील जगन्नाथ मंदिरात दररोज भगवान जगन्नाथाला खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो. हा नैवेद्य केवळ एक परंपरा नसून त्यामागे भगवान जगन्नाथाचे आपल्या भक्तावरील अफाट प्रेम दर्शवणारी एक हृदयस्पर्शी पौराणिक कथा आहे.
Makar Sankranti 2026: यंदा 'संक्रांत' कोणावर? जाणून घ्या तिचे वाहन, वस्त्र, शस्त्र आणि राशीभविष्य!
ही कथा 'कर्मा बाई' नावाच्या एका थोर भक्त आणि भगवान जगन्नाथ यांच्या भेटीची आहे.
खूप वर्षांपूर्वी पुरीमध्ये कर्मा बाई नावाची एक वृद्ध महिला राहायची. ती भगवान जगन्नाथाची निस्सीम भक्त होती. तिची इच्छा होती की देवाने आपल्या घरी येऊन भोजन करावे. ती भगवंताला आपल्या मुलाप्रमाणे मानायची.
खिचडीचा पहिला नैवेद्य
एके दिवशी सकाळी, कर्मा बाईंनी देवाला काहीतरी खाऊ घालण्याच्या ओढीने घाईघाईत खिचडी शिजवली. ती इतकी व्याकुळ झाली होती की, खिचडी नीट शिजायच्या आतच तिने भगवंताला हाक मारली. भगवान जगन्नाथही आपल्या भक्ताचा भाव ओळखून एका लहान मुलाचे रूप घेऊन तिथे प्रकट झाले.
त्या वेळी कर्मा बाईंनी खिचडी खाली उतरवली आणि भगवंताला खायला दिली. गरम खिचडी खाताना भगवंताच्या तोंडाला चटके बसत होते, तरीही त्यांनी ती आवडीने खाल्ली. कर्मा बाईंना आनंद झाला आणि त्या दिवसापासून हा त्यांचा रोजचा नियम झाला.
Ritual: सावधान! हातातील पूजेचा धागा 'इतक्या' दिवसांनंतर बनतो नकारात्मक ऊर्जेचं कारण!
त्यावेळी मंदिराचे पुजारी कर्मा बाईंच्या घरी आले. त्यांनी पाहिले की आजी अंघोळ न करता, पूजा न करताच देवाला खिचडी खाऊ घालत आहेत. त्यांनी आजींना दटावले की, "अंघोळ करून, शुचिर्भूत होऊन देवाला नैवेद्य दाखवावा लागतो, असे शास्त्र सांगते."
आजींनी दुसऱ्या दिवसापासून शास्त्राचे पालन करायला सुरुवात केली. त्या अंघोळ उरकून, देवपूजा करून मग खिचडी बनवू लागल्या. यात खूप वेळ गेला. दुसरीकडे, मंदिरात देवाची पूजा आणि नैवेद्याची वेळ झाली, पण प्रत्यक्ष देव तर आजीच्या खिचडीची वाट पाहत भुकेले बसले होते.
Numerology: तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्यात कोणत्या 'हेतूने' आला? याचे गुपित जन्मतारखेवरुन कळणार!
मंदिरातील चमत्कार
असे म्हणतात की, जेव्हा भगवान जगन्नाथ मंदिरात परतले, तेव्हा त्यांच्या तोंडाला खिचडी लागलेली होती. पुजाऱ्याने विचारले, "देवा, हे काय?" तेव्हा देवाने सांगितले की, "मला कर्मा बाईंच्या हाताची खिचडी सर्वात जास्त प्रिय आहे. तिथले नियम आणि शिस्त मला आवडत नाही, मला फक्त भक्ताचा भाव हवा आहे."
भक्ताची ही ओढ पाहून भगवंताने वचन दिले की, "इथून पुढे या मंदिरात दररोज मला कर्मा बाईंच्या आठवणीत खिचडीचा नैवेद्य दाखवला जाईल."
खिचडीच्या नैवेद्याचे महत्त्व
खिचडी हे साधेपणाचे प्रतीक आहे. देव श्रीमंतीचा नाही, तर प्रेमाचा भुकेला आहे हे यातून सिद्ध होते. आजही पुरीच्या मंदिरात सकाळी 'बालभोग' मध्ये खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो, ज्याला 'कर्मा बाई खिचडी' असेही म्हटले जाते.
Web Summary : Jagannath in Puri is first offered khichdi due to Karma Bai's devotion. Lord valued her simple, loving offering over rituals, promising daily khichdi.
Web Summary : पुरी में जगन्नाथ को कर्मा बाई की भक्ति के कारण खिचड़ी का पहला भोग लगता है। भगवान ने उनके प्रेम को महत्व दिया, इसलिए रोज खिचड़ी अर्पित करने का वचन दिया।