ज्ञान, भक्ती आणि वैराग्याची ओळख स्वामी शांतिगिरीजी महाराजांकडून live चर्चासत्रात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 08:00 IST2021-02-12T08:00:00+5:302021-02-12T08:00:02+5:30
त्यागाचा अर्थ कळल्याशिवाय वैराग्य अंगात बाणता येणार नाही, शांतिगिरीजी महाराजांनी ती अनुभूती स्वतः घेतली, म्हणून ते अधिकारवाणीने आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत.

ज्ञान, भक्ती आणि वैराग्याची ओळख स्वामी शांतिगिरीजी महाराजांकडून live चर्चासत्रात!
ज्ञान, भक्ती आणि वैराग्य हे तीनही शब्द वेगवेगळे वाटत असले, तरी परस्परांशी निगडित आहेत. अध्यात्माचा आणि या तीनही शब्दांचा घनिष्ट संबंध आहे.ज्ञान मिळाल्याशिवाय भक्ती घडत नाही आणि ज्ञान व भक्ती जडल्याशिवाय वैराग्य येत नाही. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी गरज आहे, उचित मार्गदर्शनाची! याच शब्दांचा आणि भक्तिमार्गाचा खुलासा करण्यासाठी जगद्गुरू जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज आपल्या भेटीला येत आहेत. १३ फेब्रुवारी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती युट्युब चॅनेलवर live कार्यक्रमात आपण त्यांचे विचार ऐकू शकता.
उत्तम समाजसेवक आणि अध्यात्मिक गुरु अशी स्वामीजींची ख्याती आहे. साधारणतः १९७५-७६ मध्ये शांतिगिरीजी बाबांनी जे घर सोडले ते आजतागायत आहे. 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती.' या उक्तीप्रमाणे शांतिगिरीजी बाबांनी आपले कार्य सुरू केले. पहिल्यापासूनच शांतिगिरीजी बाबा जनार्दन बाबांचे आवडते शिष्य होते. सन १९८९ मध्ये जनार्दन बाबांचे महानिर्वाण झाले. आणि सोडशी सोहळ्यात जनार्दन बाबांच्या उत्तराधिकारी पदाची शाल अनेक मान्यवरांच्या साक्षीने आणि शंभू पंचनाम जुना आखाड्याच्या साधूंच्या उपस्थितीत शांतिगिरीजी बाबांच्या अंगावर चढवली. परंतु आजही काही नतभ्रष्ट लोक हे मान्य करायला तयार नाही. त्यानंतर ही शांतिगिरीजी बाबांना अनेक प्रकारचे त्रास काही लोकांनी दिला. प्रसंगी मारायचा प्रयत्न झाला. परंतु जनार्दन बाबांनी दिव्य दृष्टी दिलेल्या शांतिगिरीजी बाबांनी आपले कार्य थांबवले नाही. या सर्वांतून शांतिगिरीजी बाबांनी संयमाने आणि धैर्याने मार्ग काढत बाबांच्या कार्याचा प्रचार प्रसाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली ती आजतागायत सुरू आहे.
त्यागाचा अर्थ कळल्याशिवाय वैराग्य अंगात बाणता येणार नाही, शांतिगिरीजी महाराजांनी ती अनुभूती स्वतः घेतली, म्हणून ते अधिकारवाणीने आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. आपणही जरूर ऐका 'ज्ञान, वैराग्य, आरोग्य' या विषयावरील live चर्चासत्र. १३ फेब्रुवारी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती युट्युब चॅनेलवर!